Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या » हैमा चक्रीवादळाची फिलिपाईन्सला धडक, १२ ठार

हैमा चक्रीवादळाची फिलिपाईन्सला धडक, १२ ठार

=पिके उद्‌ध्वस्त=

मनिला, [२१ ऑक्टोबर] – ताशी २२५ किलोमीटर असा वेग असलेल्या हैमा चक्रीवादळाने गुुरुवारी सायंकाळी फिलिपाईन्सला जोरदार धडक दिली. गेल्या तीन वर्षांच्या काळातील हे अतिशय भीषण वादळ ठरले आहेत. वादळाच्या तडाख्यात १२ लोकांचा मृत्यू झाला असून, हजारो लोक बेघर झाले आहेत.
वादळाची गती इतकी जास्त होती की, देशाच्या अनेक भागातील भात आणि मक्याच्या शेतांचे अतोनात नुकसान झाले आहे. मनिला येथे पत्रकारांना माहिती देताना अधिकार्‍यांनी सांगितले की, वादळामुळे असंख्य घरांचे प्रचंड नुकसान झाले. अनेक कच्ची घरे जमीनदोस्त झाली असून, पायाभूत सुविधा आणि शेतातील पिकेही  नष्ट झाली. फिलिपिन्सच्या उत्तर प्रांतातील हजारो हेक्टर शेतजमिनी उद्‌ध्वस्त झाल्या आहेत.
या चक्रीवादळाची गती ताशी २२५ किलोमीटर इतकी होती. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसासह कॅगायन प्रांताला वादळाने धडक दिली. या भागात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे, असे अधिकार्‍याने सांगितले.

शेअर करा

Posted by on Oct 22 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google