ads
ads
ऊर्जित पटेल यांचा राजीनामा

ऊर्जित पटेल यांचा राजीनामा

►वैयक्तिक कारणांमुळे घेतला निर्णय, मुंबई, १० डिसेंबर – केंद्र…

राष्ट्रीय पेन्शन योजनेत कर्मचार्‍यांचे योगदान वाढणार

राष्ट्रीय पेन्शन योजनेत कर्मचार्‍यांचे योगदान वाढणार

►केंद्रीय अर्थमंत्री जेटली यांची घोषणा, नवी दिल्ली, १० डिसेंबर…

‘अग्नी-५’ची यशस्वी चाचणी

‘अग्नी-५’ची यशस्वी चाचणी

►पाच हजार किमीची मारक क्षमता ►चीन, पाक क्षेपणास्त्राच्या टप्प्यात,…

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

►मोदी सरकारचा आणखी एक विजय, लंडन, १० डिसेंबर –…

पाकला एक डॉलरही देऊ नका

पाकला एक डॉलरही देऊ नका

►निकी हेली यांनी खडसावले, न्यू यॉर्क, १० डिसेंबर –…

सार्कच्या बैठकीत गुलाम काश्मीरच्या मंत्र्यांचा समावेश

सार्कच्या बैठकीत गुलाम काश्मीरच्या मंत्र्यांचा समावेश

►भारतीय उच्चायुक्तांनी सोडली बैठक, इस्लामाबाद, १० डिसेंबर – सार्कच्या…

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

►महापालिकेत ५० जागांवर विजय, धुळे, १० डिसेंबर – पोल…

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

►मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांच्या गाडीतून प्रवास •►दोन्ही नेत्यांचे नगारा…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:49 | सूर्यास्त: 17:51
अयनांश:
Home » इतर » पालकांसाठी सोपे मंत्र जे आपल्या मुलांना असामान्य बनवतील

पालकांसाठी सोपे मंत्र जे आपल्या मुलांना असामान्य बनवतील

॥ मानसरंग : पूर्वा कोठाडिया-डंके |

(भाग पहिला)
मंत्र पहिला –
समाजातील सर्वच स्तरांतील व्यक्तींशी आपण सहृदय दृष्टीकोनातून वागायला हवे. कामगार, नोकर, पोस्टमन, प्लंबर, ड्रायव्हर अशा व्यक्तींना एक माणूस म्हणून आपण योग्य तो सन्मान दिल्यास मुलेही त्याच वर्तनाचे अनुकरण करतात. मुलांना कष्टांचे महत्व कळतेींच शिवाय, माणसांची पारख त्यांच्या आर्थिक परिस्थितीवरून कधीही करू नये हेदेखील समजते. आपल्या मुलांच्या सामाजिक जाणिवा सुदृढ होण्यासाठी हि गोष्ट फारच आवश्यक आहे.
मंत्र दुसरा –
आपण घरामध्ये महत्वाचे सण-समारंभ आवर्जून साजरे करायला हवेत. अनेक पालक ‘आमच्या गावाकडच्या घरी किंवा अन्य नातेवाईकांकडे सण साजरे होतात, म्हणून आम्ही करत नाही’ असे कारण पुढे करतात. पण, आपल्या मुलांना या गोष्टींमधला आनंद किंवा त्यांचे महत्व यांची जाणीव कधी होणार? राष्ट्रीय सणांच्या दिवशी कितीतरी पालक झेंडावंदनाच्या कार्यक्रमालादेखील जात नाहीत, आपल्या मुलांनाही त्या दिवशी शाळेत पाठवत नाहीत. आपल्या मुलांना या गोष्टींचे महत्व समजणार तरी कसे? आपण या प्रसंगांमध्ये सहकुटुंब सहभागी होणे हे आपल्या मुलांच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीसाठी खूप महत्वाचे आहे.
मंत्र तिसरा –
एखादी व्यक्ती समोर असली तर तिच्याशी गोड बोलणे आणि तिची पाठ वळतात तिच्याबद्दल नको-नको ते बोलणे, चुगल्या करणे हि सवयच मुळात सर्वांसाठीच अयोग्य आहे. परंतु, अशा सवयी आपोआप सुटत नाहीत. आपण अशा गोष्टी आपल्या मुलांसमोर करत राहतो आणि आपल्या नकळत मुले या वर्तनाचे अनुकरण करू लागतात. त्यांच्या वयाला न शोभणारे असे शब्द त्यांच्या तोंडी येऊ लागतात. हे काही चांगल्या व्यक्तिमत्वाचे लक्षण नव्हे. आपल्या अशा सवयी पालकांनी अतिशय प्रयत्नपूर्वक काढून टाकायला हव्यात.
मंत्र चौथा –
आपल्या मुलांनी चांगले वर्तन करणे हे त्यांच्या भवितव्यासाठी आवश्यक आहे असे जर आपण मानत असू तर, चांगल्या वागण्यासाठी मुलांना आमिषे दाखवणे थांबवायला हवे. आमिषे तात्पुरती असतात आणि त्यांचा प्रभावही कमी असतो. आमिष दाखवणे पालकांना सोपे वाटते परंतु, मुलांना त्याच गोष्टीची सवय लागते आणि पुढेपुढे वारंवार आमिषे दाखवण्याची वेळ येते. मुलांच्या मागण्याही वाढतच जातात. ‘करायला गेलो एक आणि झाले भलतेच’ अशी पालकांची अवस्था होते. त्याऐवजी चांगल्या वर्तनाचे महत्व मुलांवर बिंबवले तर त्याचा परिणाम दीर्घकाळ टिकतो.
मंत्र पाचवा –
आता कुटुंबांचा आकार लहान होत चालला आहे. खूप मोठी एकत्र कुटुंबे अभावानेच पाहायला मिळतात. मुलांना खरेतर महागड्या वस्तूंपेक्षा माणसांचाच सहवास अधिक आवडत असतो. परंतु, वाढत्या शहरीकरणात हा घटक आता हळूहळू लोप पावत चालला आहे. मुलांना आपण जितके जास्त आरामदायी आयुष्य देऊ, तितका त्यांच्या कष्टाळू वृत्तीवर व कल्पनाशक्तीवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता वाढेल. त्यांना मोकळ्या हवेत, निसर्गाच्या सहवासात भरपूर खेळण्याची आवश्यकता आहे. मैदानी खेळांची आवड निर्माण झाल्यास मुले आपोआपच इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या अतिरेकापासून दूर जातील.
बालमानसतज्ञ, संचालक – प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर,पुणे. •••

https://tarunbharat.org/?p=69320
Posted by : | on : 9 Dec 2018
Filed under : इतर.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in इतर (1 of 2 articles)
×