Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » ५००, १००० रुपयांच्या नोटा मध्यरात्रीपासून रद्द : मोदी

५००, १००० रुपयांच्या नोटा मध्यरात्रीपासून रद्द : मोदी

  • मोदींचा क्रांतिकारी निर्णय
  • १० नोव्हेंबर ते ३० डिसेंबर पर्यंत नोटा बदलता येणार,

narendra-modi-30नवी दिल्ली, [८ नोव्हेंबर] – काळा पैसा, नकली नोटा आणि भ्रष्टाचाराविरोधात मोठी लढाई छेडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी ५०० आणि एक हजार रुपयांच्या चलनी नोटा व्यवहारातून हद्दपार केल्या. हा निर्णय आज मंगळवारी मध्यरात्रीपासूनच अंमलात येणार आहे. काळा पैसा जमा करणार्‍यांसाठी हा आजवरचा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
आज मध्यरात्रीपासून ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटांना कोणतेही मूल्य राहणार नाही. कचर्‍यातील कागदाप्रमाणे त्या नोटा राहतील. तथापि, एक रुपयापासून १०० रुपयांपर्यंतच्या नोटा पूर्वीप्रमाणेच चलनात राहतील. याशिवाय एक रुपया, दोन रुपये, पाच रुपये आणि दहा रुपयांचे नाणेही चलनात राहणार आहेत.
देशभरातील चलनातून ५००, १००० आणि २००० रुपयांच्या नोटा हद्दपार झाल्या असल्या तरी नागरिकांनी घाबरून जाण्याचे काही कारण नाही. ते आपल्या जवळील या सर्व नोटा १० नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या ५० दिवसांच्या कालावधीत आपल्या बँक खात्यात किंवा डाक कार्यालयात जमा करू शकतात. तुमच्याजवळ ५० दिवसांचा वेळ आहे. मुळीच घाई करू नका. भारतीय रिझर्व्ह बँकेतही तुम्ही या नोटा जमा करू शकता, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित करताना सांगितले.
५०० आणि १००० हजार रुपयांच्या नोटा आम्ही चलनातून हद्दपार केल्या असल्या, तरी लवकरच नव्या नोटा चलनात आणण्यात येणार आहे. तोपर्यंत नागरिक बँकांनी बदलून दिलेल्या चलनाचा वापर करू शकतात. भ्रष्टाचाराविरोधात हे पाऊल उचलण्यात आले असल्याने नागरिकांनी या लढ्यात सहकार्य करावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. १० नोव्हेंबरपासून ३० डिसेंबरपर्यंत या नोटा जमा केल्यानंतर त्या बदलून घेण्यासाठी आपले ओळखपत्र दाखवावे लागेल, असे सांगताना रुग्णालयांमध्ये ११ नोव्हेंबरच्या  रात्री १२ वाजेपर्यंत जुन्या नोटा देण्याची परवानगी राहणार आहे. शिवाय, ७२ तासांपर्यंत जुन्या नोटांचा वापर करून औषधांची खरेदी करणे शक्य होणार आहे.
या नव्या व्यवस्थेत सुरुवातीला तुम्ही एका दिवसात एका कार्डवरून एटीएममधून दोन हजारापर्यंत रुपये काढू शकता. त्यानंतर एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा वाढवली जाईल, असे जाहीर करताना धनादेश, डेबिट, क्रेडिट, व्हिसा कार्डने जो व्यवहार आतापर्यंत सुरू आहे, तो पुढेही असाच कायम राहील. ऑनलाईन पेमेंटची सुविधाही अशीच सुरू राहणार असल्याचे मोदी म्हणाले. ९ व १० नोव्हेंबर रोजी देशातील एकही एटीएम काम करणार नाही. तसेच उद्या ९ नोव्हेंबर रोजी देशातील सर्व बँका बंद ठेवण्यात येणार आहेत. हा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेचा आहे, अशी माहितीही मोदी यांनी  दिली.

शेअर करा

Posted by on Nov 9 2016. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google