Home » प.महाराष्ट्र » युवासेना उपजिल्हाप्रमुखाच्या गाडीची मोडतोड

युवासेना उपजिल्हाप्रमुखाच्या गाडीची मोडतोड

mahabaleshwar-maharashtraतभा प्रतिनिधी
महाबळेश्‍वर [दि २५ आक्टोबर] – युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख सचिन वागदरे यांच्या गाडीवर सोमवारी मध्यरात्री अज्ञात इसमांनी हल्ला करून गाडीची मोडतोड केल्याने शहरात तणाव निर्माण झाला आहे. शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान शिवसेनेने तातडीची बैठक घेवून या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे.
शहराच्या मध्यवस्तीत शिक्षक सोसायटी मध्ये सचिन वागदरे हे राहतात. रात्री उशिरा त्यांनी त्यांची गाडी सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभी केली. दरम्यान, मध्यरात्री ३ नंतर मोटार सायकलवरून दोन इसमांनी सोसायटीमध्ये प्रवेश केला व त्यांनी हातातील मोठा दगड गाडीच्या मागील काचेवर टाकला व काच फोडली. तसेच हल्लेखोरांनी मोठया आकाराची एक चिठ्ठी गाडीवर चिटकवली त्यामध्ये काल टि. व्ही. वर झळकत होतास आज गाडीवर दगड टाकलायं उद्या डोक्यात पडेल, असा मजकुर लिहीला होता. याबाबत अधिक चौकशी केली असता एका दूरचित्र वाहिनीने पालिका राजकारणा संदर्भात एक शोचे आयोजन केले होते. या शोमध्ये बोलताना सचिन वागदरे यांनी येथील एका नगरसेवकांवर आरोप केले होते. त्यामुळे हा हल्ला संबंधित नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांनी केला असावा असा दावा सचिन वागदरे यांनी केला असून तशी तक्रार त्यांनी पोलिसात दिली आहे. दरम्यान, पोलिसांनी या घटनेच गंभीर दखल घेतली असून हल्ल्याचा पंचनामा करून पोलिसांनी अज्ञात इसमां विरूध्द गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांनी काही संशयितांना पोलिस ठाण्यात बोलावून चौकशी केली मात्र, अद्याप हल्लेखोर कोण आहे याचा तपास लागलेला नाही. दरम्यान, येथील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकारी यांची तातडीची बैठक पार पडली निवडणुकीचे वातावरण असल्याने शहराची कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी शिवसैनिकांनी संयम पाळावा असे आवाहन या बैठकीत करण्यात आले व त्यांनी या हल्ल्याचा जाहीर निषेध केला आहे. या घटनेने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

शेअर करा

Posted by on Oct 26 2016. Filed under प.महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google