Home » परराष्ट्र, राष्ट्रीय » पाकचा कांगावा; म्हणे, भारतामुळेच तणाव!

पाकचा कांगावा; म्हणे, भारतामुळेच तणाव!

=संयुक्त राष्ट्रसंघात मागितली दाद=
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २४ नोव्हेंबर –
nawaz-sharif-sभारतासोबत वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करणारा पाकिस्तान आता संयुक्त राष्ट्रसंघाच्या दारात गेला आहे. गंभीर संकट निर्माण होण्याआधी संयुक्त राष्ट्राने या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी मागणी पाकिस्तानने केली आहे.
संयुक्त राष्ट्रसंघातील पाकिस्तानच्या राजदूत मलीहा लोदी यांनी राष्ट्रसंघाचे पदाधिकार्‍यांची आज गुरुवारी भेट घेतली. भारत-पाकिस्तानदरम्यान नियंत्रण रेषेवरील तणावामुळे आंतरराष्ट्रीय शांततेला धोका असल्याचा आरोप यावेळी मलीहा यांनी केला. भारतच नियंत्रण रेषेवर तणाव निर्माण करत असल्याचा कांगावाही त्यांनी यावेळी केला. काश्मीरमध्ये मानवाधिकाराचे उल्लंघन होत असून, या प्रकरणावरून आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष भरकटवण्याचा भारताच उद्देश आहे, असा आरोप यावेळी पाकने केला. दरम्यान, भारताने केलेल्या गोळीबारात आमच्या तीन जवानांसहित ७ जण मारले गेल्याचा दावाही पाकने केला आहे.
आला आहे. मंगळवारी पाकिस्तानने केलेल्या हल्ल्लयात भारताचे तीन जवान शहीद झाले होते. यातील एका जवानाच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली होती. याप्रकरणी भारताकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते.

शरीफ यांच्या उलट्या बोंबा
इस्लामाबाद,२४ नोव्हेंबर – पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारतानेच गोळीबार करत आगळिक केल्याचा दावा केला आहे. नवाज शरीफ यांनी नियंत्रणरेषेवर करण्यात आलेल्या गोळाबाराचा निषेध करीत मृत पावलेल्या पाकिस्तानी जवानांना इस्लामाबादेत श्रद्धांजली वाहिली. भारत सहकार्य करीत नसून पाकिस्तान संयम बाळगण्याचा प्रयत्न करीत आहे, असेेही ते यावेळी म्हणाले.

शेअर करा

Posted by on Nov 25 2016. Filed under परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google