Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » हिंदूंच्या जमिनी हडपण्यासाठीच मंदिरांवर हल्ले

हिंदूंच्या जमिनी हडपण्यासाठीच मंदिरांवर हल्ले

=बांगलादेश मानवाधिकार आयोगाचा अहवाल=
logobhrc-bangladesh-human-rightsढाका, [२ नोव्हेंबर] – बांगलादेशात अल्पसंख्यक असलेल्या हिंदूंच्या जमिनी हडपण्यासाठी त्यांच्या अनेक मंदिरांवर हल्ले करण्यात येत आहेत. हा एका पूर्वनियोजित कटाचाच भाग आहे, असे या देशातील राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने स्पष्ट केले.
ब्राह्मणबारही जिल्ह्यातील नासिरनगर येथे अलीकडेच हिंदूंच्या अनेक मंदिरांवर हल्ले करण्यात आले. त्यांची घरेही लुटण्यात आली. या सर्वच घटनांचा आम्ही तपास केला असून, हिंदूंच्या जमिनी बळकावणे हाच या घटनांमागील उद्देश असल्याचे आम्हाला प्रथमदर्शनी दिसून आले आहे. हे सर्वच हल्ले पूर्वनियोजित होते, असे वैधानिक दर्जा प्राप्त असलेल्या आयोगाने आपल्या अहवालात म्हटले आहे.
या सर्व घटनांचा आम्ही सखोल तपास करीत आहोत. तो आगामी दोन दिवसांत पूर्ण होईलच. तथापि, आम्ही आपल्या प्राथमिक निष्कर्षावर ठाम आहोत. हिंदूंच्या मनात दहशत निर्माण करणे आणि त्यांना घरदार सोडून जाण्यास भाग पाडणे, हाच या देशातील समाजकंटकांचा मुख्य उद्देश आहे, असे आयोगाच्या सत्यशोधक पथकाचे अध्यक्ष आणि आयोगाचे सदस्य इनामूल हक चौधरी यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
केवळ एक किंवा दोन मंदिर आणि घरांवर हल्ला करण्यात आला असता, तर पोलिसांना वेळीच कारवाई करणे शक्य झाले असते. पण, पोलिस हतबल होतील आणि ते काहीच करू शकणार नाही, अशा पद्धतीनेच अवघ्या २४ तासांमध्ये अनेक मंदिर आणि घरांवर हल्ले करण्यात आले. हा फार व्यापक कट होता. हिंदूंना पिटाळून लावणे आणि त्यांच्या जमिनी बळकावणे हाच यामागील एकमेव उद्देश होता, असेही त्यांनी सांगितले.

शेअर करा

Posted by on Nov 3 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google