Home » सोलापूर » अपात्र उमेदवारांची आज मुंबईत कैफियत

अपात्र उमेदवारांची आज मुंबईत कैफियत

=निवडणूक आयोगापुढे हजेरी लावणार=
smcविशेष प्रतिनिधी
सोलापूर, दि. २४ ऑक्टोबर –
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गत पराभवानंतरही पुन्हा बाशिंग बांधण्याची तयारी केलेले ते अपात्र उमेदवार आज निवडणूक आयोगासमोर हजेरी लावून आपली कैफियत मांडणार आहेत. या ठिकाणी दयायाचना करणार असून त्यानंतर आयोग अंतिमत: निर्णय घेणार आहे. पण प्राप्त माहितीनुसार एकदा डीबार केल्यानंतर त्या उमेदवारांना निवडणूक लढवण्यासाठी तीन वर्षाकरिता घातलेली बंदी मागे घेतली जाण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे अजूनही २१९ अपात्र उमेदवारांचे भवितव्य अंधातरीच आहे.
तरुण भारतमध्ये २० ऑक्टोबर रोजी २१९ अपात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द झाल्यानंतर अन्य इच्छुक उमेदवारांना हायसे वाटले होते. मुंबई उच्च न्यायालयाने गत सोमवारी २१९ पैकी दाखल केलेल्या १७ अपात्र उमेदवारांची याचिका फेटाळून लावताना निवडणूक आयोग अथवा विभागीय आयुक्ताकंडे दाद मागण्याचा सल्ला दिला होता.
या दरम्यान २५ तारखेला निवडणूक आयोगाकडे हजर राहण्याबाबत संबंधित उमेदवारांना कळवले आहे.
तसेच पालिकेचे उपायुक्त श्रीकांत म्याकलवार आणि वरिष्ठ श्रेणी लिपीक फुले हे देखील सोमवारी रात्री मुंबईस रवाना झाले आहेत. यावेळी अपात्र १७ उमेदवार आपली कैफियत मांडणार आहेत. त्यांच्यासाठी तगडे वकील नियुक्त केले असून या उमेदवारांची ही अंतिम लढाई मानली जाते. या १७ उमेदवारांमध्ये माजी महापौर ख्वाजा दाऊद नालबंद, मकबूल मोहोळकर, सिद्राम व्हनमोरे, नारायण माशाळकर, सुवर्णा आणि अंबादास चिंता, हेमंत पिंगळे आदींचा समावेश आहे.

शेअर करा

Posted by on Oct 25 2016. Filed under सोलापूर. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google