Home » सोलापूर » सोलापुरात ९ नगरपालिकांसाठी ७३ टक्के मतदान

सोलापुरात ९ नगरपालिकांसाठी ७३ टक्के मतदान

=सांगोल्यात सर्वाधिक ८४.४१ मतदान=
प्रतिनिधी,
सोलापूर, दि. २७ नोव्हेंबर –
nagar-palika-election-solapur-districtरविवारी झालेल्या नगरपालिका नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी मतदानासाठी सरासरी ७३.२७ टक्के मतदान झाला असून, सर्वाधिक सांगोला नगरपरिषदेसाठी ८४.४१ टक्के मतदान झाला आहे. तर सर्वात कमी पंढरपूर नगरपरिषदेसाठी ७० टक्के मतदान झाला आहे. २ लाख १७ हजार ८०६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, आज सोमवारी दि. २८ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ९ नगरपालिकांच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी रविवारी मतदान प्रक्रीया पार पाडली. यात कुर्डूवाडी, मंगळवेढा, अक्कलकोट, दुधनी, मैंदर्गी, पंढरपूर, सांगोला, बार्शी, करमाळा या नऊ नगरपालिकांचा समावेश असून, उमेदवारांचे भवितव्य मतयंत्रात सिल झाली आहे. नऊ नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी ४८ उमेदवारांनी मतदारांकडून कौल मागितला आहे. तर नगरपालिकेच्या २०२ जागासाठी ७३१ उमेदवार रिंगणात होते.
नऊ नगरपालिकांसाठी २ लाख ९५ हजार १६० मतदार होते. त्यात २ लाख १७ हजार ८०६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर १ लाख १३ हजार ५३२ पुरूष मतदार तर १ लाख ४ हजार २७३ महिला मतदारांनी आपला राजकीय कारभारी निवडला आहे. तालुकानिहाय मतदान टक्केवारी – ७१.६७, करमाळा ७८.२६, मंगळवेढा – ७७.६३, मैंदर्गी – ७४.८९, दुधनी – ७२.३०, बार्शी – ७३.२७, कुर्डूवाडी – ७३.०८, पंढरपूर – ७०, सांगोला – ८४.४१.

शेअर करा

Posted by on Nov 28 2016. Filed under सोलापूर. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google