ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » पाकिस्तानने दीड महिन्यानंतर पत्रकारांना नेले बालाकोटला

पाकिस्तानने दीड महिन्यानंतर पत्रकारांना नेले बालाकोटला

•नुकसान झाले नसल्याचे भासवण्याचा प्रयत्न,
इस्लामाबाद, ११ एप्रिल –

Pakistan Flag

Pakistan Flag

भारताने बालाकोटमध्ये जैशच्या अड्ड्यावर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर तब्बल ४३ दिवसांनी पाकिस्तान बुधवारी आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांना घटनास्थळी घेऊन गेले होते. भारतीय हवाई दलाने बालाकोटमधील ज्या जाबा टेकडीच्या परिसरात हल्ला केला त्या भागातील परिस्थिती दाखवण्याचा पाकिस्तानने प्रयत्न केला. पत्रकार आणि राजनैतिक अधिकार्‍यांना जाबा टेकडीवरील मदरशामध्ये नेण्यात आले त्यावेळी तिथे १०० ते १५० मुले शिक्षण घेत होती.
२६ फेब्रुवारीला भारताने केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये जणू काही घडलेच नाही हे दाखवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता. भारताने केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये जैशचा अड्डा उद्ध्वस्त झाला नाही, मग पाकिस्तानला पत्रकारांना घटनास्थळी घेऊन जायला दीड महिना का लागला, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार जाबा टेकडीवरील तो एक साधा मदरसा होता. जिथे धार्मिक शिक्षण दिले जाते. मदरशाच्या भेटीच्या वेळी इतका लष्करी फौजफाटा तिथे का होता, असाही प्रश्‍न उद्भवला आहे.
हवाई हल्ला झाल्यावर दुसर्‍याच दिवशी पत्रकारांना घटनास्थळी का जाऊ दिले नाही? हल्ल्यानंतर नवव्या दिवशीसुद्धा रॉयटर्सच्या पत्रकारांना घटनास्थळी जाण्यापासून का रोखण्यात आले? जर नुकसानच झाले नाही मग पाकिस्तान इतके दिवस काय लपवत होता? या प्रश्‍नांची उत्तरे पाकिस्तानकडे आहेत का? हवाई हल्ल्याबद्दल संशय घेणारी आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे या विषयाच्या मुळाशी जाणार आहेत का, असे प्रश्‍न निर्माण होत आहेत.
पाकिस्तानने ज्या पत्रकारांना घटनास्थळी नेले होते त्यांना स्थानिकांशी जास्त वेळ बोलू नका, असे निर्देश दिले होते. बीबीसीच्या पत्रकाराने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते असिफ गफुर बाजवा यांना, इथे आणण्यासाठी इतका उशीर का केला, असा प्रश्‍न विचारला त्यावर त्यांनी वेळ मारून नेणारे उत्तर दिले. घटना वेगाने घडत होत्या आणि परिस्थिती तणावग्रस्त होती, त्यामुळे आम्हाला वेळ मिळाला नाही, असे त्यांनी सांगितले. पत्रकार जेव्हा स्थानिकांशी बोलत होते त्यावेळी पाकिस्तानी लष्कराचे अत्यंत बारीक लक्ष होते, असे बीबीसीच्या पत्रकारानेच म्हटले आहे.
पाकिस्तानने भलेही आंतरराष्ट्रीय पत्रकार आणि राजनैतिक अधिकार्‍यांना बालाकोटच्या जाबा टेकड्यांची सफर घडवली असेल, पण त्यासाठी ४३ दिवस का लागले, या प्रश्‍नाचे उत्तर नाही. पत्रकारांना जो मदरसा दाखवण्यात आला तो अत्यंत दुर्गम भागात आहे. पत्रकार हेलिकॉप्टरने उतरल्यानंतर दीड तास पायपीट करून जाबा टेकडीवर पोहोचले. मुख्य नागरी वस्तीपासून हा भाग खूप दूर असल्यामुळे दहशतवादी प्रशिक्षणासाठी ही अत्यंत योग्य आणि मोक्याची जागा आहे. त्यामुळे तिथे जैशचा अड्डा होता हा भारताचा दावा शंभर टक्के खरा आहे.
उलट भारतीय हवाई दलाने जंगलात इतक्या आतमध्ये असलेल्या भागात लक्ष्यावर अचूक प्रहार करून आपली क्षमता दाखवून दिली. अतिरेक्यांना तुम्ही आमच्यापासून लपवू शकत नाही हेच भारताने आपल्या कारवाईतून सिद्ध केले. हवाई हल्ल्यावर संशय घेणार्‍यांनी या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत.

Posted by : | on : 12 Apr 2019
Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, आशिया (12 of 505 articles)

Bashir Sudan
आणि हवाई हद्दही सील केली, खारटुम, ११ एप्रिल - सुदानमध्ये लष्कराने आज गुरुवारी उठाव करीत, देशाचे राष्ट्राध्यक्ष ओमर अल्-बशिर यांना ...

×