ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » क्रीडा » भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय

भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय

►मालिकेत १-० आघाडी,
अ‍ॅडिलेड, १० डिसेंबर –

Cheteshwar Pujara

Cheteshwar Pujara

अखेर भारताने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर पहिला कसोटी विजय नोंदविला. रोमांचक ठरलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताने यजमान संघाला झटपट गुंडाळून ३१ धावांनी विजय मिळविला. या विजयाबरोबरच भारताने चार सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी मिळविली आहे. पहिल्या डावात शतकी व दुसर्‍या डावात अर्धशतकी खेळी करणारा चेतेश्‍वर पुजारा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
कर्णधार कोहलीचा पराक्रम
या विजयाबरोबरच विराट कोहली इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेत कसोटी विजय नोंदविणारा पहिला आशियाई कर्णधार ठरला. राहुल द्रविड व महेंद्रसिंह धोनी यांनी इंग्लंड व दक्षिण आफ्रिकेत विजय मिळविला, परंतु ऑस्ट्रेलियात विजय मिळवू शकले नाही. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली एकाच वर्षात भारतीय संघाला या तिन्ही देशांमध्ये विजय मिळाले आहेत.
विजयासाठी ३२३ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने कालच्या चार बाद १०४ धावांवरून पुढे खेळ करण्यास सुरुवात केली, परंतु यजमान संघ २९१ धावांपर्यंतच मजल मारू शकला. जोश हॅझलवूडच्या रूपाने रविचंद्रन् अश्‍विनने शेवटचा बळी टिपत ऑस्ट्रेलियाचा डाव संपुष्टात आणला. अश्‍विनने ९२ धावात ३ बळी टिपले.
खेळाच्या सुरुवातीला ट्रॅव्हिस हेडच्या रूपात पहिला धक्का बसला. त्यानंतर शॉन मार्श (६२) व टीम पेनने (४१) सहाव्या गड्यासाठी ४२ धावांची भागीदारी केली. बुमराहने शॉन मार्शला बाद करून भारताला सहावे यश मिळवून दिले. त्यानंतर बुमराहने टीम पेनलाही पॅव्हेलियन परत पाठविल्याने भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र तळाच्या फळीने चिवट झुंज दिल्याने भारताचा विजय लांबला. १२१ चेंडूत २८ धावांची सावध खेळी करणार्‍या पॅट कमिन्सने मिशेल स्टार्कच्या साथीने ४१ व नॅथन लियोनच्या साथीने ३१ धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. अखेरीस बुमराहनेच कमिन्सचा अडथळा दूर केला. मात्र ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ६४ धावा व भारताला विजयासाठी एक गडी आवश्यक असे चित्र असताना लियोन व हॅझलवूडने झुंज दिल्याने भारतीय तंबूत अस्वस्थता निर्माण झाली होती, मात्र आर. अश्‍विनने हॅझलवूडला बाद करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ऑस्ट्रेलियाचा डाव २९१ धावांवर संपुष्टात आला. भारताकडून मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह व आर. अश्‍विनने प्रत्येकी तीन बळी टिपले, तर ईशांत शर्माने एक गडी बाद करण्यात यश मिळविले.
ऐतिहासिक आणि विक्रमी
भारतीय संघाने ७१ वर्षांत प्रथमच ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत पहिला सामना जिंकण्याची किमया साधली. याबरोबरच भारताने १५ वर्षांपासूनची अ‍ॅडिलेड मैदानावरील पराभवाची मालिकाही खंडित केली. या सामन्यात यष्टीरक्षक ऋषभ पंतनेही एबी डिव्हिलियर्स व जे. रसेल यांच्या एका कसोटी सामन्यात ११ यष्टीमागे झेल टिपण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. त्याने ऋद्धिमान साहाच्या १० बळींच्या विक्रमाला मागे टाकले.

Posted by : | on : 11 Dec 2018
Filed under : क्रीडा.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in क्रीडा (2 of 9 articles)

Pruthvi Shaw
विक्रमांना गवसणी, राजकोट, ४ ऑक्टोबर - वय अवघे १८ वर्षे... मात्र, ज्युनियर क्रिकेटपटू म्हणून आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव गाढा... अशाच सीनियर ...

×