Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » १०००, ५००च्या नोटांवर बंदी घालण्याची कल्पना माझीच

१०००, ५००च्या नोटांवर बंदी घालण्याची कल्पना माझीच

=रामदेवबाबांचा दावा=
India Politicsजयपूर, [१० नोव्हेंबर] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ५०० व १००० रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याची सूचना मीच केली होती, असा दावा योगगुरू रामदेवबाबा यांनी केला आहे. जागतिक राजस्थान ऍग्रोटेक परिषदेत सहभागी होण्यासाठी जयपूर येथे आले असता माध्यमांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली.
यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींचे खूपच कौतुक केले. मोदींच्या निर्णयाचे स्वागत करताना ते म्हणाले, एवढा मोठा धाडसी निर्णय घेणारे ते देशाचे पहिलेच पंतप्रधान आहेत. त्याचे भविष्यात चांगलेच परिणाम दिसून येतील.
नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना मी तेथे गेलो होतो. त्यावेळी भ्रष्टाचारावर अंकुश लावण्यासाठी मीच त्यांना पाचशे आणि हजाराच्या नोटेवर बंदी घालण्याची सूचना केली होती. पण त्यावेळी त्यांच्याकडे तो अधिकार नव्हता. पण जेव्हा त्यांच्या हाती अधिकार आले त्यांनी हे धाडसाचे पाऊल उचलले असे रामदेवबाबा म्हणाले.
परिषदेत बोलताना ते म्हणाले, मी एक योगी आहे. त्यामुळे बँकेत मी खातेच उघडलेले नाही. माझ्याकडे पाचशे, हजारच्या नोटाच नाहीत. हे पैसे ठेवण्यासाठी माझ्याकडे खिसाही नाही, असेही त्यांनी मिश्किलपणे सांगितले.
विदेशी गुंतवणुकीसाठी पंतप्रधान संपूर्ण जगात फिरून आले. परंतु देशात किती पैसा आला याची त्यांनी माहिती नाही. परंतु रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार २८ ऑक्टोबर २०१६ पर्यंत भारताने १७.७७ लाख कोटी रुपयांचे चलन छापले. त्यातील ८६ टक्के पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा होत्या. देशातील अर्थव्यवस्थेत १५ लाख कोटी रुपये पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटांमध्ये चलनात आहेत. विदेशी गुंतवणूक येईल किंवा नाही याची माहिती नाही पण या नोटा जरूर बाजारात येणार असे ते म्हणाले.
पतंजली लवकरच मसाला उद्योगात प्रवेश करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. त्याचबरोबर बाजरीचे पीठ देखील बाजारात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पतंजलीच्या वतीने राजस्थानमध्ये लवकरच मेगा फूड पार्क उभारण्यात येणार आहे.

शेअर करा

Posted by on Nov 11 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google