Home » मानसी » ऑनलाईन शॉपिंग करताय…

ऑनलाईन शॉपिंग करताय…

online-shoppingआजकाल ऑनलाईन शॉपिंगची नवी टूम निघाली आहे. ज्यांना खरेदीसाठी वेळ मिळत नाही, नोकरी असते, इतर कामांमध्ये व्यस्थ असणारे लोक ऑनलाईन शॉपिंगचा पर्याय निवडतात. ऑनलाईन शॉपिंगमध्ये फक्त इ-कॉमर्सच नव्हे, तर इतर मोठमोठ्या कंपान्याही उतरल्या आहेत. काही कंपन्या तर फक्त ऑनलाईनच विक्री करतात.
आजकाल खरेदीचा लुकच बदलेला दिसतो आहे. बाजारपेठांमध्ये ग्राहकांना विविध तर्‍हेने आकर्षित केले जाते. दुकानदार आता चिंतित आहेत, कारण त्यांचा प्रतिस्पर्धी अदृश्य आहे. म्हणजे काही लोक ऑनलाईनच शॉपिंग करून मोकळे होताहेत. ऑनलाईनमध्ये एखाद्या वस्तूची इतकी जाहिरात होते की, ग्राहक लगेच खरेदी करतो. ई-कॉमर्सवर एक क्लिक केले की, जगभरातील नवीन ब्रँड आपल्याला पाहण्यास मिळतात. त्यातून पर्याय शोधून घेणे मुश्कील होते; इतक्या व्हरायटीज पाहण्यास मिळतात. कोणतेही सामान असे नाही की तेथे मिळत नाही आणि त्यामध्ये तुमच्यापर्यंत वस्तू पोहोचल्यानंतर पैसे दिले तरी चालू शकतात. आता हप्त्यानेही एखादी वस्तू मिळण्याची व्यवस्था केली जाते आहे.
ऑनलाईन शॉपिंगमध्ये सेल आणि ऑफरही खूप निघतात. बाजारात जाऊन धूळ, गरमी, गर्दीत जाऊन खरेदी करण्याऐवजी ग्राहक ऑनलाईन शॉंपिंगला पंसती देत आहेत.
इतके असूनही सामान्य माणसाला ऑनलाईन शॉपिंग करणे सोपे व सहज नाही. कधीकधी त्याचे विचित्र किस्से, धोके वर्तमानपत्रांत वाचण्यास, पाहण्यास मिळतात. ऑनलाईन खरेदी केली जाणारी वस्तू दिसते तशी असतेच असे नाही. त्याचबरोबर या उद्योगाला आणखी व्यापक स्वरूप प्राप्त झाले नाही.
ऑनलाईन शॉपिंग करताना पुढील काळजी घ्यावी….
+तुम्ही आधी हे ठरवा की, काय खरेदी करायचे आहे आणि त्यासाठी तुम्ही किती पैसे मोजू शकता.
+प्रथमत: ऑनलाईन सर्चिंग करावे, जर आपण इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करणार असाल तर म्हणजे मोबाईल, टीव्ही, फ्रिज ….इ. कोणत्या कंपनीचे घ्यायचे आहे हे ठरवा आणि ठरविण्याआगोदर उत्पादनाविषयी माहिती आणि किमतीविषयी माहिती मिळवणे आवश्यक आहे.
+कोणतेही उत्पादन खरेदी करण्यापूर्वी त्यावरील रिव्हीयू वाचणे आवश्यक आहे. म्हणजे आपण वस्तू खरेदी करण्यापूर्वी पुन्हा एकदा विचार अथवा त्यांच्याशी चर्चा करता येते. यामुळे आपल्याला उत्पादनाविषयी माहिती मिळते.
+वस्तू वापस करण्यासंदर्भातही माहिती असणे आवश्यक आहे, कारण काही कंपनीतील वस्तू एकदा खरेदी केली की पुन्हा परत करणे अशक्य असते.
+कपडे, चप्पल, शूज, ज्वेलरी खरेदी करताना साईजवर लक्ष ठेवा. साईजसाठी एक चार्ट दिलेला असतो तो लक्षपूर्वक
वाचावा.
+सर्व बिल आणि पॅकिंग सांभाळून ठेवा. जर एखादी वस्तू परत करायची असेल तर या सर्वांची आवश्यकता भासते.
+जे काही उत्पादन खरेदी करायचे आहे, त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. ऑनलाईन शॉपिंग हे एक मायाजाळ आहे की, ज्यात फसून अनावश्यक वस्तूही खरेदी केल्या जातात.
+खाण्या-पिण्याचे सामान, औषधे यांची एक्स्पायरी डेट पाहून खरेदी करावी.
+ऑनलाईन शॉपिंगमध्ये धोका होण्याची शक्यता असते. त्यामुळे उच्च दर्जाच्या सामानाचीच आर्डर द्या.
+वेगवेगळ्या वेबसाईटवर खास उत्सवानिमित्त सेलही लागतात आणि डिस्काऊंटही दिले जाते. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी वेबसाईटवर एकवेळा सर्च करून भेट द्या.
अशा प्रकारे ऑनलाईन शॉपिंग करताना थोडीशी काळजी घेतल्यास आपल्याला खरेदीतील आनंद लुटता येईल.

शेअर करा

Posted by on Oct 23 2016. Filed under मानसी. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google