ads
ads
दोन टप्प्यानंतर ममता झोपल्याच नाहीत

दोन टप्प्यानंतर ममता झोपल्याच नाहीत

•पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, बुनियादपूर, २० एप्रिल –…

दहशतवाद, पाकला प्रत्युत्तर देण्यासाठी मोदीच पंतप्रधान हवेत : अमित शाह

दहशतवाद, पाकला प्रत्युत्तर देण्यासाठी मोदीच पंतप्रधान हवेत : अमित शाह

बंगरूळु, २० एप्रिल – देश सुरक्षित राहण्यासाठी आणि दहशतवाद…

राज्यांमध्ये लवकरच सायबर न्यायवैद्यक प्रयोगशाळा

राज्यांमध्ये लवकरच सायबर न्यायवैद्यक प्रयोगशाळा

•महिलाविरोधी गुन्ह्यांतील डीएनए चाचणी होईल शक्य, नवी दिल्ली, २०…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके |

गेटवे ऑफ इंडिया, इंडिया गेट ह्या तर ब्रिटीशांनी बांधलेल्या वास्तू आहेत. मग यापूर्वीच्या सरकारांनी त्यांचे सुशोभिकरण का केले? तिथे दररोज हजारो पर्यटक का भेट देतात आणि त्यावर अनेकांचा चरितार्थ का चालतो? मग भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाचे याहून मोठे भव्यदिव्य स्मारक यापूर्वीच्या सरकारांनी का उभे केले नाही? ते केले असते तर त्याची जगभरात ख्याती झाली नसती का? राष्ट्रीय अस्मिता म्हणून काही विशेष गोष्टी करणं अत्यंत आवश्यक असतं हे स्वत: सरदार पटेलांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर करूनच दाखवलं, सौराष्ट्रात सोमनाथ मंदिराचं पुनर्निर्माण करून! मग सध्याच्या सरकारने एका असामान्य कर्तृत्ववान व्यक्तीचं आंतरराष्ट्रीय स्मारक उभं करून तीच अस्मिता पुन: प्रज्वलित केली यात काय चुकलं?

Statue Of Unity

Statue Of Unity

ताजमहाल जेव्हा बांधला गेला तेव्हा भारतातलं प्रत्येक घर श्रीमंत होतं का? गावोगावी उत्तम रस्ते, रूग्णालयं वगैरे होती का? असं काही आलबेल चित्र त्या काळात असावं असं वाटत नाही. मग ही विकासकामं करण्याचं सोडून एवढे पैसे तो महाल बांधण्यावर खर्च कशाला केले? असा मुद्दा आज कुणीही उपस्थित करत नाही. ताजमहालाशी संबंधित पर्यटनामुळे भला मोठा रोजगार वर्षाचे ३६५ दिवस उपलब्ध झाला आहे, त्याचा लाभ मात्र सगळ्यांना होतो आहे.
प्रत्येक ऐतिहासिक स्थळ, धार्मिक स्थळ किंवा एकूणच पर्यटन स्थळ यांचं निरिक्षण केलं तर असं दिसतं की, त्या त्या नागरी भागाची बहुतांश अर्थव्यवस्था या स्थळांमुळे बळकट झाली आहे, स्थिरावली आहे.
जे देश गेल्या पन्नास-साठ वर्षांत उदयाला आले त्यांनी पर्यटन क्षेत्रात त्यांचा स्वत:चा स्वतंत्र ठसा कसा उमटवला, याचा अभ्यास आपण कधी करणार? दुबई, सिंगापूर, थायलंड, मलेशिया, बँकॉक, पट्टाया या ठिकाणची अर्थव्यवस्था कशावर आधारित आहे? त्या देशांमध्ये नागरी प्रश्‍नच नाहीत असं नाहीय. जगात सर्वसुखी कोण आहे? पण जगभरातील पर्यटकांना खेचून आणून परकीय चलनातून स्वत:ची आर्थिक घडी नीट बसवण्यासाठी त्यांनी पर्यटनस्थळं नव्यानं निर्माण करण्याचे धाडसी निर्णय घेतलेच ना.
पर्यटन व्यवसायाकडे आजवर आपण निव्वळ नफा मिळवण्याचा धंदा म्हणूनच बघत आलो. पण त्यात भर घालण्याच्या दृष्टीनं आपण काय केलं? काहीच केलं नाही. इतकी वर्षं संपूर्ण भारतभरातून भक्त अक्कलकोटला येतात. पण तिथला विकास का होऊ शकला नाही? तिथे अजूनही नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. गावाच्या आर्थिक-सामाजिक राहणीमानाचा स्तर विकसित झाल्याचं आजही दिसत नाही. गावाची विकासाची दिशा म्हणजे केवळ भल्या मोठ्या चकचकीत बिल्डींग्ज, सिमेंटचे रस्ते एवढ्यापुरतीच मर्यादित नसते, हे विकसकांना कळत नसेल का?
कापूरहोळ येथील व्यंकटेश मंदिर किंवा शेगांव येथील श्री गजानन महाराज संस्थान यांची उदाहरणं प्रत्यक्ष जाऊन अनुभवण्यासारखीच आहेत. देवस्थानाचे पावित्र्य त्यांनी अत्यंत व्यवस्थित जपल्याचे जाणवते. ही देवस्थाने तेथील काटेकोरपणे सांभाळल्या जाणार्‍या स्वच्छतेकरिता प्रसिद्ध आहेत, शिस्तीकरिता विख्यात आहेत. व्यवस्थापनशास्त्राच्या अभ्यासक्रमात ‘तीर्थक्षेत्र व्यवस्थापन’ किंवा ‘धार्मिक क्षेत्र व्यवस्थापन’ असा अभ्यासक्रम का सुरू होऊ शकत नाही? ती भारताची विशेष गरज आहे. कारण भारतभरातील सर्व विशेषक्षेत्रांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्धी झाली आहे.
तिरूमला-तिरूपती देवस्थानम् च्या ठिकाणी प्रसाद तयार करणारे आचारी, सुरक्षा यंत्रणा आणि वाहतूक कर्मचारी यांचीच संख्या काही हजारांत असेल. याखेरीज स्वच्छता विभाग, निवास व्यवस्था, खानपान सुविधा, खाजगी निवासव्यवस्था अशा अनेक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळाला आहे व आणखी वाढतोच आहे. वर्षभरात कोट्यावधी भाविक या ठिकाणी जात असतात. परंतु, तेथील निसर्ग सौंदर्यास धक्का बसू दिला गेलेला नाही, हेही समजून घेतलं पाहिजे. थोडक्यात म्हणजे, शेकडो वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या भक्तीस्थळामुळे येथील अर्थव्यवस्था भक्कम झाली.
हे लक्षात घेऊन, अभ्यास करून, दूरदृष्टीपूर्वक कल्पक योजना करून अशी पर्यटनस्थळं विकसित करून त्यांची जगभरात प्रसिद्धी करून त्याद्वारे आर्थिक विकास का करता आला नाही? गेल्या ७२ वर्षांमध्ये अशा किती स्थळांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंद घेता येऊ शकेल असा विकास करण्यात आला? किंवा त्या दर्जाची नवनिर्मिती केंद्रसरकारद्वारे करण्यात आली? अशा ठिकाणी हा विकास झाला असता तर तेथील जनता तेथेच स्थिरावू शकली नसती का? शहरांकडे येणारे जनसंख्येचे लोंढे या माध्यमातून थांबवता आले नसते का? भारतातील अक्षरश: हजारो स्थळं अशा प्रकारे विकसित का केली गेली नाहीत? याचं उत्तर आधीच्या केंद्र सरकारांनी भारतीयांना द्यावं.
‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ च्या खर्चाविषयी मोठ्या प्रमाणावर आरडाओरड करण्यात आली. तेवढ्याच खर्चात कितीतरी शाळा, रूग्णालयं, रस्ते वगैरे सुविधा झाल्या असत्या असा मुद्दा उभा करण्यात आला. याआधी संपूर्ण भारतातत्या प्रत्येक गावागावात वीज कनेक्शन, २४ तास शुद्ध पाणी, उत्तम शिक्षण, पक्के रस्ते, उत्तम रूग्णालय, रक्तपेढी, मोठं वाचनालय अशा सुविधा निर्माण करण्यावरच भर देण्यात आला म्हणून सरदार पटेल यांच्या स्मारकाकरिता निधीच उरला नाही, असं यापूर्वीच्या केंद्रसरकारांचं म्हणणं आहे का? आजवर या सरकारांना जागोजागी खरोखर कौतुक करावं अशी अत्यंत स्वच्छ आणि निर्जंतुक स्वच्छतागृहं धड उभी करता आली नाहीत, रस्त्यावरचे फुटपाथ मुक्त करता आले नाहीत, लोकांना वाहतुकीचे नियम पाळण्याची शिस्त लावता आली नाही, सरकारी शाळांची गुणवत्ता वाढवतां आली नाही, साधी बसस्थानकं स्वच्छ आणि धूळमुक्त करता आली नाहीत.. आणि हेच लोक आताच्या केंद्रसरकारवर टीका करणार?
आजवरच्या सर्व भारतरत्न, खेलरत्न, ज्ञानपीठ, परमवीरचक्र, दादासाहेब फाळके पुरस्कार, अशा विविध सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित व्यक्तिमत्वांचं कर्तृत्व एकत्रितपणे जगासमोर येईल असं प्रेरणादायक स्मारक किंवा स्थळ आजतागायत निर्माण करण्यात आलेलं नाही. कारण त्यातली राष्ट्रीय अस्मिताच आमच्या सरकारांना जाणवली नाही. ७२ वर्षांत रायगडाचं पुनर्बांधकाम करून आमची राजधानी जशीच्या तशी पुन्हा उभी करावी आणि तो वारसा जपावा, असं काम करायला कुणी विरोध केला होता? देवगिरीचं पुनर्निमाण, सिंधुदुर्गाचं पुनर्निमाण, सोलापूरमध्ये चार हुतात्म्यांचं भव्य स्मारक, आझाद हिंद सेनेचं भव्य स्मारक यांच्या निर्मितीला कुणीही विरोध करण्याचं कारणच नव्हतं. मग पूर्वीच्या सरकारांनी मनावर घेऊन त्याद्वारे राष्ट्रीय अस्मिता का पुनरूज्जीवित केली नाही? आज देशविदेशांतून लाखो पर्यटक रायगड, देवगिरी, सिंधुदुर्गास भेट देण्याकरिता येतात, त्या वास्तू जशाच्या तशा बांधून काढल्या असत्या तर भारतीय इतिहासाची किर्ती जगभरात पसरली असती. १९४७ पासून २०१३ पर्यंत हे काम का केलं गेलं नाही? आणि आज मात्र स्टॅच्यू ऑफ युनिटी वर टीका करता?
सोलापूर जिल्ह्याचंच उदाहरण पहा. इतकी वर्षं मागणी होत होती, पण एसी बस मिळत नव्हती. आता ती बससेवा सुरू झाली आहे. पुण्यातून नाशिक, पणजी, शिर्डी, त्र्यंबकेश्‍वर, तुळजापूर, अक्कलकोट, पंढरपूर, सोलापूर कोल्हापूर, उमरगा, दापोली, चिपळूण, हैदराबाद या ठिकाणी शिवशाहीची वातानुकूलित बससेवा सुरू आहे. त्यात पुष्कळ तृटी असतीलही. पण पिचकार्‍यांनी रंगलेल्या, जागोजागी उलट्यांचे डाग पडलेल्या, धुळीने माखलेल्या अस्वच्छ घाणेरड्या बसेसमधून प्रवास करण्याची वेळ तरी टळली, त्याचं श्रेय तरी आताच्या सरकारला दिलंच पाहिजे. आजवर एसटी बसेस स्वच्छ,चकाचक ठेवण्याचा खर्च वाचवून, त्याच रकमेतून आधीच्या सरकारांनी असं कोणतं मोठं काम उभं केलं आहे, त्याची माहिती हे शासनकर्ते जनतेला देऊ शकतील का?
विद्यमान सरकारने एकीकडचा आवश्यक खर्च टाळून तोच निधी स्मारकाकरिता वापरल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. पण तेजस एक्सप्रेस किंवा दिल्ली ते मीरत चौदा लेनचा महाकाय महामार्ग असे प्रकल्प या सरकारने निर्माण केलेच ना? तिथं उपलब्ध करून दिलेल्या अत्याधुनिक सुविधांचं नागरिकांनी काय केलं, हे सोशल मीडीयाच्या माध्यमातून पूर्ण जगभरात कळलं. मग तो खर्च फुकट वाया गेला असं म्हणायचं का? तो खर्च करण्याचीच गरज नव्हती असा अर्थ घ्यायचा का? हाच न्याय रस्त्यावरच्या सिग्नल्सना आणि झेब्रा क्रॉसिंगच्या पट्ट्यांनाही लागू करता येईल. कारण अजूनही त्यांचं काटेकोरपणे पालन होताना दिसत नाही, मग इतकी वर्षं त्यावर झालेला खर्च व्यर्थच गेला ना? असा अर्थ लावायला काहीच हरकत नाही.
सरदार पटेलांचा स्वत:चाच स्मारक व पुतळ्यांना पूर्ण विरोध होता, आणि आता मात्र त्यांच्याच पुतळ्यावर हजारो कोटींचा खर्च होतोय असा खोचक लेख लोकसत्ताच्या फेसबुक पेजवर मोठ्या दिमाखात प्रसिद्ध करण्यात आला. सरदार पटेल आधीच्या सत्ताधारी पक्षांकरिता आदरणीय होते तर मग त्यांच्याच मतांचा पूर्ण आदर करायचं ठरवल्यास गेल्या अनेक वर्षांपासून संपूर्ण देशभरात उभ्या करण्यात आलेल्या आणि प्रस्तावित असलेल्या स्मारकांचे व पुतळ्यांचे काय करायचे? असा प्रश्‍न लोकसत्ताने यापूर्वी आजतागायत कधीही विचारला नाही. मग नेमकी आताच ही आगलावणी लोकसत्ताने का केली असावी?
‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ च्या उभारणीकरिता चीन मधील तंत्रज्ञांची मदत घेण्यात आली यावरही टीकेची झोड उठवण्यात आली. मग ‘मेड इन चायना’ वस्तू वापरणं पूर्णपणे बंद करा असा आग्रह मीडीयानं आजतागायत कधीच का धरला नाही? ९३ वर्षं वयाच्या ज्येष्ठ मराठी शिल्पकाराने जगातली सर्वात मोठी शिल्पकृती तयार केली त्यावर त्यांची मुलाखत कोणत्या मराठी वृत्तवाहिनीने घेतली? सरदार पटेल काँग्रेसचे नेते होते व त्यांची जागतिक दर्जाची शिल्पकृती घडवली, या असामान्य कर्तृत्वाविषयी त्या श्रेष्ठ शिल्पकारांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळावा असा आग्रह सध्याचा विरोधी पक्ष करणार आहे का?
गेटवे ऑफ इंडिया आणि इंडिया गेट ह्या तर ब्रिटीशांनी बांधलेल्या वास्तू आहेत. मग यापूर्वीच्या सरकारांनी त्यांचे सुशोभिकरण का केले? तिथे दररोज हजारो पर्यटक का भेट देतात आणि त्यावर अनेकांचा चरितार्थ का चालतो? मग भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाचे याहून मोठे भव्यदिव्य स्मारक यापूर्वीच्या सरकारांनी का उभे केले नाही? ते केले असते तर त्याची जगभरात ख्याती झाली नसती का?
राष्ट्रीय अस्मिता म्हणून काही विशेष गोष्टी करणं अत्यंत आवश्यक असतं हे स्वत: सरदार पटेलांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर करूनच दाखवलं, सौराष्ट्रात सोमनाथ मंदिराचं पुनर्निर्माण करून ! मग सध्याच्या सरकारने एका असामान्य कर्तृत्ववान व्यक्तीचं आंतरराष्ट्रीय स्मारक उभं करून तीच अस्मिता पुन: प्रज्वलित केली यात काय चुकलं?
मानसतज्ञ, संचालक-प्रमुख,
आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

Posted by : | on : 18 Nov 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, मयुरेश डंके, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, मयुरेश डंके, स्तंभलेखक (392 of 1367 articles)

Rafale Fighter Supreme Court
सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र मान्य केलीच पाहिजे की, देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असलेला हा विषय ...

×