Home » सोलापूर » मनपा प्रभाग रचना; ७० हरकती दाखल

मनपा प्रभाग रचना; ७० हरकती दाखल

=• आक्षेप घेणार्‍यांमध्ये तीन माजी महापौर=
=• कोल्हेंच्या प्रभागावर राष्ट्रवादीचा आक्षेप=
smcविशेष प्रतिनिधी
सोलापूर, [दि. २५ ऑक्टोबर] – सोलापूर महापालिका प्रभाग रचनेसंदर्भात ७० हरकती दाखल झाल्या असून माजी अ‍ॅड. बेरिया, मनोहर सपाटे, संजय हेमगड्डी यांच्यासह ७० हरकती प्राप्त झाल्या आहेत. प्रभाग क्र. ६ बाबत राष्ट्रवादीकडूनच तीन हरकती आल्या असून या ठिकाणाहून दिलीप कोल्हे निवडणूक लढण्यास सज्ज असल्याचे मानले जाते.
मंगळवारी २५ ऑक्टोबर हा शेवटचा दिवस होता. शेवटच्याच दिवशी ४२ हरकती आल्या. तक्रारदारांच्या मुख्य आक्षेपामध्ये एकसदस्यीय प्रभाग रचनाच हवी, अशी मागणी पुढे आली आहे. तसेच सभापती रियाज हुंडेकरी, नगरसेवक भंडारे, चंदनशिवे, कारंडे, वानकर, यांच्यावतीने काही ठिकाणी स्वत: तर अन्य त्रकारदार पुढे आल्याचे दिसते. प्रभाग ६ च्या रचनेबाबत मनोहर सपाटे, अ‍ॅड.बाबासाहेब सपाटे, सुनीता कारंडे यांच्याही तक्रार आल्या असून त्यामुळे कुतूहल जागे झाले आहे. याशिवाय नलिनी कलबुर्गी, देवता माळी, सरवदे, विजय फुटाणे यांच्याही तक्रारी आल्या आहेत.

आधी तक्रार, नंतर मौन, पुन्हा..
प्रभाग रचनेबाबत बेरिया यांची प्रारंभी तक्रार होती. निवडणूक लढण्यास आरक्षण अनुकूल आल्यानंतर मात्र मौन पाळले. आज मात्र बेरिया तक्रादारात पुढे आले आहेत.

शेअर करा

Posted by on Oct 26 2016. Filed under सोलापूर. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google