ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » एफ-१६च्या मोजणीबाबत ‘पेंटॅगॉन’चे कानावर हात

एफ-१६च्या मोजणीबाबत ‘पेंटॅगॉन’चे कानावर हात

•पाकिस्तान पडला तोंडघशी,
वॉशिंग्टन, ७ एप्रिल –

Us White House

Us White House

एफ-१६ विमानांच्या मोजणीबाबत अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय असलेल्या ‘पेंटॅगॉन’ने याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे म्हटले आहे. ‘पेंटॅगॉन’च्या या वक्तव्यामुळे पाकिस्तान चांगलाच तोंडघशी पडला आहे.
पाकिस्तानची सर्व एफ-१६ विमाने सुरक्षित असल्याचा दावा ‘फॉरेन पॉलिसी’ या अमेरिकी मासिकाने केला होता. अमेरिकास्थित ‘फॉरेन पॉलिसी’ मासिकात प्रसिद्ध झालेल्या लेखात अमेरिकेने पाकिस्तानला दिलेल्या सर्व एफ -१६ विमानांची मोजणी केली असून, या मोजणीत पाकिस्तानच्या ताफ्यातील सर्व एफ-१६ विमानांची संख्या ही पूर्वीइतकीच आहे, असे या मासिकाने म्हटले होते. विशेष म्हणजे अमेरिकेच्या दोन सुरक्षा अधिकार्‍यांच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले होते. त्यानंतर पाकिस्तानने आपले कुठलेही विमान भारताने पाडले नसल्याचा बराच गवगवा केला होता.
मात्र, ‘पेंटॅगॉन’च्या निवेदनामुळे पाकिस्तानच्या दाव्यातील हवा निघाली आहे. भारतीय वायुदलाने ‘फॉरेन पॉलिसी’ मासिकाच्या दाव्याचे खंडन करताना विमानातील कॅमेरा आणि रडारचे पुरावे यांचाही दाखला दिला होता. भारतीय वायुदलाने २६ फेब्रुवारीला पहाटे गुलाम काश्मीरमधील बालाकोट परिसरात एअर स्ट्राईक केला. त्यानंतर २७ फेब्रुवारीला पाकिस्तानी विमानांच्या तुकडीने भारतीय हद्दीत प्रवेश केला. त्यावेळी अभिनंदन यांनी आपल्या बायसन मिग-२१ विमानाने पाकच्या एफ-१६ विमानाचा पाठलागही केला. मिग-२१मधून सोडण्यात आलेल्या क्षेपणास्त्राने एफ-१६ विमानाचा वेध घेतला होता, असेही भारतीय वायुदलाने म्हटले होते.
दरम्यान, ‘पेंटॅगॉन’ने ‘फॉरेन पॉलिसी’ मासिकाच्या दाव्यापासून स्वत:ला तटस्थही ठेवले आहे. हा दोन देशांमधील मामला असून, विमानांच्या मोजणीचा अहवाल अशा पद्धतीने जाहीर करण्यात येत नाही, अशी भूमिका ‘पेंटॅगॉन’ने घेतली आहे. २७ फेब्रुवारीला पाकिस्तानने त्यांचे एफ-१६ विमान गमावल्याप्रकरणी कुठली चौकशी करण्यात आल्याबाबतही आपल्याला ठाऊक नसल्याचे ‘पेंटॅगॉन’तर्फे जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
‘पेंटॅगॉन’च्या भूमिकेमुळे काही प्रश्‍नही आता निर्माण होऊ शकतात. पाकिस्तानने आपल्या मित्र राष्ट्रांपैकी कुठल्या देशाचे एफ-१६ विमान वापरले होते काय, ही शंका घेण्यासही जागा आहे. पाकिस्तान बरेचदा जॉर्डन, इजिप्त आणि तुर्कस्तान या देशांसोबत संयुक्तरीत्या हवाई युद्धाचा सराव करीत असतो, याकडे एका माजी भारतीय लढाऊ वैमानिकाने लक्ष वेधले आहे.
‘एफ-१६’च्या क्षेपणास्त्राचे अवशेष भारतात कसे? : संरक्षण मंत्री सीतारामन् यांचा अमेरिकेला सवाल
नवी दिल्ली – पाकिस्तानची सर्व एफ-१६ विमाने सुरक्षित असल्याचा ‘फॉरेन पॉलिसी’ या अमेरिकन मासिकाचा दावा संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन् यांनी फेटाळला आहे. एफ-१६ विमानाच्या क्षेपणास्त्राचे अवशेष भारतात कसे सापडले, असा सवाल त्यांनी अमेरिकेला विचारला आहे. सीतारामन् यांनी शनिवारी एका ट्विटद्वारे हा सवाल केला.
अमेरिकन मासिकाचे वृत्त पूर्णपणे निराधार असून, हे वृत्त देण्यापूर्वी संबंधित मासिकाने माहिती आणि तथ्यांची खातरजमा करून घ्यायला पाहिजे होती. कारण, भारतीय हद्दीत अ‍ॅमराम क्षेपणास्त्राचे अवशेष सापडले आहेत. हे क्षेपणास्त्र केवळ एफ-१६ विमानामध्येच असते. याशिवाय, भारताकडे एफ-१६ विमानाने भारतीय हद्दीत प्रवेश केल्याचे इलेक्ट्रॉनिक सिग्नल असलेले पुरावेही आहेत, असे सीतारामन् यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Posted by : | on : 8 Apr 2019
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (19 of 505 articles)

Pakistan Flag
व्यक्त केली भीती, इस्लामाबाद, ७ एप्रिल - भारत १६ ते २० एप्रिल या काळात पाकिस्तानवर आणखी एक हल्ला करण्याची योजना ...

×