ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » फ्रान्समधील आंदोलन पॅरिस हवामान कराराचीच परिणती

फ्रान्समधील आंदोलन पॅरिस हवामान कराराचीच परिणती

►डोनाल्ड ट्रम्प यांचा हल्ला,
वॉशिंग्टन, ९ डिसेंबर –

Trump Donald

Trump Donald

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पॅरिस हवामान कराराला लक्ष्य करून फ्रान्सवर हल्ला चढविला आहे. फ्रान्समध्ये सध्या सुरू असलेले ‘येलो वेस्ट मूव्हमेंट’ हे आंदोलन पॅरिस हवामान करारामुळेच होत असल्याचे ते म्हणाले. या कराराद्वारे आपल्या देशातील पैसा तिसर्‍या जगातील अविकसित राष्ट्रांना दिला जात असल्याने लोक नाराज असल्याचे ते म्हणाले. पॅरिस हवामान कराराच्या अंमलबजावणीतील अटींवर चर्चा करण्यासाठी जागतिक नेत्यांच्या पोलंडमध्ये भरलेल्या परिषदेच्या पृष्ठभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले.
पॅरिस हवामान करार या पॅरिससाठीच हानिकारक ठरला असून फ्रान्समधील रस्त्यावर उतरलेले लोक हे त्याचेच द्योतक असल्याचे ते म्हणाले. पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली आपला पैसा दुसर्‍या देशांना दिला जात आहे, हे लोकांना मान्य नसल्याचे ते म्हणाले. अमेरिकेप्रमाणे फ्रान्सनेही या करारातून माघार घ्यावी, ही मागणी करीत तिथले आंदोलक ‘वुई वॉन्ट ट्रम्प’ अशा घोषणा देत असल्याचे ते म्हणाले.
जून २०१७ ला अमेरिकेने पॅरिस हवामान करारातून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. या करारातून अमेरिकेवर आर्थिक निर्बंध लादले जात असल्याचे म्हणत दुसर्‍या देशांच्या समस्येचे ओझे अमेरिकेला सहन करावे लागत असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला होता. यावेळी भारत, चीनसारख्या विकसनशील देशांना या करारामुळे अनावश्यक फायदा मिळत असल्याचाही त्यांचा आक्षेप होता.
अमेरिकेचा माजी विदेश मंत्री मूर्ख, कामचुकार : ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले माजी विदेश मंत्री रेक्स टिलरसन यांच्या विधानावर तिखट प्रतिक्रिया देताना त्यांना मूर्ख आणि कामचुकार म्हटले आहे. टिलरसन यांनी याआधी म्हटले होते की, ट्रम्प आपल्याला अवैध निर्णय घेण्यासाठी जबरदस्ती करीत होते. त्यावर ट्रम्प यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
ट्रम्प यांनी ट्विट केले की, माईक पोम्पियो चांगले काम करीत आहेत. मला त्यांचा अभिमान आहे. त्यांच्या आधी जे विदेश मंत्री होते रेक्स टिलरसन यांच्याकडे मानसिक क्षमता नव्हती. नंतर ट्रम्प यांनी आपल्या एका ट्विटमध्ये, टिलरसन मूर्ख आहे आणि मला त्याला लवकर वेगळे करता आले नाही. टिलरसन एका मुलाखतीदरम्यान बोलताना म्हणाले होते की, मी रोजच त्यांना सांगत होतो की तुम्ही असे-तसे काम करू शकत नाही. त्यावेळी त्यांनी माझ्यासोबत कसे काम करावे, याबाबत बोलणी करायला हवी होती. मात्र, त्यांनी तसे केले नाही. कदाचित त्यांना माझा कंटाळा आला असेल. अ‍ॅक्सन मोबाईल कार्पोरेशनसारख्या शिस्तबद्ध आणि संपूर्ण प्रक्रियांचे यथायोग पालन करणार्‍या कंपनीत काम केल्यानंतर मला अतिशय बेजबाबदार, शिस्त नसलेला, कोणत्याही बाबीचा अभ्यास करण्यात रस नसलेला, समोर आलेली कोणत्याही प्रकारची माहिती असो ती न वाचणार्‍या व्यक्तीसोबत काम करणे माझ्यासाठी एक मोठे आव्हान होते, असेही टिलरसनने म्हटले आहे. ट्रम्प यांच्या प्रशासनात टिलरसन पहिले विदेश मंत्री होते.

Posted by : | on : 10 Dec 2018
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (28 of 388 articles)


सीतारामन यांच्या पाच दिवसांच्या दौर्‍याची सांगता, वॉशिंग्टन, ८ डिसेंबर - भारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सीमारामन् यांच्या पाच दिवसांच्या अमेरिका दौर्‍याची ...

×