Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » २३ हजार बेरोजगार तरुण होणार विद्युत व्यवस्थापक

२३ हजार बेरोजगार तरुण होणार विद्युत व्यवस्थापक

=ग्रामीण वीजपुरवठा सुरळीत करणारी आगळी योजना=
तभा वृत्तसेवा
mseb-indiaमुंबई, [दि. २० ऑक्टोबर] – ग्रामीण भागातील नागरिकांना विद्युत विषयक सेवा उपलब्ध व्हाव्या आणि त्यांच्या समस्यांची सोडवणूक व्हावी यासाठी ग्रामपंचायत विभाग आणि ऊर्जा विभागातर्फे ‘एक गाव, एक विद्युत व्यवस्थापक’ ही योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी बुधवारी दिली.
पॉवर फॉर ऑल ही सरकारची भूमिका आहे. याच भूमिकेतून राज्यातील नागरिकांना सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी विद्युत आणि ग्रामविकास विभागांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना रावविण्यात येणार आहे. या योजनेमुळे नागरिकांच्या वीजविषयक समस्या सोडविण्याठी मदत होणार आहे. या योजनेंतगर्त राज्यातील २३ हजार बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यांच्यासाठी ही दिवाळी भेट असल्याचे ऊर्जामंत्र्यांनी सांगितले.
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, की तांत्रिक दृष्ट्या या योजनेचे काम ऊर्जा विभाग पाहाणार आहे तर ग्रामविकास विभाग फ्रँचायजीचे काम करणार आहे. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांच्या विद्युत विषयक समस्या आता गावातच सुटणार आहेत. कारण नेमलेला व्यवस्थापक हा गावातच राहाणार आहे. ग्रामविद्युत व्यवस्थापकाची निवड करताना ग्रामपंचायतीने त्याच गावातील ईलेक्ट्रिकलमध्ये आयटीआय उत्तीर्ण तरुणाची निवड करणे अपेक्षित आहे.
ही योजना नोव्हेंबर-डिसेंबरपासून राबविण्यात येणार आहे. रोजगार देताना कमीत कमी तीन हजार रुपये किंवा प्रती कुटुंब ९ रूपये, यापैकी जी रक्कम जास्त असेल ती रक्कम ग्राम विद्युत व्यवस्थाकास देण्यात येणार आहे. या योजनेमुळे राज्यातील २३ हजार तरुणांची दिवाळी गोड होणार आहे. ग्रामपंचायतीने संबंधित व्यवस्थापकाची निवड केल्यानंतर त्यांना तीन महिन्याचे कौशल्य प्रशिक्षण विद्युत विभागातर्फे देण्यात येणार आहे.
ग्रामपंचायतीने विद्युत व्यवस्थापकाची निवड केल्यानंतर त्यास गावातील मीटरचे रिडींग घेणे, वीज बिलांचे वाटप करणे, वीज पुरवठा पूवर्वत करणे, डीओ फ्यूज टाकणे, फ्यूज कॉल तक्रारींचे निवारण करणे, रस्त्यांवरील पथदिव्यांची देखभाल करणे, नवीन वीज जोडणीची कामे करणे, थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित करणे आदी कामे करावी लागणार आहेत.

शेअर करा

Posted by on Oct 21 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google