ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » छायादालन, नागरी, राष्ट्रीय, सोलापूर » चौकीदार चोरांनाच पकडतो, जागल्याचे काम करतो!

चौकीदार चोरांनाच पकडतो, जागल्याचे काम करतो!

Pm Modi Ralley In Solapur8

Pm Modi Ralley In Solapur6

Pm Modi Ralley In Solapur5

Pm Modi Ralley In Solapur7

Pm Modi Ralley In Solapur4

Pm Modi Ralley In Solapur3

Pm Modi Ralley In Solapur2

Pm Modi Ralley In Solapur1

Pm Modi Ralley In Solapur

►मी घरांचे भूमिपूजन केले, मीच चाव्याही देणार!
►मोदींचा काँग्रेसवर घणाघात : आता दलालांना मलई खायला मिळत नाही!,
विशेष प्रतिनिधी,
सोलापूर, दि. ९ जानेवारी –

चौकीदार जागल्याचे काम करतो, चोरांनाच पकडतो. हा चौकीदार कितीही अंधार असला तरी, चोरांना पकडण्याची हिंमत ठेवतो. त्यामुळे दिल्लीत मी सफाई मोहीम हाती घेतल्यामुळे गेली अनेक वर्षे मलाई खाणार्यांची दुकानदारी बंद झाली आहे. सवर्ण गरिबांना आर्थिक निकषावर आरक्षण मंजूर करण्याचे ऐतिहासिक विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यामुळे आरक्षणावरून वोटबँकेची राजनीती करणार्यांना चपराक बसली आहे, या शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोधकांना लक्ष्य केले. आम्ही भूमिपूजन करतो, आणि काम पूर्ण करून उद्घाटनही करतो. सोलापुरातील ३० हजार घरांचे आज भूमिपूजन केले आहे, त्याच्या चाव्या द्यायलाही मीच येणार, असा आत्मविश्‍वासही मोदी यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते सोलापुरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा बुधवारी पार्क मैदानावर हजारो नागरिकांच्या साक्षीने पार पडला. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल विद्यासागर राव, र्केद्रीयमंत्री नीतीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, माजी आमदार आडम मास्तर आदी उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी मोदी यांना पारंपरिक पगडी, भगवद्गीता, घोंगडी आणि चांदीची तलवार देऊन स्वागत केले.
काल लोकसभेत आर्थिक दुर्बल सवर्णाना १० टक्के आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक मंजूर झाले. नोकरी आणि शिक्षणाचा लाभ देण्यासाठीच सर्व धर्माच्या सवर्णांना आरक्षण देण्यासाठी विधेयक आणले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून आरक्षणावर विविध जाती घटकांची दिशाभूल करणार्या विरोधकांवर आज मोदी यांनी चौफेर हल्ला केला. आम्ही सगळ्याच जातीघटकांचे आरक्षण कायम ठेवले. कुणाचे काढून घेतले नाही. त्यामुळे आता अशा टीकाखोरांना चपराक बसली आहे. राहुल गांधी यांचे नाव न घेता मोदी म्हणाले, ‘‘वो लोग चौकीदार को डराते है, लेकीन चौकीदार डरता नही, अंधेरे मे चोरों को पकडता है।’’ स्वच्छ भारत अभियान दिल्लीमध्ये केले, ते बंद करणार नाही. अनेकांचे कमिशन बंद झाले आहे. पण अशा अनेक चोरांना मी सोडणार नाही.
अगस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर सौद्यातील दलाल मिशेल ख्रिश्‍चियन हा राफेलच्या प्रतिस्पर्धी कंपनीसाठीही लॉबिंग करीत होता. यापूर्वी संपुआच्या कार्यकाळात यंत्रणेमध्ये दलालीची संस्कृती निर्माण झाली होती. काँग्रेसने वंचितांचे अधिकार हिसकावले, तसेच संरक्षणासारख्या संवेदनशील विषयासोबतही खेळ खेळला, अशी बोचरी टीकाही त्यांनी यावेळी केली.
राफेल सौद्यावेळी मिशेल एका प्रतिस्पर्धी कंपनीसाठी लॉबिंग करीत होता, असे त्यांनी वृत्तपत्रांमध्ये आलेल्या वृत्तांचा हवाला देताना सांगितले.
मिशेलने कोठडीत असताना खळबळजनक खुलासे केले असल्याचे वृत्तही प्रसारित झाले आहे. तो केवळ हेलिकॉप्टर सौद्यातील दलालीत गुंतला नव्हता, तर यापूर्वीचे सरकार लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी सौदा करीत होती, त्यावेळी त्याने प्रतिस्पर्धी कंपनीसाठी लॉबिंग केल्याचे वृत्तही प्रसारित झाले आहे, असा घणाघाती हल्ला त्यांनी काँग्रेसवर केला. काँग्रेसने खर्च केलेल्या पै अन् पैचा हिशेब द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
अटलजींचे स्मरण…!
सर्वांना हक्काची पक्की घरे मिळाली पाहिजेत हे अटलजींचे स्वप्न होते. पण गत २००४ ते २०१४ या दहा वर्षात दिल्लीत काँग्रेसचे रिमोट कंट्रोलचे सरकार होते. त्यांनी आठ लाख घरे मंजूर केली पण फक्त कागदावर. या उलट अटलजींनी कामगारांसाठी घरकुल योजना मंजूर केली. आता त्या ठिकाणी हक्काच्या मालकीच्या घरात कामगार कुटुंबिय राहतात. शिवाय आता ३० हजार घरकुल मंजूर केले असून २०२२ मध्ये सर्वांना घरांच्या चाव्या द्यायला मी येणार आहे.
पार्कवर ‘हर्र बोला हर्र’चा गजर!
‘भारत माता की जय’ने सुरवात… तर ‘हर्र हर्र बोला हर्र’च्या गजराने पंतप्रधान मोदींनी रॅलीचा समारोप केला. मोदींनी आपल्या भाषणात श्रीसिध्दरामेश्‍वर, तुळजाभवानी, विठोबा रुक्माई, अक्कलकोट स्वामी समर्थ व मंगळवेढ्याच्या दामाजीपंतांचा उल्लेख करून, सोलापूरच्या चार हुतात्म्यांची नावेही घेतली तसेच डॉ. कोटणीस यांना अभिवादनही केले.
सुशीलकुमार शिंदे यांना टोला
दोन दिवसांपूवी सोलापुरात पत्रकारांशी बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले होते. मी केलेल्या कामांचे उद्घाटन मोदी करतात, त्याचे श्रेय घेतात. शिंदे यांना मोदी यांनी त्याच भाषेत ठणकावले. ‘‘ज्या कार्यक्रमाचे शिलान्यास करतो, त्याचे उद्घाटनही आम्हीच करतो. सोलापूर, तुळजापूर येडशी चौपदरीकरणाचा शुभारंभ केला, आज त्याचेच उद्घाटन मी करीत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या ३० हजार घरकुल कामाचा आज शिलान्यास केला आहे, त्या घरकुलच्या चाव्या आम्हीच देणार,’’ असा विश्‍वासही मोदी यांनी व्यक्त केला. शिंदे यांना टोला लगावताना मोदी म्हणाले, ‘‘शिलान्यास के पुराने पत्थर उखाड के नया पत्थर लगाकर फिर एक बार उसका शिलान्यास पहले होता था। अब नही.’’
गरिबांना आरक्षण ही लबाडांना चपराक
वोट बँकेचे राजकारण करणार्यांवर मोदींचा हल्लाबोल
दलित, ओबीसी, आदीवासी यांचा आरक्षण कोटा कमी करण्याचा खोटा अपचार करुन देशात लोकांची दिशाभूल केली जात होती. आर्थिक गरीब घटकातील लोकांना आरक्षण देण्यासाठी हे सरकार दलित, आदिवासी आणि ओबीसींच्या कोट्यातून काढून घेणार असा प्रचार केला गेला. परंतू भारतीय जनता पार्टीने गरीब सवर्णांना १० टक्क्याच अतिरिक्त आरक्षण देण्याचा निर्णय घेत आम्ही खोटा प्रचार करणार्यांना चपराक लगावली आहे’, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
गरीब सवर्णांसाठी १० टक्क्यांच्या आरक्षणाचा निर्णय घेऊन आता कुणीही कुणाचे आरक्षण काढून घेऊ शकणार नाही हेच आम्ही दाखवून दिल्याचे मोदी म्हणाले. व्होट बँकेचा राजकारण्यांना जोरदार चपराक मारल्याचा उल्लेष करत सवर्णांना १० टक्के अतिरिक्त आरक्षण देऊन ‘सरकार सबका साथ सबका विकास’ काम करीत असल्याचे मोदी म्हणाले.
सर्वांना आरक्षण दिल्याच्या भूमिकेवरून बोलताना मोदी म्हणाले रात्री लोकसभेत गोरगरीब सवर्णांना दहा टक्के आरक्षण देण्याचा ठराव मंजूर केला, तेव्हा उपस्थितांमधून टाळ्यांचा कडकडाट झाला. मोदी म्हणाले की याचा अर्थ नक्कीच काल रात्री दीड वाजेपर्यंत तुम्हीही जागून लोकसभेचे लाईव्ह पाहिले आहे, असे म्हणताच लोकांनी टाळ्यांचा पुन्हा टाळ्यांचा कडकडाट केला.
आज बुधवारी राज्यसभेत या आरक्षणाचा ठराव मंजूर होईल, त्यासाठी विशेष बाब म्हणून अधिवेशनाची वेळही वाढविण्यात आली आहे. मागासवर्गीय, आदिवासी अन भारत ओबीसी वर्गाला कदापिही त्रास न होऊ देता सवर्णांना दहा टक्के आरक्षण दिल्यामुळे विरोधकांना करारा जवाब दिला आहे, असेही मोदी म्हणाले. त्यामुळे संपूर्ण स्टेडिमय मध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. नेहमीच जातीची विष पेरून व्होट बँकेची राजकारणा करणार्या काँग्रेससह विरोधकांचा मोदी यांनी यावेळी चांगलाच समाचार घेतला. मोदींच्या भाषणाला जनतेतून उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.
सोलापूर जिल्ह्याचे चित्र बदलत आहे : गडकरी
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांमुळे सोलापूर जिल्ह्याचे चित्र बदलत असल्याचे सांगितले. याविषयी पुष्टी देताना त्यांनी विविध महामार्ग, उड्डाणपूल, सिंचन आदी योजनांचा आकडेवारीनिशी तपशील मांडला. सोलापूर-येडशी या ९९ कि.मी. राष्ट्रीय महामार्गापैकी सोलापूर-तु़़ळजापूर-उस्मानाबाद या ५८कि.मी. चे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम दोन महिन्यात पूर्ण होणार आहे. संत ज्ञानेश्‍वर पालखी मार्ग असलेली मोहोळ ते वाखरी ४५ कि.मी. अंतराची ८६३ कोटी रुपये खर्चाची, वाखरी-खुडूस ३४ कि.मी. अंतराची ४८० कोटींची, खुडूस ते धर्मपुरी ३८ कि.मी. अंतराची व ७०० कोटींची निविदा काढली आहे.
चार नवीन ब्रीज कम बंधारे
सोलापूर जिल्ह्यात पाण्याचा प्रश्‍न गहन आहे. येथील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यात ४ नवीन ब्रीज कम बंधारे बांधण्याची योजना आखण्यात आली आहे. यामध्ये सांगली-सोलापूर रस्त्यावरील भीमा नदीवर घोडेश्‍वर, बेगमपूर, सीना नदीवर तिर्हे येथे, सोलापूर-विजयपूर रस्त्यावरील सीना नदीवर भट्टवाळ व भीमा नदीवर टाकळी अशा चार ब्रीज कम बंधार्यांचा समावेश आहे.
आता साखर नको इथेनॉलचे उत्पादन घ्या
सोलापूर जिल्ह्यात ३८ साखर कारखाने असून येथील ऊस उत्पादक शेतकर्यांची समस्या गंभीर असून याला केंद्र सरकार नव्हे ग्लोबल इकॉनॉमी कारणीेभूत आहे. ब्राझीलमध्ये साखर १९ रुपये किलो दराने तयार होते. याचा अनिष्ट परिणाम शेतकरी व साखर कारखान्यांवर झाला आहे. पंतप्रधान मोदींनी याबाबत ऐतिहासिक निर्णय घेत साखरेला प्रतिकिलो किमान २९ रुपयेे दर मिळवून दिला.
सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वेमार्ग मंजूर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सोलापूरता महत्वपूर्ण आहे कारण येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आतापर्यंत तीन वेळा वेळा आले आहेत. असे याआधी कधी घडले नाही. सोलापूरच्या विकासाबाबत २०१४ मध्ये मोदी यांनी सोलापूरच्या सभेत संकल्प बोलून दाखविला होता. म्हणूनच आज मोदी यांच्या आशीर्वादाने एक हजार कोटींची कामे या शहरात होऊ घातली आहेत. सोलापूर शहरासाठी पिण्याच्या पाण्याच्या योजनेकरिता ४५० कोटी रुपये पंतप्रधान मोदी यांनी दिले आहेत. या शहरात तीन दिवसाआड पाणीपुरवठा होतो, मात्र ही योजना पूर्ण झाल्यास २४ तास पाणीपुरवठा होणे शक्य आहे. या शहरात सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची योजना कार्यान्वित होणार असून शुद्ध केलेले पाणी एनटीपीसीला विकण्यात येणार आहे. एनटीपीसीला जे उजनीचे पाणी जाते ते शेतकर्यांना देण्याची योजना आम्ही आखली आहे. पंतप्रधान आवास योजनेतून गरिबांकरिता ३० हजार घरे होत आहेत. देशातील हा सर्वात मोठा प्रकल्प आहे. या योजनेबाबत नरसय्या आडम यांनी बँक गॅरंटीबाबत व्यक्त केलेली अडचण दूर करु. याबाबत पैसे देण्याची व्यवस्था सरकार केल्याशिवाय राहणार नाही. तुळजापूरला जाण्यासाठी भाविकांना आता गुळगुळीत रस्ता तयार झाला आहे. एवढेच नव्हे आता सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गालादेखील मान्यता पंतप्रधानांनी मान्यता दिली आहे. पंढरपूरला जाणारे पालखी मार्ग चकचकीत झाले असून आता यापुढे वारकर्यांना कुठलाही त्रास होणार नाही.
यंदा राज्यात दुष्काळाची स्थिती असृून या जिल्ह्यात केवळ ३८ टक्के पाऊस झाला आहे. द्ुष्काळाबाबत महाराष्ट्राने केंद्राला जे निवेदन दिले, त्यावर केंद्राने तत्परतेने टीम पाठविले. या टीमने सादर केलेला अहवाल अंतिम मंजुरीसाठी अर्थखात्याकडे आहे. याला पंतप्रधानांनी लवकरात लवकर अंतिम मान्यता दिल्यास शेतकर्यांना दिलासा देता येणार आहे.

Posted by : | on : 10 Jan 2019
Filed under : छायादालन, नागरी, राष्ट्रीय, सोलापूर.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in छायादालन, नागरी, राष्ट्रीय, सोलापूर (399 of 2239 articles)

Pm Modi Sabha In Solapur Park Maidan0
नरेंद्र मोदींचे राहुल, सोनिया गांधी यांना लक्ष्य, ►माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनाही लगावला टोला, संगमेश जेऊरे, सोलापूर, दि. ९ जानेवारी ...

×