ads
ads
मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

पंतप्रधान मोदींचा उमेदवारी अर्ज उद्या

पंतप्रधान मोदींचा उमेदवारी अर्ज उद्या

•वाराणसीत जय्यत तयारी सुरू •आज रोड शोद्वारे करणार शक्तिप्रदर्शन,…

तीन टप्प्यात गडकरींच्या देशभरात ५० प्रचारसभा

तीन टप्प्यात गडकरींच्या देशभरात ५० प्रचारसभा

•२७ सभांनी राज्यातही कमळजागर, नागपूर, २४ एप्रिल – भारतीय…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:

अगर तुम भी बुरे होते…

॥ संवाद : सोमनाथ देशमाने |

Pm Narendra Modi33

Pm Narendra Modi33

सदाबहार अभिनेता देव आनंद अभिनित आणि कुशल दिग्दर्शक विजय आनंद दिग्दर्शित रोमांचक थरारपट ‘जॉनी मेरा नाम’ अजूनही अनेक दर्दी सिनेरसिकांच्या स्मरणात असेल! चित्रपटाचा खलनायक प्रेमनाथ गँगस्टर असतो. त्याने आपला सख्खा भाऊ सज्जन याला तळघरात कित्येक वर्षे डांबून ठेवलेले असते. स्वप्नसुंदरी हेमामालिनी ही या सज्जनची लेक असते. तिच्यावर चित्रित झालेल्या बंजारा गीतातून ती जेव्हा आपल्या जन्मदात्या पित्यासाठी आर्त साद घालते, ओ बाबुल प्यारे…, तेव्हा बंदीखान्यातल्या तिच्या बापाची तगमग बघून प्रेक्षक आपले अश्रू रोखू शकत नाहीत! ओ बाबुल प्यारे…
त्यावेळच्या परिस्थितीवर भाष्य करणार्‍या या चित्रपटाचा संदर्भ एवढ्यासाठी घेतला की तशी परिस्थिती निर्माण होऊ नये याची खबरदारी घेणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे.
चित्रपटातील एका परमोच्च बिंदुवर प्रेमनाथ आणि सज्जन या दोन सख्ख्या भावांचा संवाद येतो.
प्रेमनाथला सज्जन विचारतो, आखिर तेरी समस्या क्या है? आखिर मेरा दोष क्या है जो मुझे तू इतनी बड़ी सज़ा दे रहा है?
प्रेमनाथ उत्तर देतो, तुम्हारा दोष यह है सज्जन की तुम बेहद शरीफ आदमी हो, बेहद ईमानदार हो और तुम्हारी इस शराफत, इस ईमानदारी ने बचपन से ही मेरा जीना हराम कर रखा है|
शराब तुम नहीं पीते| जुआ तुम नहीं खेलते| अय्याशी भी तुम नहीं करते| तुम्हारी यह शराफत मुझे परेशान करती है| तुम्हारी यह अच्छाई मुझे बुरा बनाती है| अगर तुम भी बुरे होते तो मुझे कोई परेशानी न होती|
नरेंद्र दामोदरदास मोदी या व्यक्तीविषयी जी मंडळी पराकोटीचा द्वेष करतात, ती तसं का करतात याचे उत्तर जॉनी मेरा नाम चित्रपटातील प्रेमनाथने चाळीसेक वर्षांपूर्वी देऊन ठेवले आहे. चित्रपटातील प्रेमनाथ गँगस्टर असला तरी खरं बोलायची हिंमत त्याच्याकडे होती, जी मोदीविरोधकांकडे नाही! म्हणूनच ते अधिकाधिक संदर्भहीन, वस्त्रहीन होत चालले आहेत.
मोदीविरोधक मग तो राजकीय क्षेत्रातला असो की अराजकीय क्षेत्रातला, तो प्रेमनाथच्या भूमिकेत आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी थोरला भाऊ सज्जनच्या भूमिकेत आहेत! फरक इतकाच आहे की हा सज्जन बंदीवासात नसून जनता जनार्दनाने त्याला भारताच्या पंतप्रधानपदी सन्मानाने विराजमान केले आहे. त्याच्या पाठीशी असलेल्या जनशक्तीच्या भरभक्कम पाठींब्यामुळे तो प्रेमनाथांचे अड्डे एकामागून एक उध्वस्थ करीत निघाला आहे. बिथरलेले प्रेमनाथ म्हणून तर त्याच्या जीवावर उठले आहेत. कॉंगी, वामी, मिशनरी, जिहादी, नक्षली, भाडोत्री मीडिया, नोकरशाही, स्वयंघोषित सेक्युलर विद्वान वगैरे एकजात सारे सज्जनच्या मागे हात धुऊन लागले आहेत. सज्जनचा एकमेव आधार आहे, तो म्हणजे पापभीरु राष्ट्रभक्त भारतीय जनता जनार्दन!
मोदीजींचा परिवार नाही, घराणेशाही नाही. सारा भारत हाच त्यांचा परिवार, अहोरात्र देशहितकारी काम करणे हाच त्यांचा श्रमपरिहार आहे. स्वतःसाठी, परिवारासाठी, घराण्यासाठी पक्ष, सत्ता, प्रसंगी सारा देश वेठीला धरणार्‍यांच्या डोळ्यात मोदीजींचा सफेद, बेदाग सदरा खुपणारच! नरेंद्र मोदी आपल्यासारखा नाही, आपल्यापेक्षा चांगला आहे, हीच तर मोदीविरोधकांसमोरची गंभीर समस्या आहे. त्या इर्षेतूनच विरोधकांकडून मोदी चारित्र्यहनन मोहीमा राबवल्या जात आहेत, ज्यात त्यांना कधीच सफलता मिळणार नाही.
कुणी मोदींच्या जवळचा नाही, कुणी लांबचा नाही. वैयक्तिक आर्थिक साम्राज्य नसलेला हा फकीर मातृभूमीचे आर्थिक, सामरिक, सांस्कृतिक, नैतिक साम्राज्य उभं करण्यासाठी पायाला भिंगरी बांधून देशभर, जगभर फिरतो आहे. मोदींच्या इमानदारी, देशभक्ती, वफादारी आणि अध्यात्मिक-नैतिक अधिष्ठानामुळे जग त्यांच्याकडे विश्वाचा तारणहार म्हणून बघत आहे. स्वतःच्या, घराण्याच्या हितापलिकडे कधी ज्यांनी विचारच केला नाही, त्यांना नरेंद्र मोदी यांची उंची कशी कळणार! म्हणूनच मोदीविरोधक स्वतःची रेषा मोदींच्या रेषेपेक्षा मोठी करण्याऐवजी मोदीजींची रेषा पुसून छोटी करण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत आहेत. वस्तुस्थिती अशी आहे की सर्व मोदीविरोधकांच्या कर्तृत्वरेषा एकापुढे एक ठेवल्या तरी त्यांची लांबी मोदींच्या कर्तृत्वरेषेच्या जवळपासही पोहचू शकत नाही!
कॉंग्रेसने उपकृत करुन ठेवलेला भारतातील गुलाम वामी मीडिया व्हॅटिकन पोपची निवड कशी होते याचे रसभरीत वर्णन करतो, ब्रिटनच्या महाराणीच्या सुनेला डोहाळे लागल्यापासून तिच्या बाळाच्या बारशापर्यंत इत्यंभूत माहिती पुरवतो, पण जगभरातला मीडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करतो, तेव्हा मात्र भारतीय मीडियाची तोंडं एरंडेल पिल्यासारखी होतात. विरोधकांचे भावी पंतप्रधान राहुल गांधी यांनी आज नरेंद्र मोदींवर कुठला नवीन आरोप केला, हे मात्र दिवसभर सांगत राहातो. याला म्हणतात खाल्या मिठाला जागणे! मोदीजींची आंतरराष्ट्रीय लोकप्रियता यांना सहन कशी होणार? सरकार दरबारी असलेली मीडियाची अवैध घुसखोरी, खाऊटी मोदी सरकारने बंद केली आहे! ज्या ज्या घटकांवर मोदी सरकारने या ना त्या कारणाने सर्जिकल स्ट्राईक्स केले आहेत, ते घटक २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारचा पराभव करण्यासाठी कुठल्याही थराला जायला तयार आहेत. या सार्‍यांच्या हितचिंतक, मार्गदर्शक मॅडम सोनिया गांधी म्हणाल्याच आहेत, ‘ऍट एनी कॉस्ट!’ मोदीला पुन्हा पंतप्रधान होऊ देणार नाही! हा फकीर सत्तेचा भुकेला नाही. नियतीने त्याच्यावर सोपविलेले वैश्विक कार्य पूर्ण झाले की हा संन्याशी दुसर्‍या संन्याशाकडे सत्तासूत्रं सोपवून हिमालयात निघून जाईल! नेहरु घराणेशाहीने यापुढे उगीच दिवास्वप्नं बघू नयेत!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा वामी-नक्षली कट नुकताच उघड झाला आहे. अशा देशविघातक तत्वांना असलेली कॉंग्रेसची सहानुभूती वेळोवेळी चव्हाट्यावर आली आहे. दिग्विजय सिंह यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकाचा उल्लेख शहरी नक्षल्यांच्या पत्रव्यवहारात आढळून आला आहे. या क्रमांकावर कुणाकुणाचे काय काय संभाषण झाले, ते यथावकाश उघड होईलच. साध्वी प्रज्ञासिंह यांनी विकलेली स्कुटर मालेगाव बॉम्बस्फोट ठिकाणी सापडली म्हणून संपुआ सरकारने त्यांना प्रदीर्घ काळ तुरुंगात डांबून ठेवले होते आणि त्याला दिग्विजय सिंह यांचा पाठींबा होता. आता त्यांचाच मोबाईल नंबर देशाच्या पंतप्रधानाच्या हत्येचा कट रचणार्‍या शहरी नक्षल्यांकडे सापडला आहे! नियती फार कठोर असते हो दिग्गी राजासाब!
जॉनी मेरा नाम चित्रपटात एकच प्रेमनाथ होता, परंतु इथे तर सज्जनला टिपण्यासाठी प्रत्येक फांदीवर अनेक प्रेमनाथ दबा धरुन बसले आहेत. म्हणूनच २०१९ ची लोकसभा निवडणूक समस्त भारतीयांच्या राष्ट्रभक्तीची कसोटी पणाला लावणार आहे!
देशातल्या सर्वात जुन्या नेहरु घराणेशाहीच्या खुशालचेंडू वारसदाराला पंतप्रधानपदी बसवायला राज्याराज्यातील घराणेशाहीचे कोण कोण वारसदार संस्थानिक पुढे सरसावले आहेत बघा! लालु प्रसाद यादवांची आरजेडी, मुलायम सिंग यादवांची एसपी, फारुख अब्दुल्लांची एनसी, शरद पवारांची एनसीपी, ओमप्रकाश चौटालांची आयएनएलडी, करुणानिधींची डीएमके, चंद्राबाबु नायडूंची टीडीपी, देवेगौडांची जेडीएस, ठाकरेंची शिवसेना, …! यांना मोदी पंतप्रधान म्हणून नको आहेत, कारण मोदीजी कुठल्याही घराणेशाहीतून आलेले नाहीत!
मायावती, ममता, मेहबुबा, केजरीवाल, वामदल, शरद यादव, कमल हसन, … बहुतेक सारे मोदीविरोधक आणि रालोआतील काही घटक दल सोनिया दरबारी मिळेल ती मनसबदारी स्विकारतील, इच्छा असो वा नसो युवराज राहुल गांधी यांचे खुजे नेतृत्व स्विकारतील, कारण देशाला मिळालेले टोलेजंग मोदी नेतृत्व यांना सहन होत नाही! ‘भला उसकी कमीज मेरी कमीज से सफेद कैसी हो सकती है?’
मोदीजींची विजयी घोडदौड अशीच सुरु राहिली, तर अनेक प्रेमनाथांना एकतर मल्या, चोक्सीच्या मार्गाने जावे लागेल किंवा तिहारची हवा खावी लागेल याची भीती झोप येऊ देत नाही! दुर्दैवाने प्रेमनाथांची षडयंत्रं कामयाब झाली, तर देशातील अनेक सज्जन, साध्वी, पुरोहित वगैरेंची रवानगी काळकोठडीत केली जाईल, लोकशाही ओ बाबुल प्यारे… म्हणून टाहो फोडील! आपल्याला यातलं काय हवं आहे, ते भारतीय मतदारांनी ठरवायचे आहे!
मोदीजी पुन्हा पंतप्रधान म्हणून का नकोत? मोदींकडून आपल्याला काय हवं होतं जे मिळाले नाही? याचं संयुक्तिक स्पष्टीकरण कुण्याही मोदीविरोधकाकडे नाही आणि खरी कारणं ते जाहीरपणे सांगू शकत नाहीत! स्वतः खाणारा आणि आम्हालाही खाऊ देणारा चौकीदार पाहिजे, असं उघडपणे म्हणता येत नाही! तालेवार सराईत कर्जबुडव्यांना उघडपणे कर्जमाफी मागता येत नाही, म्हणून सरसकट कर्जमाफीचा बुरखा पांघरला जातो! सज्जनमुळे जॉनी मेरा नाम चित्रपटातील गँगस्टर प्रेमनाथची जशी गोची झाली होती, अगदी तशीच अवस्था मोदींमुळे मोदीविरोधकांची झाली आहे!
मोदी सरकारच्या नोटाबदली, जीएसटीसारख्या देशहितकारी योजनांना विरोध करणार्‍यांनीच त्या योजना किती आवश्यक आहेत यावर अप्रत्यक्षपणे शिक्कामोर्तब केले आहे! उज्ज्वला योजना, दीनदयाल ज्योतिर्ग्राम योजना, वन रँक वन पेन्शन, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री बीमा योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ योजना, शौचालय निर्माण, स्वच्छता अभियान, सडक निर्माण, संरक्षण सिध्दता, स्टार्ट अप योजना, आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जनौषधी योजना, …! विरोधक कशालाच उघडपणे विरोध करु शकत नाहीत, ही तर त्यांची खरी गोची आहे. मोदी समजून घेण्यासाठी मोदीच व्हावे लागेल!
भारताच्या प्रचंड असंतुलीत लोकसंख्येकडे संकट म्हणून न बघता सव्वाशे कोटी भारतीयांच्या अडीचशे कोटी हातांना कार्यप्रवण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत मोदीजी! कॉंग्रेसच्या हाताने लोकांना भीक मागायची सवय लावली आणि आम्हालाही सरकारांपुढे हात पसरताना लाज वाटेनाशी झाली, किंबहुना भीक मागणे हा आमचा अधिकार आहे, असं समजण्यापर्यंत आमची अधोगती झाली. भीक मागणार्‍या हातांमध्ये दातृत्व निर्माण करण्यासाठी, नोकरी मागणार्‍या होतकरु तरुणाईमधून उद्योजक निर्माण करुन इतरांना रोजगार उपलब्ध करुन देण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी हा फकीर मोदी सकारात्मक प्रयत्न करतो आहे. आपण त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन स्वावलंबी, स्वाभिमानी राष्ट्र निर्माण करण्यासाठी साथ दिली पाहिजे! मोदीजींसाठी नाही, तर आपल्या भावी पिढ्यांच्या, मातृभूमीच्या उज्वल भविष्यासाठी आपण आपला वर्तमान खर्ची घातला पाहिजे!
ब्रिटीशांकडून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अमेरिकेने पहिले कार्य हाती घेतले ते गुलामगिरीची पदचिन्हं पुसून टाकून स्वतंत्र अमेरिकेची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचे! ब्रिटीश कल्चर, नियमावली, पायाभूत सेवा सुविधा, एवढेच नाही तर इंग्रजी भाषा! प्रत्येक गोष्टीची नव्याने अमेरिकन बांधणी केली. अमेरिकेची इंग्रजी ही ब्रिटीश इंग्रजीपेक्षा वेगळी! गणितीय भाषा वेगळी आणि नवनिर्मित अस्सल अमेरिकन! कुठेच त्यांनी ब्रिटीशांचे अनुकरण केले नाही. ब्रिटीशांची लेफ्ट हँड ड्राईव्ह फेकून देऊन त्यांनी अमेरिकेची राईट हँड ड्राईव्ह प्रणाली विकसीत केली! अमेरिकेवर ब्रिटीशांचे राज्य होते ही मानसिक गुलामगिरी अमेरिकेने फेकून दिली आणि त्यातूनच आजची जागतिक महासत्ता संयुक्त अमेरिका उभी राहिली!
गंमत म्हणजे अमेरिकेला फार मोठा इतिहास नाही आणि ९९% अमेरिकन्स मूळ अमेरिकन्स नाहीत! तरीही माय अमेरिका या जीवनध्येयाशी ते कधीही तडजोड करीत नाहीत!
आमच्या भरतभूमीला समृध्द सनातन वारसा लाभलेला आहे, हजारो वर्षांपासून आम्ही याच मायभूमीत वास करत आहोत, तरीही आमची राष्ट्रभक्ती ही कालपरवाच्या अमेरिकनांच्या राष्ट्रभक्तीपेक्षा इतकी पातळ कशी काय आहे? अमेरिकेप्रमाणेच स्वातंत्र्य प्राप्तीनंतर लगेचच नवहिंदुस्थान निर्मितीचे कार्य जवाहरलाल नेहरु हाती घेऊ शकले असते, पण दुर्दैवाने तसे घडले नाही. जवाहरलाल नेहरुंनी युरोपीय मानसिकता आणि मुगल अनुवांशिकता जपण्यालाच प्राधान्य दिले. भारतीयांच्या अंगी गुलामगिरी इतकी भिनवली गेली आहे की अलाहाबादचे विस्मृतीत गेलेले प्रयागराज असे पुनरुज्जीवन करायचे म्हटले तरी आम्ही त्याविरुध्द थयथयाट करतो. विदेशी, विधर्मी आक्रमकांची अमंगळ पदचिन्हं कायमची पुसून टाकण्यासाठी आणखी किती काळ जावा लागेल माहीत नाही, कारण आम्हीच त्यांना कवटाळून बसलो आहोत!
मोदी राजवटीत नोकरशाही नाराज आहे, कारण त्यांना आता पूर्वीसारखी टंगळमंगळ करता येत नाही, पूर्णपगारी दांड्या मारता येत नाहीत, लाच मागताना पकडलं जाण्याची भीती वाटते! धनदांडगे मोदी सरकारवर यासाठी नाखूष आहेत की आता काळा पैसा निर्माण करणे, तो सांभाळणे, वापरणे दिवसेदिवस अवघड होत चालले आहे! मोदी सरकारने प्रत्येक व्यवहारासाठी पारदर्शकतेचा, रोकड विरहित देवघेवीचा आग्रह धरल्यामुळे परंपरागत करचोरांचा जळफळाट होत आहे. संशयास्पद रोकड व्यवहारातूनच काळ्या पैशाची निर्मिती होत असते.
वेगवेगळ्या सरकारी आर्थिक सवलती रास्त लाभार्थ्यांपर्यंत त्यातला एकही पैसा रस्त्यात न झिरपता पोहचाव्यात म्हणून त्यांची आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक खाते यांची सांगड घातल्यामुळे बोगस लाभार्थी आणि त्यांचे दलाल बेहाल! शेतकर्‍यांची लूट थांबावी म्हणून युरिया नीम कोटेड केल्यामुळे नफेखोर खत निर्माते, विक्रेते यांचे आडमार्ग बंद झाले! स्वस्तात मस्त जनौषधी केंद्रांची श्रंखला देशभर सुरु केल्यामुळे गिर्‍हाईकांना लुटणारे परंपरागत औषध विक्रेते बिथरले! औषध निर्माते, औषध विक्रेते, व्यावसाईक डॉक्टर पॅथॉलॉजी प्रयोगशाळा चालक यांच्या भक्कम सामाईक आर्थिक हितसंबंधांना मोदी सरकारच्या पारदर्शकतेचे प्रचंड हादरे बसू लागले! रेरा कायद्यामुळे बिल्डर लॉबी हादरली! बेनामी संपत्ती कायद्यामुळे भूखंड-मकान माफिया खवळले! एक ना अनेक घटक मोदी सरकारच्या जनहितकारी, देशहितकारी निर्णयांवर कमालीचे नाराज आहेत. मेरी अवैद्द दुकानदारी घाटे मे चल रही है, तो देशहित गया भाड में| या प्रवृत्तीच्या लोकांना आणि त्यांच्या आश्रयदात्यांना मोदी सरकार पुन्हा नको आहे.
या सार्‍यांचे आर्थिक हितसंबंध सांभाळून घेत मोदीजींना आरामात राज्य करता आले असते, पण त्यांचा तो पिंडच नाही आणि त्यांच्यावर तसे कुसंस्कारही झालेले नाहीत! मातृभूमी भारत आणि सव्वाशे कोटी देशबांधव यांच्यावर नितांत प्रेम करणारा हा वेडा फकीर राष्ट्रजीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातली दुष्टाई नष्ट करुन एक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत निर्माण करण्यासाठी हा नवदधिची अपनी हड्डियॉं गलॉं रहा है| भारत मातेच्या या ली कुआनला हवाय जनता जनार्दनाचा भक्कम आशिर्वाद! मॉं भारती तुझे शत शत प्रणाम!

Posted by : | on : 25 Nov 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, सोमनाथ देशमाने, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, सोमनाथ देशमाने, स्तंभलेखक (381 of 1371 articles)

Kejriwal
जागता पहारा : भाऊ तोरसेकर | नाट्यमयता ही केजरीवालांच्या रक्तात आणि आम आदमी पक्षाच्या डीएनएमध्येच सामावलेली आहे. त्यामुळे आता निवडणूकांचे ...

×