ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » आंतरराष्ट्रीय, युरोप » मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

►मोदी सरकारचा आणखी एक विजय,
लंडन, १० डिसेंबर –

Viijay Mallya

Viijay Mallya

भारतातील सरकारी आणि खाजगी बँकांचे सुमारे ९४०० कोटी रुपयांचे कर्ज बुडवून ब्रिटनमध्ये पळालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याला भारताच्या स्वाधीन करण्यात यावे, असा आदेश लंडन येथील दंडाधिकारी न्यायालयाने आज सोमवारी दिला. पळपुट्या मल्ल्याला भारतात आणण्याच्या मोदी सरकारच्या प्रयत्नांना लाभलेले हे आणखी एक मोठे यश मानले जात आहे. काही दिवसांपूर्वी अगस्ता वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर्स खरेदी घोटाळ्यातील दलाल ख्रिश्‍चियन मिशेलला भारतात आणण्यात आले होते.
विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणावर आज सकाळी न्या. एम्मा अर्बटनॉट यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू झाली. स्वत:चा बचाव करण्यासाठी मल्ल्याने, त्याच्या वकिलांमार्फत भरपूर प्रयत्न केले, पण त्यात यश आले नाही.
मल्ल्याविरोधात भारत सरकारने खोटा खटला दाखल केला, हे सिद्ध होऊ शकत नाही, उलट भारताने मल्ल्याविरोधात भरपूर आणि ठोस पुरावे सादर केले आहेत. आम्ही या सर्व पुराव्यांचा अभ्यास केला आहे. सीबीआय आणि ईडीने जे आरोप केले, त्यात सत्यता आढळून आल्याने, भारतात न्यायालयीन कारवाईचा सामना करण्यासाठी मल्ल्याला भारताकडे सोपविण्याचा आदेश माझे न्यायालय देत असल्याचे न्या. एम्मा म्हणाल्या. यावेळी त्यांनी भारतीय बँकांच्या कर्ज मंजूर करण्याच्या पद्धतीवर आणि मल्ल्याने कर्जाच्या रकमेचा केलेल्या वापरावरही टीकात्मक मत व्यक्त केले.
ऑर्थर रोड कारागृहच योग्य
मल्ल्याच्या वकिलांनी यापूर्वीच्या सुनावणीत भारतातील कारागृहांच्या सुमार स्थितीचे चित्र रेखाटताना, तिथे मल्ल्या सुरक्षित राहू शकणार नाही, असा युक्तिवाद केला होता. यावर न्यायालयाने स्पष्ट केले की, भारत सरकारने मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहातील त्याला ठेवण्यात येणार्‍या १२ क्रमांकाच्या बरॅकचे व्हिडीओ फूटेज पाठविले आहे. आम्ही ते पाहिले. अलीकडेच ते व्यवस्थित केले आहे आणि मल्ल्यासाठी हेच कारागृह योग्य असल्याचे आमचे ठाम मत झाले आहे.
आव्हान देण्याचा अधिकार
बचाव पक्षाच्या वकिलांना माझ्या आदेशाला मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात आव्हान देण्याचा अधिकार आहे. आव्हान याचिका दाखल करण्याची मुभा केवळ १४ दिवसांची आहे. त्यानंतर मल्ल्याला आव्हान देता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये अटक करण्यात आल्यानंतर मल्ल्याला ज्या अटींवर जामीन मंजूर करण्यात आल्या होत्या, त्याच अटी आताही आम्ही कायम ठेवत असल्याचा निर्वाळाही न्यायालयाने दिला.
प्रकरण गृह विभागाकडे
मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला परवानगी दिल्यानंतर न्यायालयाने हे प्रकरण ब्रिटनच्या गृह विभागाकडे पाठवले असून, गृहविभाग त्यावर आता अंतिम निर्णय घेणार आहे.
एका पैशाचेही कर्ज घेतले नाही : मल्ल्या
न्यायालयात सुनावणी सुरू होण्यापूर्वी मल्ल्याने ट्विट करून ‘मी एका पैशाचेही कर्ज घेतले नाही’, असा दावा केला. किंगफिशर एअरलाईन्स कंपनीने हे कर्ज घेतले होते. व्यवसाय बुडाल्याने या कर्जाची परतफेड करता आली नाही. या कर्जाला मी हमी दिली आहे म्हणून मलाच जबाबदार धरता येणार नाही, असे मल्ल्याने यात नमूद केले. कर्जाची संपूर्ण मुद्दल परत करण्याचा प्रस्ताव मी दिलेला आहे. तो प्रस्ताव स्वीकारावा, अशी विनंतीही त्याने केली होती.

Posted by : | on : 11 Dec 2018
Filed under : आंतरराष्ट्रीय, युरोप.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंतरराष्ट्रीय, युरोप (90 of 455 articles)

Niki Haley
हेली यांनी खडसावले, न्यू यॉर्क, १० डिसेंबर - पाकिस्तान अजूनही दहशतवाद्यांना आश्रय आणि प्रोत्साहन देत असल्याने या देशाला अमेरिकेने एका ...

×