Home » छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » हेरगिरी प्रकरणात सपा खासदाराच्या पीएला अटक

हेरगिरी प्रकरणात सपा खासदाराच्या पीएला अटक

delhi-police-crime-branch-arrested-farhat-personal-assistant-to-samajwadi-party-mp-munawwar-saleemतभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, [२९ ऑक्टोबर] – लष्कर तसेच देशातील अन्य सुरक्षा यंत्रणाची हेरगिरी करण्याच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने समाजवादी पार्टीचे राज्यसभा सदस्य चौधरी मुनवर सलिम यांच्या स्वीय सहायकाला अटक केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. न्यायालयाने त्याला १० दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.
खा. मुनवर सलिम यांच्या फरहत नावाच्या स्वीय सहायकाला पोलिसांनी आधी चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि नंतर अटक केली. हेरगिरीच्या या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने पाकिस्तानी दुतावासातील महमूद अख्तर नावाच्या अधिकार्‍याला ताब्यात घेतले होते. फरहत हा महमूद अख्तरचा निकटवर्ती होता, महमूद अख्तरने दिलेल्या कबुलीजबाबाच्या आधारे  पोलिसांनी फरहतला उत्तरप्रदेशातून ताब्यात घेतले होते. चौकशीत हेरगिरी प्रकरणात त्याचा सहभाग आढळून आल्यामुळे त्याला अटक करण्यात आहे. फरहत च्या अटकेमुळे या हेरगिरी प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची संख्या चार झाली आहे.
फरहतवर महमूद अख्तरला परराष्ट्र, संरक्षण आणि नागरी उड्ढयण मंत्रालयाशी संबंधित गोपनीय माहिती देण्याचा आरोप आहे. यासाठी फरहतला २ लाख रुपये मिळाले होते.  पोलिसांनी आधी मौलान रमजान खान, सुभाष जांगिड आणि शोएबला अटक केली आहे. महमूद अख्तरला राजनैतिक संरक्षण असल्यामुळे पोलिस त्याला अटक करू शकले नाही, मात्र त्याच्यावर देश सोडून जाण्याचा आदेश बजावण्यात आला आहे.
हेरगिरी प्रकरणाचे धागेदोरे आता राजकीय पक्षांपर्यंत पोहोचत असल्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या समाजवादी पार्टीसमोरील अडचणी आणखी वाढणार आहेत. खासदाराचा स्वीय सहयक चौकशीत दोषी आढळला तर त्याच्यावर कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी, असे समाजवादी पार्टीचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी सांगितले आहे. पूर्ण चौकशीअंतीच वर्षभरापूर्वी आपण फरहतला स्वीय सहायक म्हणून घेतले होते. या प्रकरणी चौकशीत दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेला आपण पूर्ण सहकार्य करु, असे खा. चौधरी मुनवर सलीम यांनी सांगितले.

शेअर करा

Posted by on Oct 30 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google