ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, युरोप » ज्युलियन असांजीला ब्रिटनमध्ये अटक

ज्युलियन असांजीला ब्रिटनमध्ये अटक

•इक्वाडोरच्या दूतावासातून उचलले,
लंडन, ११ एप्रिल –

Julian Assange

Julian Assange

विकीलिक्सचा सहसंस्थापक ज्युलियन असांजीला आज गुुरुवारी लंडनमधील इक्वाडोरच्या दूतावासातून अटक करण्यात आली. दक्षिण अमेरिकी देशाने त्याला आश्रय नाकारल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
स्कॉटलंड यार्डने त्याच्या अटकेच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. जामिनाच्या अटी मोडल्याने त्याच्या विरोधात जून २०१२ मध्ये काढण्यात आलेल्या अटक वॉरंटची अंमलबजावणी करीत आपल्या अधिकार्‍यांनी त्याला अटक केली, अशी माहिती स्कॉटलंड यार्डने दिली.
अमेरिकेत प्रत्यार्पण होण्याच्या भीतीने असांजी सात वर्षांपासून इक्वाडोर दूतावासाच्या मागील खोलीत राहत होता. त्याने अमेरिकेची अनेक प्रकरणे चव्हाट्यावर आणली असून, या देशात चौकशीदरम्यान छळ होईल, तसेच मृत्युदंडाची शिक्षाही ठोठावली जाईल, अशी भीती असल्यानेच तो येथे दडून बसला होता.
त्याला सध्या लंडन पोलिस ठाण्याच्या कोठडीत ठेवले असून, लवकरच वेस्टमिन्स्टर न्यायालयासमोर हजर केले जाईल, असे महानगर पोलिसांनी (एमपीएस) निवेदनात म्हटले आहे. न्यायालयासमोर शरण न आल्याने त्याच्याविरोधात याच न्यायालयाने २९ जून २०१२ रोजी वॉरंट बजावण्यात आले होते, असेही या निवेदनात म्हटले आहे.
वेस्टमिन्स्टर न्यायालयाच्या वतीने वॉरंटची अंमलबजावणी करणे महानगर पोलिसांचे कर्तव्य होते आणि इक्वाडोरने आश्रय नाकारल्यानंतर राजदूतांनीच पोलिसांना बोलावले, असेही या निवेदनात म्हटले आहे.
आश्रय नाकारण्याचा सार्वभौम अधिकार ः इक्वाडोर
क्विटो ः असांजीला राजकीय आश्रय नाकारण्याचा निर्णय घेताना आम्ही आपल्या सार्वभौम अधिकारांचा वापर केला, असे इक्वाडोरचे राष्ट्रपती लेनिन मोरेनो यांनी आज गुरुवारी स्पष्ट केले आहे. त्याने अधिवासाच्या आंतरराष्ट्रीय परंपरा आणि शिष्टाचारांचा भंग केल्याने हा निर्णय घेण्यात आला, असेही त्यांनी सांगितले.
इक्वाडोरचा निर्णय बेकायदेशीर ः विकीलिक्स
लंडन ः इक्वाडोरने बेकायदेशीररीत्या असांजीचा आश्रय नाकारला, असा आरोप विकीलिक्सने केला आहे. त्याच्या अटकेसाठी लंडनमधील इक्वाडोरच्या राजदूतानेच लंडन पोलिसांना इमारतीत बोलावले. इक्वाडोरने आश्रय नाकारून आंतरराष्ट्रीय कायदे मोडले आहेत. दूतावासात पोलिसांना बोलावल्यावर लगेच त्याला अटक करण्यात आली, असे विकीलिक्सने ट्विटरवर म्हटले आहे.
पत्रकारिता स्वातंत्र्यासाठी काळी घटना ः एडवर्ड स्नोडेन
मॉस्को ः देश सोडून फरार झालेला अमेरिकेचा माजी कंत्राटदार एडवर्ड स्नोडेनने असांजीच्या अटकेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करीत, ही पत्रकारिता स्वातंत्र्यासाठी काळी घटना असल्याचे म्हटले आहे. ब्रिटनच्या पोलिसांना त्याला अटक करण्यासाठी दूतावासात निमंत्रित केल्याने इक्वाडोरच्या राजदूतांची प्रतिमा डागाळली आहे, असे ट्विट या व्हिसलब्लोअरने केले आहे.

Posted by : | on : 12 Apr 2019
Filed under : आंतरराष्ट्रीय, युरोप.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, युरोप (14 of 505 articles)

Imran Khan 1
खान यांचे वक्तव्य, इस्लामाबाद, १० एप्रिल - भारतात नरेंद्र मोदी यांची सत्ता आली, तरच भारत-पाकिस्तान या दोन देशांमध्ये शांततेवर चर्चा ...

×