ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » क्रीडा » हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस

हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस

►महिलांवरील टिप्पणी भोवली,
सिडनी, ९ जानेवारी –

Pandya Rahul

Pandya Rahul

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल यांना एका टीव्ही शोमध्ये महिलांवर केलेल्या टिप्पणीमुळे नोटीस बजावली आहे. या टीकेमुळेच बीसीसीआय या दोन्ही खेळाडूंचा टीव्ही शोमधील सहभाग रोखू शकतो. ‘कॉफी विथ करण’ या टीव्ही शोमध्ये पंड्याने केलेल्या टिप्पणीवरून त्यांना सोशल माध्यमाद्वारे चांगले खडसावले जात आहे. दरम्यान, आपल्या या टिप्पणीबाबत पंड्याने माफी मागतिली होती. आम्ही शोमधील भावनेच्या भरात वाहून गेले होतो आणि आमच्या तोंडून अपशब्द बाहेर निघाले, असे पंड्याने माफी मागताना म्हटले आहे. मात्र, राहुलने त्यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
बीसीसीआयचे कामकाज सध्या पाहात असलेल्या प्रशासकीय समितीचे (सीओए) चेअरमन विनोद रॉय या संदर्भात बोलताना म्हणाले की, आम्ही हार्दिक पंड्या आणि लोकश राहुल यांना त्यांनी केलेल्या टिप्पणीच्यासंदर्भात कारणे दाखवा नोटीस पाठविली आहे. त्यांना स्पष्टीकरण सादर करता यावे म्हणून २४ तासांचा अवधीही दिला आहे.
दरम्यान, ज्याचे क्रिकेटशी काहीही घेणेदेणे नाही अशा प्रकारच्या शोमध्ये क्रिकेटपटूंना सहभागी होऊ द्यायचे की नाही, या संदर्भात विचार केला जाणार आहे, असे बीसीसीआयमधील एका सूत्राने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. पंड्या विद्यमान परिस्थितीत ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर असलेल्या क्रिकेट संघात सहभागी झालेला आहे.
आता बीसीसीआयचे अधिकारी तो संपूर्ण एपिसोड पाहणार असून त्यानंतर योग्य कारवाई करणार असल्याचे, सूत्राकडून सांगण्यात आले. माफी मागून चूक लपवता येत नाही. महिलांबद्दल त्याचे काय मत आहे, हे पंड्याच्या विधानातून दिसून येते. त्याचे हे वागणे चुकीचे आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूने कसे वागावे, याची जाण त्याला व्हायला हवी. त्यापेक्षाही काय योग्य काय अयोग्य हेही त्याला कळायला हवे, असे बीसीसीआयच्या अधिकार्‍याने सांगितले. या शोमध्ये करणने या दोघांना त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल प्रश्‍न विचारले असता हार्दिकने कुटुंबीय खुलेपणाने माझ्या सेक्स लाईफबद्दल चर्चा करतात, असे उत्तर दिले. तो पुढे म्हणाला, एकदा आई-बाबांबरोबर एका पार्टीला गेलो होतो तेव्हा तेथे उपस्थित कोणत्या मुलीबरोबर शरीर संबंध झाल्याचे त्यांनी मला विचारले. त्यावेळी मी अनेकींकडे बोट दाखवले. आपले कौमार्य गमावल्याबद्दलही मी पालकांना अगदी कूलपणे सांगितले. मी घरी आल्यावर पालकांना आज मी करून आलो असेही मी सांगत असतो, असेही पंड्या या शोमध्ये म्हणाला होता.
दरम्यान, पंड्याच्या या बिनधास्त वक्तव्याचा नेटिझन्सने चांगलाच समाचार घेतला. त्यानंतर पंड्याने बुधवारी इस्टाग्रामवरून सर्वांची माफी मागितली. तो म्हणाला, कॉफी विथ करण या कार्यक्रमातील माझ्या वक्तव्यावर कोणाची मने दुखावली असतील, तर त्यांची माफी मागतो. मला कोणालाही दुखवायचे नव्हते.

Posted by : | on : 10 Jan 2019
Filed under : क्रीडा.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in क्रीडा (1 of 9 articles)

Cheteshwar Pujara
१-० आघाडी, अ‍ॅडिलेड, १० डिसेंबर - अखेर भारताने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर पहिला कसोटी विजय नोंदविला. रोमांचक ठरलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात ...

×