ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » भारत, रशिया, पाकने तालिबान्यांविरुद्ध लढावे

भारत, रशिया, पाकने तालिबान्यांविरुद्ध लढावे

►डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा,
वॉशिंग्टन, ३ जानेवारी –

Trump Donald

Trump Donald

अफगाणिस्तानात दररोज निष्पाप नागरिकांचे बळी घेणार्‍या तालिबानविरोधात भारत, रशिया आणि पाकिस्तानने संयुक्त लढा द्यावा, अशी इच्छा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी अफगाणमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या भारताच्या भूमिकेवर नाराजीही व्यक्त केली.
नव्या वर्षातील पहिल्याच कॅबिनेट बैठकीत टॅम्प यांनी, पाकिस्तान हा जगभरातील दहशतवाद्यांचा पाठीराखा असल्याचा आरोपही केला.
अफगाणमधील दहशतवादी लढ्यात एकटा अमेरिकाच का? भारत, रशिया आणि पाकिस्तानचा सहभाग का नाही? खरेतर, आम्ही अफगाणपासून सहा हजार मैल दूर आहोत, हरकत नाही, त्या देशात आमची माणसे आहेत आणि त्यांना वाचविण्यासाठी आम्ही हा लढा लढणार आहोत. मात्र, आम्हाला अफगाणच्या शेजारील देशांचेही सहकार्य आवश्यक आहे, ट्रम्प यांनी बैठकीनंतर पत्रपरिषदेत बोलताना सांगितले.
अफगाणचा विकास करून, तिथे शांतता प्रस्थापित करण्यात भारत आपल्यापरीने भरपूर योगदान देत आहे, यात मुळीच शंका नाही; पण अन्य देश त्यांची भूमिका व्यवस्थित पार पाडत नाहीत. अफगाणमधील दहशतवादविरोधी लढा अमेरिकेसाठी प्रचंड खर्चिक ठरला आहे. लाखो अब्ज डॉलर्सचा भुर्दंड आम्हाला सोसावा लागला आहे. काही देश आम्हाला सांगतात की, या लढ्यात आम्हीही सक्रिय सहभागी आहोत, पण कोणत्या पद्धतीने? ते फक्त १००-२०० सैनिक या लढ्यात पाठवितात, इतक्याने काय होणार आहे, असे ते म्हणाले.
प्रतिभावान लोकांनी अमेरिकेत यावे
अमेरिकन कंपन्यांची भरभराट करण्याची क्षमता असलल्या प्रतिभावान लोकांनीच अमेरिकेत यावे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. बेकायदेशीर स्थलांतरितांना थांबवायचे असेल, तर मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधणे, हाच एकमेव उपाय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
किम जोंग यांच्या दुसर्‍या भेटीसाठी आतुर
उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांचे पत्र मला मिळाले आहे. त्यांच्यासोबत दुसरी भेट घेण्यासाठी मी अतिशय आतुर आहे. नजीकच्याच भविष्यात ही भेट होणार आहे. कोरियन द्वीपकल्पाला अण्वस्त्रमुक्त करण्यासाठी अर्धवट राहिलेली चर्चा आता आम्ही पूर्ण करू, असेही ते म्हणाले.
पाकिस्तान शत्रूंचे माहेरघर
पाकिस्तानमध्ये आता नवीन सरकार आले आहे. या सरकारसोबत चांगले आणि मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याची अमेरिकेची इच्छा आहे, पण जगभराचे बहुतांश शत्रू पाकिस्तानच्याच भूमीत आश्रयाला असल्याने, यात मर्यादा येत आहेत. पाकिस्तानने त्यांच्या भूमीत असलेल्या जागतिक शत्रूंचा सर्वनाश करावा, कारण हा लढा आम्ही एकट्याच्या बळावर लढू शकत नाही. याच अनुषंगाने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेण्याची माझी इच्छा आहे, असे त्यांनी सांगितले.
मोदींवर केली टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अफगाणमध्ये ग्रंथालय स्थापन करण्यासाठी आर्थिक मदत करीत आहेत. नेहमीच बॉम्बस्फोट आणि दहशतवादी हल्ले होत असलेल्या या देशात ग्रंथालयांचा उपयोग कुणाला होणार आहे, असा सवाल ट्रम्प यांनी उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच माझे सर्वांत चांगले मित्र असल्याचा पुनरुच्चार केला. मात्र अफगाणमधील ग्रंथालयांना निधी देण्याचा त्यांचा निर्णय मला आवडला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Posted by : | on : 4 Jan 2019
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय (6 of 388 articles)

Kim Jong Un
जोंग यांचा इशारा, प्योंगयंग, १ जानेवारी - उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी नवीन वर्षाच्या भाषणात पुन्हा क्षेपणास्त्र चाचण्यांचा ...

×