Home » सोलापूर » भाजपा, मित्रपक्षांना नगराध्यक्षासह १० जागा?

भाजपा, मित्रपक्षांना नगराध्यक्षासह १० जागा?

=न.प. निवडणुकीसाठी परिचारक गटाची व्यूहरचना=

pandharpur-nagar-parishad

प्रतिनिधी
पंढरपूर, [दि. २३ ऑक्टोबर] – आ. प्रशांत परिचारक प्रणित शहर विकास आघाडीच्यावतीने पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक ही भाजपा व मित्रपक्षांना बरोबर घेवून लढविण्यात येणार आहे. यामध्ये भाजपसह मित्रपक्षांना नगराध्यक्ष पदासह १० जागा देण्यात येणार असल्याची चर्चा मतदारांतून होत आहे.
पंढरपूर नगर परिषदेसाठी दि. २७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यासाठी आज सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होत आहे. आ. प्रशांत परिचारक यांची शहर विकास आघाडी व आ. भारत भालके यांच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीमध्ये ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीत आ. प्रशांत परिचारक गटाने भाजपासह समविचारी पक्ष, संघटनांना बरोबर घेवून ही निवडणूक लढविणार असल्याचे

जाहीर केले आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात होत असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आ. खा. शरद बनसोडे यांनी पंढरपुरात येवून भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर माजी आ.सुधाकरपंत परिचारक, आ. प्रशांत परिचारक यांची भेट घेवून चर्चा केली. पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या बरोबर चर्चा झाल्यानंतर आ. परिचारक गटाकडून मित्रपक्षांना नगराध्यक्ष पदासह १० जागा देण्यात येणार आहेत. यामध्ये भाजप ५, शिवसेना २, रिपाइं, रासप व इतरांना प्रत्येकी १ जागा देण्यात येणार आहे. नगराध्यक्ष पद भाजपाला मिळणार असल्याची चर्चा या बैठकीत झाली असल्याचे समजते. भाजप ही निवडणूक पक्षाच्या कमळ या चिन्हावर लढविणार आहे.
निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर चर्चा करण्यासाठी ४ दिवसांपूर्वी आ. परिचारक गटाची बैठक इसबावी येथे घेण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना माजी आ.सुधाकरपंत परिचारक यांनी केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता आहे. यामुळे न.पा. निवडणुकीत भाजपाशी चर्चा करण्याचे सुतोवाच केले होते. त्यानुसार घडामोडी घडत आहेत

शेअर करा

Posted by on Oct 24 2016. Filed under सोलापूर. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google