ads
ads
ऊर्जित पटेल यांचा राजीनामा

ऊर्जित पटेल यांचा राजीनामा

►वैयक्तिक कारणांमुळे घेतला निर्णय, मुंबई, १० डिसेंबर – केंद्र…

राष्ट्रीय पेन्शन योजनेत कर्मचार्‍यांचे योगदान वाढणार

राष्ट्रीय पेन्शन योजनेत कर्मचार्‍यांचे योगदान वाढणार

►केंद्रीय अर्थमंत्री जेटली यांची घोषणा, नवी दिल्ली, १० डिसेंबर…

‘अग्नी-५’ची यशस्वी चाचणी

‘अग्नी-५’ची यशस्वी चाचणी

►पाच हजार किमीची मारक क्षमता ►चीन, पाक क्षेपणास्त्राच्या टप्प्यात,…

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

►मोदी सरकारचा आणखी एक विजय, लंडन, १० डिसेंबर –…

पाकला एक डॉलरही देऊ नका

पाकला एक डॉलरही देऊ नका

►निकी हेली यांनी खडसावले, न्यू यॉर्क, १० डिसेंबर –…

सार्कच्या बैठकीत गुलाम काश्मीरच्या मंत्र्यांचा समावेश

सार्कच्या बैठकीत गुलाम काश्मीरच्या मंत्र्यांचा समावेश

►भारतीय उच्चायुक्तांनी सोडली बैठक, इस्लामाबाद, १० डिसेंबर – सार्कच्या…

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

►महापालिकेत ५० जागांवर विजय, धुळे, १० डिसेंबर – पोल…

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

►मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांच्या गाडीतून प्रवास •►दोन्ही नेत्यांचे नगारा…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:49 | सूर्यास्त: 17:51
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » पाकिस्तानमधील चिनी दूतावासावरील हल्ल्याचा प्रयत्न उधळला

पाकिस्तानमधील चिनी दूतावासावरील हल्ल्याचा प्रयत्न उधळला

►तीन हल्लेखोर, २ पोलिस ठार,
कराची, २३ नोव्हेंबर –

Pakistan Map Flag

Pakistan Map Flag

येथील उच्च सुरक्षा क्षेत्रातील चिनी दूतावास उडवून देण्यासाठी आलेल्या तीन सशस्त्र आत्मघाती हल्लेखोरांनी दोन पोलिसांना ठार केल्यावर झालेल्या चकमकीत त्यांना गोळ्या घालून मारण्यात आले. चिनी दूतावासावरील हल्ल्याचा प्रयत्न उधळण्यात आला, अशी माहिती प्रशासनाने दिली.
कराचीमधील अलिशान क्लिफ्टन भागामध्ये चीनच्या दूतावासावर आज शुक्रवारी सकाळी हा हल्ला करण्यात आला.
चिनी दूतावासामध्ये शिरण्यापूर्वीच तीन आत्मघाती हल्लेखोरांना ठार करण्यात आले, अशी माहिती कराचीचे पोलिस प्रमुख आमिर शेख यांनी दिली.
पोलिसांनी घटनास्थळावरून नऊ हॅण्डग्रेनेड, कलाश्‍निकोव्ह रायफलीच्या गोळ्या आणि मॅग्झिनसह स्फोटके जप्त केल्याची माहिती दिली, असे वृत्त जिओ वृत्तवाहिनीने दिले आहे. ठार करण्यात आलेल्या आत्मघाती हल्लेखोरांच्या मृतदेहाजवळ खाद्यपदार्थ आणि औषधेही आढळल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.
दोन मृतदेह रुग्णालयात आणले असून, हल्ल्यात जखमी झालेल्या चिनी सुरक्षा रक्षकावर उपचार सुरू असल्याची माहिती जिना रुग्णालयाचे कार्यकारी संचालक सीमी जामाली यांनी दिली. सुरक्षा दलाने आत्मघाती हल्लेखोरांना ठार केले आहे, असा दुजोरा सिंध सरकार आणि इंटर सर्व्हिस पब्लिक रिलेशन विंगने दिला आहे.
हल्ला झालेल्या परिसरामध्ये पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांचे निवासस्थान आहे. या हल्ल्यानंतर परिसरातील शाळा, हॉटेल बंद करण्यात आले.
आत्मघाती हल्लेखोरांनी सर्वप्रथम चिनी दूतावासासमोर असलेल्या सुरक्षा चौकीवर हल्ला करून या भागात ग्रेनेड भिरकावले, अशी माहिती शेख यांनी दिली.
दरम्यान, चीनने या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. दूतावासातील कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय सुरक्षित असल्याची माहिती चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी दिली. चीन या हल्ल्याचा तीव्र निषेध करीत आहे. चिनी दूतावास आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानने वास्तविक उपाययोजना कराव्या, असेही गेंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
भारतातर्फे निषेध
चिनी दूतावासावरील झालेल्या हल्ल्याचा निषेध करीत, अशा हल्ल्यांमुळे आंतरराष्ट्रीय समुदायाचा दहशतवादाविरुद्धच्या लढ्यासाठी निर्धार पक्का होत आहे, असे भारताने स्पष्ट केले आहे. दहशतवादी कृत्यांचे समर्थन होऊच शकत नाही. हा हल्ला करणार्‍यांना कठोर शासन करणे आवश्यक असल्याचे भारताने निवेदनात म्हटले आहे.
खैबर पख्तुनख्वा बॉम्बस्फोटाने हादरले; ३० ठार
पेशावर : खैबर पख्तुनख्वा प्रांतात शुक्रवारी झालेल्या बॉम्बस्फोटाने पाकिस्तान हादरले. दुपारच्या सुमारास खैबर पख्तुनख्वा प्रांतात शक्तिशाली बॉम्बस्फोट झाला. यात ३० जण ठार झाले, तर ४० जण जखमी झाले आहेत. ओराकझाई जिल्ह्यातील कालाया परिसरात इमामबर्गाहजवळ जुमा बाजारात हा शक्तिशाली स्फोट झाला. स्फोट झाला त्यावेळी बाजारात गर्दी होती. लोक येथे उनी वस्त्र विकत घेत होते, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली. स्फोटातील मरण पावलेले बहुतेक जण शिया मुस्लिम समाजाचे आहेत. स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तीन बालकांचा समावेश आहे, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली. मोटारसायकलवर ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा रिमोट कंट्रोलने स्फोट घडवून आणला, अशी माहिती पोलिस अधिकार्‍यांनी दिली. स्फोट होताच पोलिसांनी या परिसराला घेराव घातला. अफगाणिस्तानमधील परिस्थिती हाताळण्यात अमेरिका अपयशी ठरली असून, त्यामुळे पाकिस्तानवर हल्ले होत असल्याचा आरोप पाकिस्तानच्या मानवाधिकार मंत्री शिरीन मझारी यांनी केला. असेच हल्ले यापुढेही होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.
बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने स्वीकारली जबाबदारी
कराची ः चिनी दूतावासावरील झालेल्या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानमधील सर्वात मोठा व सर्वाधिक गरीब असलेल्या बलुचिस्तानमधील फुटीरतावादी संघटना बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने स्वीकारली आहे. चिनी दूतावासावर आम्हीच हल्ला घडवला असून, पाकिस्तानमध्ये आणखीही हल्ले घडवू, असे या संघटनेचा प्रकक्ता जिहांद बलोच याने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारताना सांगितले. हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यासाठी त्याने एका वृत्तसंस्थेला दूरध्वनी केला. पाकिस्तानी सैन्यासोबतच चीनही अत्याचार करीत असल्याने चिनी दूतावासाला लक्ष्य करण्यात आल्याचे त्याने सांगितले.

Posted by : | on : 24 Nov 2018
Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, आशिया (25 of 434 articles)

Shahid Afridi
१८ नोव्हेंबर - पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले चार प्रांत व्यवस्थित सांभाळता येत नाही, अन् ते भारताच्या ताब्यातील जम्मू-काश्मीर सांभाळण्यासाठी ...

×