ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » क्रीडा » भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास

भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास

•ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच वन-डे मालिका जिंकली
•यजुवेंद्र चहल, धोनी, केदार जाधव विजयाचे शिल्पकार,
मेलबर्न, १८ जानेवारी –

Mahendrasingh Dhoni

Mahendrasingh Dhoni

महेंद्रसिंह धोनी (८७) व केदार जाधव (६१) यांच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसर्‍या व अंतिम एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात ७ गड्यांनी दणदणीत विजय नोंदवून पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर तीन सामन्यांची वन-डे मालिका २-१ ने जिंकण्याचा इतिहास रचला.
या दोघांनी चौथ्या गड्यासाठी नाबाद १२१ धावांची भागीदारी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सहा बळी टिपून ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला भगदाड पाडणार्‍या यजुवेंद्र चहलला सामनावीर, तर या मालिकेत दोन अर्धशतक झळकावून भारताच्या मालिकाविजयात सिंहाचा वाटा उचलणार्‍या महेंद्रसिंह धोनीला मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारताने प्रथमच ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कसोटी मालिकेपाठोपाठ वन-डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे.
ऑस्ट्रेलियाने ४८.४ षटकात सर्वबाद २३० धावा काढल्या. मेलबर्न क्रिकेट मैदानावर भारताने ४९.२ षटकात ३ बाद २३४ धावा ठोकून अंतिम सामन्यासह मालिकाविजयाचे स्वप्न साकार केले.
विजयासाठी धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. रोहित शर्मा (९) व शिखर धवन (२३) हे लवकरच बाद झाल्यानंतर विराट कोहली व महेंद्रसिंह धोनीने संयमी खेळी करून संघाला सावरले. या दोघांना प्रत्येकी दोन जीवदान मिळाले, मात्र त्यानंतर ते सावधगिरीने खेळू लागले. या सामन्यात धोनीने ३४वी धाव घेताच एका विक्रमाला गवसणी घातली. धोनी व कोहलीने तिसर्‍या गड्यासाठी ५४ धावांची भागीदारी केली. धोनीने ३४वी धाव घेत ऑस्ट्रेलियात एक दिवसीय सामन्यांत १००० धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा करणार्‍या भारतीय फलंदाजांमध्ये त्याने कोहलीला मागे टाकले. कोहली अर्धशतकाच्या वाटेवर असतानाच रिचर्डसनने त्याला कॅरीकडून झेलबाद केले. कोहलीने ३ चौकारांसह ४६ धावा केल्या. त्यानंतर धोनी व केदार जाधव यांची जोडी खेळपट्टीवर चांगली जमली व त्यांनी आपले नाबाद अर्धशतक साजरे करत भारताचा विजय साकार केला. धोनीने ११४ चेंडूत ६ चौकारांसह नाबाद ८७ धावा, तर केदारने ५७ चेंडूत ७ चौकारांसह नाबाद ६१ धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाच्या रिचर्डसन, सिडल व स्टोइनिसला प्रत्येकी एक गडी बाद करण्यात यश मिळाले.

Posted by : | on : 19 Jan 2019
Filed under : क्रीडा.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in क्रीडा (1 of 10 articles)

Pandya Rahul
टिप्पणी भोवली, सिडनी, ९ जानेवारी - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल यांना एका ...

×