Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » १० रुपयांची सर्व नाणी खरी

१० रुपयांची सर्व नाणी खरी

=अफवांवर विश्‍वास ठेवू नका : आरबीआय=
वृत्तसंस्था
मुंबई, २१ नोव्हेंबर –
rbi-logo५०० आणि हजाराच्या नोटांवर बंदी  घालण्याच्या निर्णयानंतर १० रुपये मूल्याची बनावट नाणी चलनात असल्याच्या अफवाही जोर धरू लागल्या. अनेक दुकानांमध्ये दहा रुपयांची नाणी सर्रास नाकारली जात असतानाच भारतीय रिझर्व्ह बँकेने आज सोमवारी या अफवांना विराम दिला.
चलनात असलेली १० रुपयांची कोणतीही नाणी बनावट नाहीत. या केवळ अफवा आहेत. चिन्ह असणारी आणि नसणारी दोन्ही नाणी खरी आहेत, असे आरबीआयने स्पष्ट केले. अनेक दुकानदार व व्यापार्‍यांकडून १० रुपयांची नाणी स्वीकारली जात नसल्याच्या तक्रारी आरबीआयला मिळाल्यानंतर आरबीआयने एका पत्रकाद्वारे याबाबतचा खुलासा केला. अशा कोणत्याही अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन आरबीआयकडून करण्यात आले. सध्या चलनात असणारी सर्व नाणी खरी आहेत. त्यामुळे मनात शंका न आणता ही नाणी वापरावी, असा सल्लाही आरबीआयने दिला.

शेअर करा

Posted by on Nov 22 2016. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google