ads
ads
राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

►राफेल करारावर सर्वोच्च शिक्कामोर्तब ►निर्णय प्रक्रियाही संशयातीत • ►सर्व…

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – राफेलवरून सातत्याने खोटे बोलणार्‍या…

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » नासाचे इन्साईट लॅण्डर मंगळावर उतरले

नासाचे इन्साईट लॅण्डर मंगळावर उतरले

►३० कोटी मैलांचा यशस्वी प्रवास,
कॅलिफोर्निया, २७ नोव्हेंबर –

Nasa Logo

Nasa Logo

अमेरिकेच्या नासाचे रोबोटिक इन्साईट लॅण्डर सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास मंगळ ग्रहावर यशस्वीपणे उतरले. मंगळाचे गूढ उकलण्यासाठी हे लॅण्डर या ग्रहावरील दगडांवर खोदकाम करणार आहे, तसेच मंगळाची अंतर्गत रचना पृथ्वीपेक्षा किती वेगळी आहे, याचाही शोध ते घेणार आहे.
मंगळवारी उतरताच या लॅण्डरने काही सिग्नल्स पाठविले. लॅण्डरवरील सौर पॅनेल्स उघडले असून, मंगळवारी पडणार्‍या सूर्यप्रकाशाचे नमुनेही गोळा केले आहेत, असे त्यात नमूद आहे. हे सिग्नल्स पृथ्वीवर आज मंगळवारी साडेपाच वाजता प्राप्त झाले. लॅण्डरला सूर्यप्रकाश मिळत असल्याने त्यातील बॅटरी आपोआपच रिचार्ज होणार आहे, हे विशेष.
हे यान सतत सहा महिने सुमारे ३० कोटी मैलांचा प्रवास करून मंगळावर यशस्वीपणे उतरले आहे. या ऐतिहासिक घटनेचे नासाने थेट प्रेक्षपण केले आहे. मंगळाच्या कक्षेत पोहोचताना इन्साईट लॅण्डरचा वेग ताशी १९,८०० किलोमीटर इतका होता, मात्र उतरताना त्याचा वेग कमी होऊन ताशी ८ किलोमीटर इतका झाला होता. हे यान मंगळावर उतरतानाची प्रक्रिया सात मिनिटांपर्यंत सुरू होती. यान मंगळावर उतरले, तेव्हा वैज्ञानिकांनी एकमेकांना आलिंगन देऊन प्रचंड जल्लोष केला. नासाचे प्रमुख जिम ब्राइडस्टाइन यांनी यान यशस्वीपणे उतरल्याची घोषणा करताना सर्व वैज्ञानिकांचे अभिनंदन केले.
नासाने कॅलिफोर्नियाच्या वंडनबर्ग एअरफोर्स स्टेशनवरून अ‍ॅटलस-व्ही या प्रक्षेपकाद्वारे यावर्षी ५ मे रोजी यानाचे प्रक्षेपण केले होते. नासाने यापूर्वी २०१२ मध्ये मंगळावर क्युरोसिटी रोव्हर हे यान पाठविले होते. या यानाने पाठविलेल्या माहितीचा अभ्यास केला असता, मंगळावर पाणी असल्याचे दिसून आले होते.
इन्साईटची वैशिष्ट्ये
इंटेरिअर एक्सप्लोरेशन युझिंग सिस्मिक इन्व्हेस्टिगेशन असे या यानाचे पूर्ण नाव असून, त्याचे वजन ३५८ किलोग्रॅम आहे. नासाला या मोहिमेवर सुमारे ७ हजार कोटींचा खर्च आला. यानाला सौर ऊर्जा आणि बॅटरीद्वारे वीजपुरवठा होतो आणि ते मंगळावर २६ महिन्यांपर्यंत काम करू शकते. या मोहिमेत अमेरिका, जर्मनी व फ्रान्ससह १० देशांचे वैज्ञानिक सहभागी आहेत. या यानाद्वारे मंगळावरील भूकंपांची नोंद होणार आहे. तसेच सेल्फ हॅमरिंगद्वारे खोदकाम करून मंगळावरील उष्णतेची नोंद घेणार आहे.

Posted by : | on : 28 Nov 2018
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (24 of 437 articles)

Us Flag
तज्ज्ञांचे मत, वॉशिंग्टन, २५ नोव्हेंबर - पाकिस्तानच्या भूमीत आश्रयात असलेल्या अतिरेक्यांनी नजीकच्या भविष्यात पुन्हा २६/११ सारखा भीषण हल्ला केला, तर ...

×