Home » सोलापूर » माजी आमदार महादेव पाटील अनंतात विलीन

माजी आमदार महादेव पाटील अनंतात विलीन

mahadev-patilअक्कलकोट ३० ऑक्टोबर, (प्रतिनिधी)  राष्ट्रवादी कॉग्रेसचे जेष्ठ नेते माजी आमदार महादेव पाटील यांच्या पार्थिवावर रविवारी सायंकाळी जेऊर ता.अक्कलकोट येथे शोकाकुल वातावरणात अत्यंसंस्कार करण्यात आले.त्यांचे अंत्यदर्शन करण्यासाठी सर्वत्र क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.जेऊर गावचे सुपुत्र ते १० वर्षे आमदार,दहा वर्षे सभापती, सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक, काशिविश्वेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, विजयसिंह यांचे समर्थक म्हणुन कित्येकांचे कामे केली होती. या वेळी सर्वच पक्षातील नेतेमंडळी, नागरिक उपस्थित होते. माजी आमदार महादेव पाटील यांचे शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास श्रीशैलम आंधप्रदेश येथे हदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले होते. त्यांचे पार्थिव रविवारी पहाटे जेऊर येथील राहत्या घरी आणण्यात आले. त्यानंतर त्यांच्या अत्यंदर्शनासाठी जनसागर लोटला होता. यावेळी पंचकोशीतील सर्व महाराज, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार सिध्दाराम म्हेत्रे, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, सचिन कल्याणशेटटी, दिलीप माने, भारत जाधव, सातलिंगप्पा म्हेत्रे, आनंदराव देवकते, राजशेखर शिवदारे, धर्मराज काडादी, दीपक साळुंके, दिलीप सोपल, मनोहर डोंगरे, लक्ष्मण ढोबळे, जन्मेजय भोसले, सभापती महेश जानकर, श्रीशैल नरोळे, महेश इंगळे, इंडी आमदार यशवंत पाटील, औसा आमदार बसवराज पाटील, मलकया गुत्तेदार, सुभाष गुत्तेदार, जयमाला गायकवाड, महादेव चाकोते आदीसह तालुका जिल्हयातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा

Posted by on Oct 31 2016. Filed under सोलापूर. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google