ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » करतारपूर कॉरिडॉरच्या उद्घाटनापूर्वीच पाकमध्ये खलिस्तानवाद्यांचे फलक

करतारपूर कॉरिडॉरच्या उद्घाटनापूर्वीच पाकमध्ये खलिस्तानवाद्यांचे फलक

►२०२० मध्ये जनमत घेण्याची मागणी
►आयएसआयची खेळी,
इस्लामाबाद, २७ नोव्हेंबर –

Khalistan Poster Katarpur

Khalistan Poster Katarpur

करतारपूर कॉरिडॉर अनंत काळाच्या शांततेचा मार्ग आहे, असे वक्तव्य करणारे काँग्रेसचे आमदार नवज्योतसिंग सिद्धू तोंडघशी पडण्याची शक्यता आहे. करतारपूर कॉरिडॉरच्या उद्घाटनाच्या एक दिवस आधीच या भागात खलिस्तानवाद्यांनी फलक फडकावून स्वतंत्र खलिस्तानसाठी २०२० मध्ये जनमत घेण्यात यावे, अशी मागणी केली. पाकिस्तानची पाताळयंत्री गुप्तचर संस्था आयएसआयची ही कुटिल खेळी असल्याचे सांगितले जात आहे.
करतारपूर कॉरिडॉरच्या उद्घाटनासाठी काँग्रेस आमदार नवज्योतसिंग सिद्धू आणि केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल पाकिस्तानला रवाना झाले असताना, त्याच दिवशी खलिस्तानवाद्यांची येथे एक बैठक झाली. या बैठकीत खलिस्तानसाठी २०२० मध्ये जनमत घेण्याची योजना आखत खलिस्तानवाद्यांनी या भागात फलकही फडकावले. या भागात खलिस्तानवादी दहशतवादी जर्नेलसिंग भिंद्रानवालेचे पोस्टरही लावण्यात आल्याचे वृत्त आहे.
या सोहळ्यास भारताच्या केंद्रीय मंत्र्यांना पाठवण्याचे स्वागत करीत भारताचा हा सकारात्मक प्रतिसाद असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. दुसरीकडे मात्र खलिस्तानवाद्यांना आयएसआयच्या माध्यमातून पाठबळ देण्याचे धोरणही पाकिस्तानने स्वीकारले. केंद्र सरकार आयएसआयच्या या कुटिल डावावर नजर ठेवून आहे. भाजपा दिल्ली प्रदेशाचे प्रवक्ते तेजिंदरपालसिंग बग्गा यांनी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी २०२० मध्ये जनमत घ्या, असे लिहिलेले टी-शर्टस् पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना निषेध म्हणून पाठवले आहेत.
दरम्यान, करतारपूर येथील दरबार साहीब गुरुद्वाराचे दर्शन घेण्यासाठी अमेरिकेतील एक लाख भाविकांना व्हिसा देण्यात यावा, अशी मागणी अमेरिकेतील फुटीरतावादी संघटना ‘सिख्स फॉर जस्टिस’ने (एसएफजे) पाकिस्तान सरकारला केली आहे.
सिद्धूला मज्जाव केला होता : अमरिंदर सिंग
अमृतसर : माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू पुन्हा एकदा पाकिस्तानच्या दौर्‍यावर गेले आहे. मात्र, त्यासाठी त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचे आदेश झुगारून हा दौरा केला असल्याची माहिती समोर आली आहे. स्वत: मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी ही माहिती दिली आहे. मी मज्जाव केल्यानंतरही सिद्धू पाकिस्तानला गेले असल्याचे स्पष्टीकरण अमरिंदर सिंग यांनी दिले आहे.
माजी क्रिकेटपटू व पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या निमंत्रणावरून सिद्धू करतारपूर साहीब कॉरिडोरच्या शिलान्यास समारंभात सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला गेले आहेत. मी बाबा नानक साहेबांचा संदेशवाहक म्हणून येथे आलो आहे. येथे येण्यासाठी मला कोणत्याही केंद्रीय मंत्र्याने टोकले नाही, असे पाकिस्तानमध्ये दाखल झाल्यानंतर सिद्धूने म्हटले आहे.
याआधीही इम्रान खान यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली त्या समारंभाला उपस्थित राहण्यासाठीही नवज्योतसिंग सिद्धूने पाकिस्तानचा दौरा केला होता. इम्रान खान पंतप्रधान झाल्यापासूनच हा सिद्धूचा हा दुसरा पाकिस्तान दौरा आहे. त्यावेळीही त्यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली नव्हती. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनाही या शिलान्यास समारंभासाठी निमंत्रण पाठविण्यात आले होते मात्र त्यांनी पाक दौरा करण्यास नकार दिला होता. ‘त्यांची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे,’ अशी प्रतिक्रिया अमरिंदर यांनी सिद्धूच्या पाक दौर्‍यावर दिली. मी सिद्धूलाही पाकिस्तान दौर्‍यावर जाऊ नको, असे सांगितले होते. मात्र, त्यांनी माझे ऐकले नाही आणि ते या दौर्‍यावर गेले, असेही अमरिंदर सिंग यांनी सांगितले.

Posted by : | on : 28 Nov 2018
Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, आशिया (65 of 411 articles)

Nasa Logo
कोटी मैलांचा यशस्वी प्रवास, कॅलिफोर्निया, २७ नोव्हेंबर - अमेरिकेच्या नासाचे रोबोटिक इन्साईट लॅण्डर सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास मंगळ ग्रहावर यशस्वीपणे उतरले. ...

×