ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, ऑस्ट्रेलिया » न्यूझीलंडमधील दोन मशिदींमध्ये गोळीबार, ४९ ठार

न्यूझीलंडमधील दोन मशिदींमध्ये गोळीबार, ४९ ठार

•२० पेक्षा जास्त जखमी
•एकास अटक, तीन संशयित ताब्यात
•स्फोटके केली निष्क्रिय,
ख्राइस्टचर्च, १५ मार्च –

Newziland Mmap Md

Newziland Mmap Md

एका अज्ञात हल्लेखोराने येथील दोन मशिदींमध्ये केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ४९ जण ठार झाले आहेत. या प्रकरणी पोलिस प्रशासनाने एकास अटक केली असून, तीन जणांना ताब्यात घेतले आहे. हा हल्ला करताना स्फोट घडणवण्यासाठी ठेवण्यात आलेली स्फोटके पोलिसांनी निष्क्रिय केली आहेत. हल्लेखोर ऑस्ट्रेलियातील वर्णद्वेषी असल्याचे प्रारंभी तपासावरून स्पष्ट झाले आहे. शुक्रवारच्या प्रार्थनेवेळी मशिदींमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे हेरून हा हल्ला करण्यात आला.
हल्लेखोराने लक्ष्य केलेल्या लोकांमध्ये बहुसंख्य स्थानांतरित आणि निर्वासित होते. देशात अशा प्रकारचा भेकड आणि क्रूर हल्ला यापूर्वी कधीच झाला नव्हता, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान जॅसिंडा आर्डन यांनी व्यक्त केली. हल्ल्यामध्ये २० पेक्षा जास्त जखमी झाल्याची माहिती त्यांनी दिली. हा एक दहशतवादी हल्ला होता हेच स्पष्ट होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
गोळीबार होताच पोलिसांनी एका महिलेसह चार जणांना ताब्यात घेतले. या संशयितांपैकी एकावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. या नृशंस दहशतवादी हल्ल्यामुळे न्यूझीलंडच्या नागरिकांना धक्का बसला आहे.
या हल्ल्यात एकापेक्षा जास्त जणांचा सहभाग होता, यामध्ये कोणताही संशय नाही. या हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षेच्या धोक्याची पातळी उंचावून दुसर्‍या सर्वोच्च पातळीवर नेण्यात आल्याची माहिती आर्डन यांनी दिली.
अटक केलेल्या आणि ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला असला, तरी निरीक्षणाखाली ठेवलेल्यांच्या यादीतील लोकांचा यामध्ये समावेश नसल्याचे त्यांनी सांगितले. या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारताना हल्लेखोराने ७४ पानी निर्वासित विरोधी जाहीरनामा मागे ठेवत, त्यावर आपण कोण आहोत आणि का हल्ला का घडवला याची माहिती दिली आहे. आपण २८ वर्षीय ऑस्ट्रेलियन नागरिक असून, वर्णद्वेषी असल्याचे हल्लेखोराने म्हटले आहे.
न्यूझीलंड पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चार जणांपैकी एक ऑस्ट्रेलियाचा नागरिक असल्याची कबुली ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी दिली आहे. शुक्रवारी रात्री एका व्यक्तीवर हत्येचा आरोप ठेवण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त माईक बुश यांनी दिली. मात्र, उर्वरित तीन संशयितांबाबत आणि अटक करण्यात आलेली व्यक्तीनेच गोळीबार केला का, हे सांगण्यास नकार देताना त्यांनी घटनास्थळावरील एका कारमधून एक आयईडी निष्क्रिय करण्यात आल्याची माहिती दिली.
निर्वासितांच्या विरोधातील राग या हल्ल्यामागे असण्याची शक्यता आर्डन यांनी वर्तवली आहे. हल्ल्यात बळी पडलेले आणि जखमी स्थलांतरित किंवा निर्वासित आहेत. या देशात त्यांनी घर करण्याचे ठरवले आणि हे त्यांचे घर आहे, असे आर्डन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
हल्ल्याचे फेसबूक लाइव्ह
ख्राइस्टचर्चः न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्च भागातील दोन मशिदींमध्ये केलेल्या बेछूट गोळीबाराचे हल्लेखोरांनी फेसबूक लाइव्ह केल्याची माहिती समोर येत आहे. दोन हल्लेखोरांपैकी प्रमुख हल्लेखोराची ओळख पटली असून, त्याच नाव ब्रेंटन टॅरंट असल्याचे सांगितले जात आहे. चला पार्टी सुरू करू या, असा संदेश टॅरंटने हल्ल्यापूर्वी फेसबूक लाइव्ह करीत दिला होता. फेसबूकवर गुरुवारी रात्री पोस्ट टाकून हल्ला होणार असल्याचे संकेत त्याने दिले होते. आक्रमणवाद्यांवर हल्ला करण्यात येणार असून, हा हल्ला लाइव्ह पाहण्याची संधी मिळेल, असे त्याने या पोस्टमध्ये म्हटले होते. क्रूरकर्मा टॅरंटने या हल्ल्याचे तब्बल १७ मिनिटांपर्यंत फेसबूक लाइव्ह केले. हल्ल्यात वापरलेली गाडी सुरू करत, आता पार्टी सुरू करू या, असे तो म्हणताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यानंतर ख्राइस्टचर्चमधील अल नूर मशिदीच्या दिशेने तो रवाना होतो. यावेळी त्याच्या वाहनामध्ये अनेक शस्त्र असल्याचे चित्रीकरण त्याने केले. एका ठिकाणी उतरून जोरदार गोळीबार सुरू केल्याचेही या व्हिडिओत दिसते.

Posted by : | on : 16 Mar 2019
Filed under : आंतरराष्ट्रीय, ऑस्ट्रेलिया.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, ऑस्ट्रेलिया (59 of 505 articles)

Dalai Lama R
यॉर्क, १५ मार्च - चीनला तिबेटी धर्मगुरू दलाई लामा या पदाच्या शक्तीचा अंदाज आहे. त्यामुळेच आपल्या मर्जीतील दलाई लामा व्हावा, ...

×