ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश(सीनियर) यांचे निधन

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश(सीनियर) यांचे निधन

ह्युस्टन, १ डिसेंबर –

George Bush Senior

George Bush Senior

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश (सीनियर) यांचे आज शनिवारी सकाळी दीर्घ आजारामुळे निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. ते अमेरिकेचे ४१ वे राष्ट्राध्यक्ष होते आणि त्यांच्याच कार्यकाळात सोव्हिएत युनियन ऑफ रशियाचे पतन झाले होते.
बुश यांना पार्किनसन आजाराने ग्रासले होते. गेल्या काही वर्षांपासून ते व्हिलचेअरवरच होते. काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती सतत खालावत होती. या वर्षी १७ एप्रिल रोजी त्यांची पत्नी बार्बरा बुश यांचे निधन झाले होते. बार्बरा यांच्या निधनानंतर त्यांना मोठा धक्का बसला होता. त्यातच २३ एप्रिल रोजी त्यांना रक्ताचा संसर्ग झाल्याने, रुग्णालयात भरती करण्यात आले होते. १३ दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. यानंतर त्यांना रक्तदाब आणि अन्य आजारांनीही ग्रासले. यातच त्यांचे आज निधन झाले. त्यांचे पुत्र आणि माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश (ज्युनियर) यांनी त्यांच्या निधनाची माहिती जाहीर केली.
जॉर्ज बुश यांचा जन्म १२ जून १९२४ रोजी झाला होता. जॉर्ज हर्बर्ट वॉकर बुश असे त्यांचे पूर्ण नाव. त्यांनी १९८९ ते १९९३ या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला होता. राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होण्याआधी बुश १९८१ ते १९८९ या काळात अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष होते. त्यांची राजकीय कारकीर्द तीन दशकांची होती.
दुसर्‍या महायुद्धात अमेरिकन सैन्यात राहून त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. सीनियर बुश यांनी अमेरिकेला शीतयुद्धातून बाहेर काढण्यास मोठी मदत केली होती. ते टेक्सासचे खासदार होते. याशिवाय ते सीआयएचे संचालकही होते. बुश यांच्या कार्यकाळातच अमेरिकेने १९९१ मध्ये खाडी युद्ध जिंकले होते. त्यांच्या नेतृत्वात अमेरिकन फौजांनी इराकचा पराभव केला होता. मात्र, त्यानंतरच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांना बिल क्लिटंन यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता.
डोनाल्ड ट्रम्प यांना दु:ख
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुश यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. शीतयुद्धाच्या काळात त्यांनी आपल्या नेतृत्वात अमेरिकेची शान राखली होती. त्यांचे नेतृत्व कणखर असेच होते, अशा शब्दात ट्रम्प यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. मी आणि माझी पत्नी मेलानिया बुश यांच्या परिवाराच्या सदस्यांच्या दु:खात सहभागी आहोत.
जागतिक नेत्यांचे शोकसंदेश
बुश यांच्या निधनाची माहिती कळताच जगभरातून दुखवटा व्यक्त करण्यात आला. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन, जपानचे पंतप्रधान शिंझो आबे, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्यासह विविध देशांच्या प्रमुखांनी त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे.

Posted by : | on : 2 Dec 2018
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (58 of 411 articles)

India Russia And China
राष्ट्र, डब्ल्यूटीओमध्ये बदल करण्याचे आवाहन, ब्युनोस आयर्स, १ डिसेंबर - भारत, रशिया आणि चीन या देशांमध्ये तब्बल १२ वर्षांनंतर त्रिपक्षीय ...

×