ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी » अभिव्यक्तिस्वातंत्र्याची वकिली…

अभिव्यक्तिस्वातंत्र्याची वकिली…

॥ विश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले |

याचाच साध्या भाषेतला अर्थ असा की, ते हिंदुत्वविरोधक आहेत. पण, असं म्हणायचं नाही बरं का! असं पाहा की, या देशात भाषा, प्रांत, जाती, वेश, समजुती, पद्धती यांमध्ये अमर्याद वैविध्य आहे. म्हणजेच भारत हा देश आणि इथला समाज ही ‘प्लूरलिस्टिक सोसायटी’ आहे. आणि ही विविधता हजारो वर्षांपासून इथे आहे. आम्ही ती मानतो. आणि म्हणून ज्यांचं असं म्हणणं आहे की, हे हिंदू राष्ट्र आहे; ते त्यांचं प्रतिपादन तार्किकदृष्ट्या चुकीचं आहे, ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचं आहे नि म्हणून आम्ही ते अमान्य करतो. वा! काय तर्कशास्त्र आहे! काय बुद्धिवाद आहे! याला म्हणतात विचारवंत!

A G Noorani

A G Noorani

अब्दुल गफार अब्दुल मजीद नूरानी हे नाव तुम्हाला माहितेय का? बरं, ए. जी. नूरानी हे नाव तरी माहितेय? बरोबर! तेच ते लेखक महाशय! जे देशभरच्या मोठमोठ्या इंग्रजी वृत्तपत्र-मासिकांमधून राजकारण, समाजकारण, स्वातंत्र्य आंदोलन, संरक्षण, इस्लाम, हिंदुत्व इत्यादी विषयांवर विद्वत्ताप्रचुर लेख, निधर्मीपणाचा आव आणून लिहीत असतात. इरफान हबीब, रफीक झकेरिया वगैरे मुसलमान विचारवंतांप्रमाणेच ते स्वत:ला निधर्मी म्हणवतात आणि इंग्रजीत लिहितात, बोलतात.
याचाच साध्या भाषेतला अर्थ असा की, ते हिंदुत्वविरोधक आहेत. पण, असं म्हणायचं नाही बरं का! असं पाहा की, या देशात भाषा, प्रांत, जाती, वेश, समजुती, पद्धती यांमध्ये अमर्याद वैविध्य आहे. म्हणजेच भारत हा देश आणि इथला समाज ही ‘प्लूरलिस्टिक सोसायटी’ आहे. आणि ही विविधता हजारो वर्षांपासून इथे आहे. आम्ही ती मानतो. आणि म्हणून ज्यांचं असं म्हणणं आहे की, हे हिंदू राष्ट्र आहे; ते त्यांचं प्रतिपादन तार्किकदृष्ट्या चुकीचं आहे, ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचं आहे नि म्हणून आम्ही ते अमान्य करतो.
वा! काय तर्कशास्त्र आहे! काय बुद्धिवाद आहे! याला म्हणतात विचारवंत! तर नूरानी हे अशा विचारवंतांच्या मांदियाळीतले एक आहेत. सध्या ते ८८ वर्षांचे आहेत. ते मूळचे मुंबईचे. मुंबई उच्च न्यायालयात उत्तम वकील म्हणून नावलौकिक मिळवल्यावर त्यांनी सर्वोच्च न्यायालयातही वकिली केली. कायद्याच्या कलमांचा आपल्या अशिलाला अनुकूल असा अर्थ लावणे आणि न्यायालयापुढे तशी मांडणी करणे, हे कोणत्याही कुशल वकिलाचं कर्तव्यच असतं. त्यासाठीच अशील त्याला पैसे देत असतं. नूरानी महाशयांचं मोठं अशील म्हणजे शेख अब्दुल्ला. काश्मीरचा भारतात विलय करणं हे कसं अन्याय्य आहे; शेख अब्दुल्लांना भारत सरकारने काही वर्षं नजरकैदेत ठेवलं होतं, ते कसं अन्याय्य आहे, इत्यादी गोष्टींवर त्यांनी अत्यंत विद्वत्ताप्रचुर पुस्तकं, लेख लिहिले आहेत. भाषणं केली आहेत. तीच गोष्ट हैदराबाद संस्थानची. निजाम-उल्-मुल्क हा हैदराबाद संस्थानचा अधिपती आपलं राज्य भारतात विलीन करायला तयार नसताना, सरदार पटेलांनी पोलिस कारवाई करून ते विलीन करणं हे कसं चुकीचं आहे, याचं विवेचन करणारी पुस्तकं, लेख, भाषणं नूरानी महाशय, आपलं सगळं वकिली कौशल्य पणाला लावून करत असतात.
नूरानी आणि त्यांच्या सहप्रवासी विद्वानांचं आणखी एक वैशिष्ट्य असं की, हिंदू समाजाला ज्यामुळे बरं वाटेल, सुख वाटेल, असं एखादं वाक्यदेखील ते कटाक्षाने लिहीत नाहीत. उदा. त्यांचं जीना आणि टिळक यांच्यावरचं पुस्तक पाहा. महंमद अली जीना हे लोकमान्य टिळकांपेक्षा वीस वर्षांनी लहान होते आणि एकेकाळी ते टिळकांचे अनुयायी होते. पण असं म्हणायचं नाही. कारण मग टिळक मोठे ठरतात ना! म्हणून मग पुस्तकाचं नाव ‘जीना अ‍ॅण्ड टिळक : कॉम्रेडस् इन फ्रीडम स्ट्रगल’ असं ठेवायचं आणि पुस्तकातलं प्रतिपादनही तशाच रोखाने करायचं.
असो. तर सध्या नूरानी महाशय, भारताच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचं होणार तरी काय, अशा चिंतेत पडले आहेत. आणि ती चिंता त्यांनी व्यक्त कुठे केलीय, तर पाकिसतानच्या ‘डॉन’ या वृत्तपत्रात. आता या ‘डॉन’ची देखील मोठी गंमतच आहे. इंडियन मुस्लिम लीग या आपल्या राजकीय पक्षाची बाजू इंग्रजी भाषेत मांडण्यासाठी महंमद अली जीनांनी १९४१ साली ‘डॉन’ हे साप्ताहिक दिल्लीत सुरू केलं. जीनांचा फाळणीकडे नेणारा सगळा विषारी, विखारी हिंदुत्वविरोध प्रकटला तो ‘डॉन’मधूनच. १९४४ साली ‘डॉन’ साप्ताहिकाचा दैनिक बनला आणि १९४७ साली फाळणीपूर्वीच दिल्लीहून कराचीला स्थलांतरित झाला.
पाकिस्तानात वृत्तपत्र स्वातंत्र्य आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य यांना काय किंमत दिली जाते, हे सगळ्या दुनियेला माहितेय. सौदी अरेबियन युवराज महंमन-बिन-सलमान आणि सौदी पत्रकार जमाल खाशोगी याचा रहस्यमय खून, या प्रकरणावरून सध्या जगभरच्या वृत्तपत्रांचे रकाने ओसंडून वाहतायत. पण, त्याबद्दल नूरानी यांनी कुठे चिंता व्यक्त केलेली नाही. कारण हा विषय मुसलमानांशी संबंधित आहे ना!
ज्या तुर्कस्तानमध्ये खाशोगी नाहीसा झाला, तो तुर्कस्तान खरं म्हणजे इस्लामी देशांमधला एकमेव निधर्मी देश. केमाल पाशा उर्फ कमाल अतातुर्क याने मोठ्या हिमतीने तुर्कस्तानला इस्लामच्या कचाट्यातून बाहेर काढून आधुनिक निधर्मी देश बनवला, अशी त्याची मोठी परंपरा. त्या देशाचे सध्याचे अध्यक्ष रसीप तय्यीप एर्दोजान हे पुन्हा देशाला कट्टर इस्लामी बनवण्याच्या मागे लागलेत आणि ते करताना राजकीय विरोधकांसह लेखक, पत्रकार यांनाही चेपून टाकतायत, याबद्दल नूरानींना चिंता वाटत नाही. त्यांना चिंता पडलीय भारताची. ग्रंथावर बंदी घालणं हे ग्रंथ जाळून टाकण्यासारखंच आहे, हिटलरशाहीची आठवण करून देणारं आहे, असं ते म्हणतात. नूरानींची निधर्मी चिंता एकदम उफाळून येण्याची दोन तात्कालिक कारणं म्हणजे ‘दि ब्रिटिश राज’ आणि ‘औरंगजेब : दि मॅन अ‍ॅण्ड दि मिथ’ नावाची दोन पुस्तकं. सॅम्युअल मार्टिन बर्क हा इंग्रज आय.सी.एस. अधिकारी फाळणीनंतर पाकिस्तानातच राहिला. त्याने पाक नागरिकत्व तर घेतलंच, पण पाकिस्तानी परराष्ट्र खात्यात त्याने बरीच मोठी कामगिरी केली. अनेक पुस्तकं लिहिली. पाक राष्ट्राध्यक्ष अयुब खान यांच्या काळात त्याला ‘सितारा-ए-पाकिस्तान’ असा किताब मिळाला. २०१० साली तो १०४ वर्षांचा होऊन मरण पावला. त्याने आणि सलीम अल्दिन कुरेशी नावाच्या ब्रिटिश लायब्ररीतल्या विद्वानाने मिळून लिहिलेले ‘दि ब्रिटिश राज’ नावाचं पुस्तक आता प्रसिद्ध झालं आहे. या पुस्तकावर भारत सरकारने बंदी घातली आहे. बंदीचं कारण देताना सरकारी अधिकारी म्हणाले की, ‘‘यात सरदार पटेलांविषयी अनुचित मजकूर आहे.’’
दुसरा किस्सा तर आणखी रंजक आहे. ऑड्रे ट्रुइक नावाची कुणी एक महिला अमेरिकेत न्यूजर्सीच्या रुटगर स्टेट युनिव्हर्सिटीत इतिहासाची प्राध्यापिका आहे. ‘साऊथ एशियन स्टडीज’ हा तिचा विभाग आहे. झटपट पैसा आणि झटपट प्रसिद्धी हवी असेल तर भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना भरवायचा, हे जसं जगभरच्या धंदेवाईकांना कळलं होतं; तसंच विद्यापीठ क्षेत्राचंही आता झालं आहे. झटपट नावलौकिक, प्रतिष्ठा, कीर्ती, पैसा हवा असेल तर एखादा मुसलमान बादशहा, मुसलमान पंथ, बादशाही यांच्यावर एकदम विद्वत्ताप्रचुर भाषेत, खूप अभ्यास वगैरे करून लिहिलंय असा आभास निर्माण करणारं एखादं पुस्तक लिहायचं. त्यात मुसलमानांची तरफदारी करायची नि हिंदूंची नालस्ती करायची. हे उघड-उघड नाही करायचं बरं का! तशा रोखाने लिहायचं. म्हणजे पाहा, अलाउद्दिन खिलजी हा फार पराक्रमी आणि न्यायीसुद्धा होता बरं का! पण, कधीकधी त्याला हिंदूंवर जुलूम करावे लागले. काय करणार? शेवटी तो माणूसच होता. राणा रतनसिंह रावळने एवढी सुंदर बायको स्वत: करण्याऐवजी अल्लाउद्दिनलाच देऊन टाकायची. म्हणजे एवढा रक्तपात टळला नसता का?
असो. तर या ऑड्रे ट्रुइक नावाच्या महिलेने ‘औरंगजेब : दि मॅन अ‍ॅण्ड दि मिथ’ नावाचं पुस्तक लिहिलंय. त्याला बंदी नाही. पण, त्यावर भाषण करण्यासाठी ती भारतात आली. तिचे दोन कार्यक्रम हैदराबादमध्ये ठरले, पण दोन्ही रद्द करावे लागले. अखेर दिल्लीत तिचं भाषण झालं एकदाचं. तिच्या पुस्तकात आणि भाषणात जाणत्या मंडळींना काहीही नवीन आढळलं नाही. जुन्या दिल्लीवर अजूनही मुसलमानी राजवटीचा प्रभाव आहे. नव्या दिल्लीवर तो नाही. तिथे ऑड्रचं भाषण होऊ शकलं; पण हैदराबाद शहर, निजामाची राजधानी, जिथे आजही इस्लामचा मोठा प्रभाव आहे, तिथे बजरंग दलाच्या आक्षेपामुळे औरंगजेबावरील कार्यक्रम रद्द करावे लागले, हे नूरानींचं खरं दु:ख आहे.
त्यावरून मग त्यांना वेंडी डोनिगर या विद्वान महिलेची नि तिच्या ‘दि हिंदूज’ या ग्रंथावरच्या बंदीचीही आठवण येते. या ग्रंथावर झालेल्या चौफेर टीकेमुळे प्रकाशकांनी ते पुस्तकालयांमधून काढून घेतलं. याचं त्यांच्यातल्या वकिलाला जास्त दु:ख होतं. वेंडी डोनिगर ही अमेरिकन विदुषी भारतविद्यातज्ज्ञ म्हणजे इंडॉलॉजिस्ट आहे. पण, तिला स्वत:ला इतर खंडीभर पदव्या लावण्यापेक्षा नुसतं ‘संस्कृततज्ज्ञ’ म्हणवून घ्यायला आवडतं. १९७३ साली तिचा पहिला मोठा ग्रंथ प्रकाशित झाला. त्याचं नाव ‘शिव : अ‍ॅन एरॉटिक अ‍ॅसेटिक’ म्हणजे ‘शिव : एक कामुक बैरागी.’ खेरीज हिंदू पुराणांमधील दुष्ट व्यक्ती, पशू वगैरे तिचे बरेच ग्रंथ आहेत. एखाद्या भव्य राजवाड्यात सुशोभित दालनंही असतात, देवघरही असतं आणि संडासही असतो. आपण कुठे रमायचं ते आपल्यावर असतं. वेंडी डोनिगर कोणत्या अभ्यासात रमलीय ते आपल्याला तिच्या विषयांवरून कळलंच असेल. तिच्या ग्रंथाची हकालपट्टी झाल्यामुळे तिच्याहीपेक्षा कदाचित जास्त दु:ख नूरानींना झालंय. आपण अशा विद्वान, निधर्मी वकिलांना ओळखून असावं आणि त्यांच्या मायावी ‘प्लूरलिस्टिक’ राजकारणालाही ओळखून असावं. •••

Posted by : | on : 18 Nov 2018
Filed under : आसमंत, पुरवणी.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी (257 of 926 articles)

India Nation
भारत भाग्य विधाता : प्रशांत आर्वे | राष्ट्र आणि राष्ट्रवाद या विषयावर सर्वाधिक तर्कपूर्ण मांडणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली ...

×