Home » सोलापूर » हेतू शिवाय केलेली भक्तीच समर्पित होते: विवेक घळसासी

हेतू शिवाय केलेली भक्तीच समर्पित होते: विवेक घळसासी

=अमृतवाणीच्या दुसर्‍या दिवशी ऍम्फि थिएटर भरगच्च=
vivek-ghalsasiसोलापूर, [२२ ऑक्टोबर, प्रतिनिधी] – मनात कोणताही हेतू, अपेक्षा न ठेवता केलेली भक्तीच ईश्‍वराला समर्पित होते. आणि तीच ईश्‍वराची परम साधना आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांनी केले. विवेकाची अमृतवाणी या प्रवचनमालेचे दुसरे पुष्प गुंफताना त्यांनी भक्ती प्रेम यावर विवेचन केले. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा दक्षिण सोलापूर, रंगकर्मी प्रतिष्ठान आणि आर्यन क्रिएशन सोलापूर यांच्या वतीने दिपावलीच्या पूर्वसंध्येला बौध्दिक मेजवाणी म्हणून ऍम्फि थिएटरमध्ये दररोज सकाळी ६.३५ वा. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे हे ८ वे वर्ष आहे रामप्रहरी सरोवरातीरी याविषयावर नारद भक्ती सूत्रावरील विवेचन होत आहे.
जे कर्म करतो ते पूर्णपणे जाणीवपूर्ण असले पाहिजे उद्देशपूर्ण कर्म ईश्‍वराची पूजा आहे. भक्ती अमृत स्वरूप आहे. दृढ भक्तीतून परमप्रेम निर्माण होते. भक्तीतून आपले आचरण भगवंताला अपर्ण केले पाहिजे. प्रत्येक श्‍वासाचे नाते परमात्म्याशी जोडल्याने जीवनाचे सार्थक होते. पुराण कालात नारद हे कळ लाव्या म्हणूनच प्रसिध्द होते परंतु नारद मुनी हे नेहमी कळीचे मुद्दे सांगत होते. म्हणूनच नारद भक्ती सूत्राला महत्वाचे स्थान आहे. चित्त आहे ते चिंतन करते. मन, चित्त, बुध्दी ईश्‍वराच्या भक्तीसाठी आहे आणि निरपेक्ष भावनेने भक्ती झाली पाहिजे. असेही निरूपणकार विवेक घळसासी यांनी सांगितले. प्रारंभी मंगळवेढा येथून गेल्या चार वर्षापासून पहाटे मोटारसायकलवरून या कार्यक्रमाला हजेरी लावणार्‍या श्रोत्याच्या हस्ते विवेक घळसासी याना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. दोन दिवसापासून सुरू असलेल्या या विवेकाची अमृतवाणी प्रवचन मालेचे रविवार दि. २३ ऑक्टोंबर रोजी सकाळी ६.३५ वा. अंतिम पुष्प आहे रसिक श्रोत्यांनी वेळेआधी येऊन आसनस्थ व्हावे.

शेअर करा

Posted by on Oct 22 2016. Filed under सोलापूर. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google