Home » मराठवाडा » आ. सुभाष झांबड यांना अपात्र ठरवा

आ. सुभाष झांबड यांना अपात्र ठरवा

=औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल=
high-court-aurangabad-khandpeethप्रतिनिधी
औरंगाबाद, [२९ ऑक्टोबर] – स्थानिक स्वराज्य संस्था औरंगाबाद-जालन्याचे आमदार सुभाष झांबड यांनी नगरसेवक आणि जि.प. सदस्यांना सहलीवर नेऊन प्रलोभने दिली. तसेच स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहन कार्यक्रमास ते इतर सदस्यांना उपस्थित राहू दिले नाही. हा घटनेचा अवमान असून त्यांना अपात्र ठरविण्यात यावे या अशा आशयाची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे.
आमदार सुभाष झांबड यांनी २०१३ साली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ औरंगाबाद-जालना या मतदारसंघात निवडणूक लढवली. औरंगाबाद, जालनामधील जि.प., मनपा., नगरपरिषद व छावणी परिषदेचे सदस्य मतदार असल्याने त्यांनी मतदानात भाग घेतला. ५० पेक्षा जास्त मतांनी निवडणूक जिंकली. त्यांनी २०० पेक्षा जास्त मतदानावर करोडो रुपये खर्च करून देशात सहलीसाठी फिरवून हॉटेल्सवर व जेवनावळीवर करोडो रुपये खर्च केला. एकप्रकारे प्रलोभने देऊन त्यांनी भ्रष्ट पददतीचा अवलंब करून निवडणूक जिंकले. तसेच १५-८-२०१३ रोजी देशाचा ६६ स्वातंत्र्य दिन साजरा झाला, मात्र लोकप्रतिनिधींना झेंडावंदनाला हजर राहू दिले नाही. फक्त मतदानासाठी सर्व मतदार आणले. यामुळे राष्ट्रीय ऑनर कायदा १९७१ व त्यातील तरतुदीचा भंग केल्यामुळे त्यांना अपात्र ठरवावे, अशी याचिका मुस्लिम समाजसेवक शेख इकबाल खुलताबाद व सुनिल घुसले ग्रामपंचायत सदस्य यांनी पाठपुरावा केला. राज्यपाल, आयुक्त यांना निवेदने देऊन तसेच आझाद मैदानावर उपोषण केले. मात्र काहीही न्याय मिळाला नाही. शेवटी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याप्रकरणात अर्जदारातर्फे ऍड. चंद्रकांत ठोंबरे, ऍड. किरण ठोंबरे व ऍड. सुवर्णा मोहिते काम पाहत आहेत व सुनावणी सुटीनंतर ठेवण्यात आली आहे.

शेअर करा

Posted by on Oct 29 2016. Filed under मराठवाडा. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google