Home » प.महाराष्ट्र » वाई विकास महाआघाडीची घोषणा

वाई विकास महाआघाडीची घोषणा

=राष्ट्रवादीला शह=
wai-maha-aghadiधनंजय घोडके
वाई, [२६ ऑक्टोबर] – नगरपालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी फोडाफोडीच्या राजकारणाने वेग घेतला असून  निवडणुकीची समीकरणे बदलत आहेत. सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाला शह देण्यासाठी वाईतील सर्व विरोधकांनी एकत्र येऊन वाई शहरात वाई विकास महाआघाडीची  स्थापना केली आहे. यामध्ये कॉग्रेस, भाजप, आर.पी.आय., रासप व इतर पक्षांनी सत्ताधारी राष्ट्रवादीचा भष्ट्राचार उघड करण्यासाठी व वाई शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येऊन महाआघाडीची स्थापना केली आहे. दरम्यान, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ खरात यांनीही  गुरुवारचा मुहूर्त साधत भाजपमध्ये प्रवेश केला.
वाई पालिकेत पारंपरिक विरोधक जनकल्याण आघाडीला दोन वेळा सत्तेने हुलकावणी दिली. याचे मुख्य  कारण विरोधकांच्या मधली मतविभागणी असल्याने हे टाळण्यासाठी व घवघवीत यश मिळविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. महाआघाडी होण्यासाठी माजी आमदार मदन भोसले, नंदकुमार खामकर, सचिन फरांदे, शेखर शिंदे, विकास शिंदे, विराज शिंदे, विवेक पटवर्धन, भाजपच्या श्रीमती विजयाताई भोसले, अविनाश फरांदे, अजित वनारसे, सचिन घाडगे, विजय ढेकाणे, राजाभाऊ खरात आर.पी.आय.चे अशोक गायकवाड यांनी पुढाकार घेवून वाई विकास महाआघाडीची स्थापना केली.
यावेळी बोलताना नंदकुमार खामकर म्हणाले गेली दहावर्ष वाई नगरपालिकेत राष्ट्रवादी प्रणित तीर्थक्षेत्र आघाडीची सत्ता असून शहरामध्ये विकासाला खीळ बसली असून भ्रष्टाचार बोकाळला आहे. यातून वाई शहराला बाहेर काढून खर्‍या अर्थाने विकास करायचा झाल्यास महाआघाडीला साथ द्या.
सचिन फरांदे म्हणाले आम्ही वेळोवेळी सक्षम विरोध म्हणून अनेक वेळा सभागृहात भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांनी बहुमताच्या जोरावार विरोधकांचा आवाज दाबण्याचा पयत्न केला.
यावेळी वाई शहराला वाचविण्यासाठी ही शेवटची संधी म्हणून महाआघाडीची स्थापना केली आहे.
भाजपाचे अविनाश फरांदे म्हणाले, सध्या राज्यात व केद्रात भाजपाची सत्ता असून वाई शहराचा विकास करण्याच्या दृष्टीने भाजपाचे नेतृत्व मान्य करून सर्व विरोधकांनी एकत्र येऊन सत्ता परिवर्तन करूया.
आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड म्हणाले, आम्ही राज्यात व केंद्रात महायुतीचे घटक आहोत शहरात चाललेला अनागोंदी कारभार थांबवून भ्रष्टाचारी सत्ताधार्‍यांकडून पालिकेची सुटका करण्यासाठी वाईकर नागरीकांनी महाआघाडीला साथ द्यावी.
 भाजपामुळेच वाईचा विकास होईल : खरात
माजी नगराध्यक्ष राजाभाऊ खरात भाजपामध्ये प्रवेश करताना म्हणाले की, मी नेहमी विकासाला साथ देणार असून माइया काळात विविध विकास कामे मार्गी लावली. पालिकेला लागणारा सर्व निधी पाठपुरावा करून मिळविला. राज्यात व केंद्रात सत्तास्थानी असणार्‍या भाजपाला साथ दिल्याशिवाय वाई शहराचा विकास होणे शक्य नाही. म्हणूनच मी तो दृष्टिकोन ठेवूनच भाजपा मध्ये प्रवेश केला आहे. यावेळी महाआघाडीतील पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशी आहे वाई विकास महाआघाडी
आघाडीचे अध्यक्ष शेखर शिंदे, उपाध्यक्ष अविनाश फरांदे, कार्याध्यक्ष विवेक पटवर्धन, निमंत्रक अशोक गायकवाड, सचिव विराज शिंदे, सहसचिव सचिन घाडगे, कोषाध्यक्ष विकास शिंदे, प्रचार प्रमुख चेतन मोरे, सदस्य – जितेंद्र गांधी , अजित खामकर, शिवाजी खरात, शेखर तावरे, आबासाहेब सुर्यवंशी, कुमार तांबेकर, श्रीमती विजयाताई भोसले, श्रीमती विजयाताई कुबेर व अस्लम बागवान यांचा समावेश आहे.

शेअर करा

Posted by on Oct 27 2016. Filed under प.महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google