Home » अर्थ, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय » हजाराची नवीन नोट तूर्तास नाही : जेटली

हजाराची नवीन नोट तूर्तास नाही : जेटली

♦२२ हजार ५०० एटीएमची पुनर्रचना
♦२ हजारांच्या नवीन नोटा मिळणार,
वृत्तसेवा
नवी दिल्ली, १७ नोव्हेंबर
arun-jaitley9हजार रुपयांची नवीन नोट एवढ्यातच जारी करण्याची सरकारची कुठलीही योजना नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज गुरुवारी येथे स्पष्ट केले. प्रसारमाध्यमांशी बोलताना जेटली म्हणाले, नजिकच्या भविष्यात हजार रुपयांची नवी नोट आणण्याची तूर्तास कुठलही शक्यता नाही. यापूर्वी हजार रुपयांची नवी नोट जारी करण्याबाबत सरकारतर्फे सांगण्यात आले होते.
पैशांचा दुरुपयोग रोखण्यासाठीच सरकारने साडेचार हजार रुपयांची मर्यादा दोन हजार रुपयांवर आणली आहे, असे त्यांनी याविषयीच्या प्रश्‍नात सांगितले. जेटली म्हणाले, आज गुरुवारी दिवसभरात साडे बावीस हजार एटीएमची फेररचना करण्यात आली असून त्यामुळे एटीएम केंद्रांमधून दोन हजाराच्या नव्या नोटा मिळू शकणार आहेत. यामुळे रांगेत उभ्या राहणार्‍या लोकांची गैरसोय टळेल.
सध्या देशभरात जवळपास दोन लाख एटीएम केंद्रे असून यातील २२ हजार ५०० एटीएम केंद्रांची तांत्रिक पुनर्रचना पार पडली. दोन हजाराच्या नोटांचा आकार वेगळा असल्याने एटीएममधून दोन हजार रुपयांच्या नोटा काढता याव्यात, यासाठी एटीएम मशीनमध्ये बदल करणे आवश्यक होते, असे जेटली म्हणाले.

शेअर करा

Posted by on Nov 18 2016. Filed under अर्थ, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google