ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:29 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, युरोप » नीरव मोदीचा लंडनमध्ये मुक्त वावर

नीरव मोदीचा लंडनमध्ये मुक्त वावर

•व्हीडिओ जारी,
लंडन, ९ मार्च –

Expensive Nirav Modi

Expensive Nirav Modi

भारतीय बँकिंग क्षेत्रातील १३ हजार कोटी रुपयांच्या सर्वात मोठ्या घोटाळ्याचा सूत्रधार असलेला आरोपी आणि हिरे व्यापारी नीरव मोदी लंडनमध्ये मुक्तपणे व मजेत वावरत असल्याचे पुढे आले आहे. वेस्ट एंड लंडनमधील सेंटर पॉईंट टॉवरमध्ये एका तीन बेडरुमच्या फ्लॅटमध्ये ४८ वर्षीय नीरव मोदी राहत असल्याचे एका इंग्रजी दैनिकाने म्हटले आहे. या आलिशान फ्लॅटचे मासिक भाडे १७ हजार पाऊंड आहे.
सदर दैनिकाच्या पत्रकाराला नीरव मोदी लंडनच्या रस्त्यावर फिरताना आढळला असून, या प्रतिनिधीने संबंधित भेटीचा व्हीडिओही चित्रीत करून जारी केला आहे. या व्हीडिओतून नीरव मोदीची नवी चेहरेपट्टी समोर आली आहे. यामध्ये त्याने दाढी आणि मिशा ठेवल्याचे दिसत आहे. तसेच त्याने सुमारे १० हजार पाऊंड किमतीचे महागडे जाकिट परिधान केल्याचे दिसून येते. संबंधित पत्रकाराने नीरव मोदीशी संवाद साधण्याचाही प्रयत्न केला. मात्र, नीरव मोदीने ‘नो कॉमेंट्स’ अशी प्रतिक्रिया त्यावर दिली. त्याने लंडन येथे हिर्‍यांचा नवीन व्यवसाय थाटल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
नीरव मोदी गेल्या वर्षी भारतातून फरार झाला होता. भारताकडून त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नातूनच इंटरपोलने मागील वर्षी जुलैमध्ये त्याच्या नावे ‘रेड कॉर्नर’ नोटीसही काढली. मात्र, अद्याप नीरव मोदी कोणाच्याही हाती लागलेला नाही.
दरम्यान, नीरव मोदीच्या भारतातील सर्व मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. त्यापैकी त्याचा एक बंगलाही प्रशासनाने ताब्यात घेतला. समुद्र किनारी असलेला अलिबागमधील हा बंगला सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून बांधण्यात आला होता. त्यामुळे शुक्रवारी नियंत्रित स्फोटांच्या साहाय्याने हा बंगला जमीनदोस्त करण्यात आला. पुढील तीन ते चार दिवसांत हा बंगला पूर्णपणे पाडण्यात येणार आहे.
नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी ईडी आणि सीबीआयच्या वतीने परराष्ट्र मंत्रालयाने ब्रिटन सरकारकडे गेल्या वर्षी ऑगस्टमध्येच अर्ज केला होता. हा अर्ज विचाराधीन आहे. इंटरपोलने गेल्या वर्षी जुलै महिन्यात नीरवविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली, पण तो कुणाच्याही हाती लागलेला नाही. केंद्र सरकार नीरवप्रकरणी काहीच करीत नसल्याचा आरोप चुकीचा आहे. नीरवला भारतात आणण्यासाठी जी पावले उचलावी लागतील, त्यासाठी आमची तयारी आहे, असा विश्‍वासही रावीश कुमार यांनी दिला.
मल्ल्याला भेटला
दरम्यान, नीरव मोदीने भारतातून पसार झालेला दुसरा आरोपी विजय मल्ल्याची भेट घेतल्याची माहिती आहे. मागील दहा महिन्यात हे दोघे अनेकवेळा लंडनमध्ये भेटले आहेत. त्यांच्यात प्रत्यार्पणाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. इतकेच नव्हे, तर मल्ल्याचे वकीलच नीरवचा खटला लढण्याची शक्यता आहे.
प्रत्यार्पणाची विनंती ब्रिटनच्या न्यायालयाकडे वर्ग
नवी दिल्ली : १३ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा सूत्रधार आणि हिरे व्यापारी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाची भारत सरकारची विनंती ब्रिटनचे गृहमंत्री साजिद जावेद यांनी ब्रिटनच्या न्यायालयाकडे कायदेशीर कार्यवाहीसाठी वर्ग केल्याची माहिती आज शनिवारी अधिकृत सूत्राने येथे दिली.
अंमलबजावणी संचालनालयातील येथील सूत्राने वृत्तसंस्थेस सांगितले की, ब्रिटनचे गृहमंत्री साजिद जावेद यांनी तेथील न्यायालयास ही विनंती वर्ग केल्याची माहिती आम्हाला दोन दिवसांपूर्वी प्राप्त झाली आहे. कायदेशीर कार्यवाहीनंतर, नीरव मोदीस भारतात आणण्याची प्रक्रिया हा पुढील टप्पा असेल. भारताची बाजू मांडण्यासाठी लवकरच अंमलबजावणी संचालनालय आणि सीबीआय यांचे पथक ब्रिटनला जाईल. तेथे गेल्यानंतर नीरव मोदीच्या विरोधातील पुरावे सादर करण्यात येतील. दरम्यान, विजय मल्ल्याला भारतात परत आणण्यासाठी जसे प्रयत्न करण्यात येत आहेत, तसेच प्रयत्न नीरव मोदीला भारतात आणण्यासाठी करण्यात येत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयातर्फे सांगण्यात आले. यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे ब्रिटन सरकारकडे देण्यात आली आहेत, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Posted by : | on : 10 Mar 2019
Filed under : आंतरराष्ट्रीय, युरोप.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, युरोप (16 of 455 articles)

Pakistan Map Flag
बैठकीत निर्णय, इस्लामाबाद, ९ मार्च - पाकिस्तानने ‘जैश-ए-मोहम्मद’ला अतिधोकादायक संघटनांच्या वर्गवारीत घालण्याचा निर्णय घेतला आहे. बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांची यादी ...

×