Home » मराठवाडा » आज लातुरात भिक्खु संघदान सोहळा

आज लातुरात भिक्खु संघदान सोहळा

buddha-bhukhuजिल्हा प्रतिनिधी
लातूर, [२२ ऑक्टोबर] – टाऊन हॉलच्या मैदानावर रविवार, दि. २३ ऑक्टोबर रोजी वर्षावास समापन व भिक्खु संघदान सोहळा होणार असल्याची माहिती संयोजक केवश कांबळे व भिक्खु पय्यानंद यांनी दिली.
बौध्द धर्मात आषाढ पौर्णिमा ते अश्‍वनी पौर्णिमा हा कालावधी वर्षावास म्हणून गणला जातो. या कालावधीत भिक्खु बौध्द विहारात राहून चिंतन, अभ्यास करतात व उपासकांना उपदेश करतात. त्यानंतर भिक्खु गौतम बुध्दांच्या विचारासाठी भ्रमण करतात. भिक्खुंची उपजीविका ही उपासक व उपासिका यांच्यावरच अवलंबून असते त्यामुळे या कार्यक्रमाला संघदान सोहळा असे संबोधले जाते. रविवारी सकाळी ८.३० वाजता आंबेडकर चौकातून शहरातून मिरवणूक निघेल व ती टाऊन हॉल येथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ विसर्जन होईल. टाऊन हॉलच्या मैदानावर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत भिक्खु संघदान सोहळा होणार आहे. याप्रसंगी एस. टी. गायकवाड, लक्ष्मण कांबळे, बालाजी कांबळे, आदी उपस्थित राहणार आहेत.

शेअर करा

Posted by on Oct 22 2016. Filed under मराठवाडा. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google