ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, यमाजी मालकर, स्तंभलेखक » आपले प्रश्‍न वेगळे, मग उत्तरे वेगळी का नाहीत?

आपले प्रश्‍न वेगळे, मग उत्तरे वेगळी का नाहीत?

॥ अर्थपूर्ण : यमाजी मालकर |

आपले आणि जपानसारख्या किंवा पाश्‍चिमात्य देशांचे प्रश्‍न वेगळे आहेत. पण आपण त्यांचे अनुकरण करून नवी संकटे ओढवून घेत आहोत. आपले प्रश्‍न आपल्याच पद्धतीने सोडविण्याचा विचार आता केला पाहिजे. तसा तो केला की- आठ ऐवजी सहा तासांच्या दोन शिफ्टमध्ये देश चालविण्याच्या अर्थक्रांतीच्या प्रस्तावाचे महत्व कळण्यास वेळ लागत नाही.

Jobs Shifts

Jobs Shifts

तब्बल ५५ वर्षांपूर्वी बुलेट ट्रेनची देण जगाला देणारा जपान देश कायम चर्चेत राहिला आहे, तो त्याने केलेल्या अनेक अत्याधुनिक संशोधनासाठी आणि तेथील कामाच्या संस्कृतीसाठी! जपान ही जगातील आज तिसर्‍या क्रमांकाची अर्थसत्ता आहे, पण तिला आज वेगळ्याच समस्यांनी घेरले आहे. आत्महत्या करणार्‍यांचे प्रमाण त्या देशात अधिक आहे आणि जन्मदर कमी असल्याने जपानची लोकसंख्याही कमी होते आहे, हे जगजाहीर आहे. पण साडेबारा कोटी म्हणजे महाराष्ट्राएवढी लोकसंख्या असलेला हा देश अलीकडे एका वेगळ्या कारणाने चर्चेत असून त्यामुळे जपान कधी नव्हे, इतका बदलून जाणार आहे. जपानमध्ये उद्भवलेली ही समस्या, गेल्या दोन तीन दशकांत आकार घेत होती. ती समस्या आहे, ज्येष्ठ नागरिकांची सेवासुश्रुषा आणि देशातील शरीरकष्टाची कामे करण्यासाठी माणसे उपलब्ध नसण्याची! या कामांसाठी इतर देशांतून मनुष्यबळ आणण्यावर जपानने प्रथमच शिक्कामोर्तब केले आहे. चारही बाजूने समुद्र असलेल्या जपानमध्ये आतापर्यंत कधीच बाहेरच्यांना असा थेट प्रवेश मिळू शकलेला नाही. त्यामुळे जपानी समाज हा अतिशय संरक्षित आणि एकजिनसी राहिला आहे. जगामध्ये गेल्या चार-पाच दशकांत स्थलांतर वाढले असून जपान मात्र त्यापासून दूर राहिला होता.
केवळ जपानच नव्हे, तर युरोपातील अनेक देशांत जन्मदर कमी होत असल्याने आणि मुळातच कमी लोकसंख्या असल्याने तेथील अर्थव्यवहारांवर विपरित परिणाम होत आहेत. अशा सर्व देशांत यांत्रिकीकरणामुळे शेतीसह सर्वच उत्पादने वाढली आहेत, पण त्याला पुरेसा ग्राहक नसल्याने ते मंदीचा अनुभव घेत आहेत. लोकसंख्या वाढत नसल्याने ही मंदी वर्षानुवर्षे हटत नाही, हे सिद्ध करण्यासाठी कोणा तज्ज्ञाची गरज राहिलेली नाही. जपानमध्ये २५ टक्के नागरिक हे वृद्ध आहेत. शिवाय जपानमध्ये वयोमान कितीतरी अधिक म्हणजे सरासरी ८० इतके आहे. त्यामुळेच सर्वाधिक शतायुषी नागरिक जपानमध्येच आहेत. पण त्यामुळेच शेती, बांधकाम, रुग्णालयातील सेवा अशा थेट कामांना मनुष्यबळ मिळू शकत नाही. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी जपानने अनेक प्रयोग करून पाहिले. काही कामे रोबोटच्या मदतीने करून घेणे, वाहने चालकाविना चालविणे, शेतीतील अधिकाधिक कामे यंत्रांनी करणे, वृद्धांशी खेळण्यासाठी यंत्रे तयार करणे अशा प्रयत्नांचा त्यात समावेश आहे. पण सर्वच ठिकाणी माणसाची जागा यंत्रे किंवा रोबोट घेऊ शकत नाहीत, हे त्यांच्या लक्षात आले. शिवाय देशात ग्राहक वाढले नाहीतर अर्थव्यवस्थेला ओहोटी लागेल, अशी भीती निर्माण झाल्याने शेवटचा पर्याय म्हणून बाहेरच्या देशातील माणसांना देशात या कामांसाठी प्रवेश देण्याविषयी त्या समाजात एकमत होऊ लागले आहे. जपानी समाज हा अतिशय स्वच्छता आणि शांतताप्रिय मानला जातो. मोठ्याने बोलणे, हा जणू गुन्हा आहे, असा अनुभव जपानमध्ये येतो, असे सांगितले जाते. शिवाय सर्व संस्कृती एकच असल्याने समाज अतिशय एकजिनसी राहिला आहे. हा जो एकोपा आहे, त्याचे या नव्या बदलात काय होणार, याची चिंता जपानी समाज आता करतो आहे. त्यामुळे बाहेरच्या माणसांना देशात न घेताच आपले प्रश्‍न आपले सोडविले पाहिजे, असाही एक मतप्रवाह जपानमध्ये आहे. पण परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने सरकारने बाहेरचे मनुष्यबळ देशात घेण्याच्या कायद्याला मंजुरी दिली आहे. थोडक्यात, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि युरोपातील अनेक देशांनी पूर्वीच इतर देशांतील मनुष्यबळाचे स्वागत केले आहे, तसे आता करण्याची वेळ जपानवर आली आहे. त्यामुळे जगात नागरिकांची जी सरमिसळ होते आहे, तिला आता चांगलाच वेग येणार आहे. अशा मनुष्यबळाला घेताना त्याला जपानी भाषेचे ज्ञान असले पाहिजे, त्याची पार्श्‍वभूमी गुन्हेगाराची असता कामा नये, तो कट्टरपंथीय असू नये आणि त्याला विशिष्ट प्रशिक्षण दिले पाहिजे, अशा काही अटी जपान सरकार घालणार आहे. मात्र ही गरज वाढत असल्याने हे निकष सैल करण्याची वेळ जपानवर भविष्यात येऊ शकते.
अशा या पार्श्‍वभूमीवर आपण भारताच्या प्रचंड लोकसंख्येकडे पाहिले पाहिजे. भारतात लोकसंख्येचे नियंत्रण केले पाहिजे, हे म्हणणे शंभर टक्के बरोबर असले, तरी आता ज्यांचा जन्म झाला आहे, त्याला सन्मानाचे जीवन देणे, हे देश म्हणून आपले कर्तव्य आहे. जगात ज्या तीव्रतेची मंदी येते, त्याप्रकारची मंदी भारतात कधीच येत नाही, त्याचे कारण ही प्रचंड लोकसंख्या आहे आणि शरीरकष्टाची कामे इतक्या कमी दामात त्यामुळेच करून घेतली जातात, हे लक्षात घेतले पाहिजे. जगाच्या तुलनेत कमी वेतनावर भारतीय कामे करण्यास तयार आहेत आणि त्यामुळेच अनेक उद्योग भारताला प्राधान्य देतात. अर्थात, मध्यमवर्गात सतत वाढ होत असल्याने भारतातील जन्मदरही कमी होतो आहे. शिवाय जन्मदर आटोक्यात येण्याआधीच ज्यांचा जन्म झाला, ते सर्व आता तरुण असून त्यांच्यामुळे जगातील सर्वाधिक तरुण देश म्हणून आपल्या देशाला महत्त्व आले आहे. त्याचे कारण अर्थशास्त्रातील मागणी आणि पुरवठ्याचा त्याच्याशी संबंध आहे. मागणी पुरवठ्याचे हे गणित चांगले राहण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक असतो, तो म्हणजे तरुण वर्किंग लोकसंख्या! पुढील दोन दशके भारतात ती मुबलक असणार आहे. अशा या स्थितीत १३५ कोटी लोकसंख्या असलेल्या भारताची अर्थव्यवस्था वेगाने धावली पाहिजे. जगात आर्थिक विकासाचा दर मोजण्याचे जो जीडीपी नावाचा अतिशय फसवा निकष आहे, त्याचाच विचार केला तर भारताचा आर्थिक विकासदर जगात सर्वाधिक म्हणजे सात टक्क्यांपेक्षा अधिक आहे, पण तो भारतासाठी पुरेसा ठरत नाही. कारण भारताने या शर्यतीत भागच तुलनेने उशिरा घेतलेला आहे. त्याचे दुसरे आणि अधिक महत्त्वाचे कारण आहे, ते भारतात पुरेसे ग्राहक तयार होत नाहीत. आज ३० कोटी नागरिक हे प्राथमिक गरजांतच अडकले आहेत. त्यामुळे त्यांच्या गरजा तर खूप आहेत, पण त्या भागविण्यासाठीची क्रयशक्ती त्यांच्याकडे नाही. ज्यांच्याकडे ती आहे, त्यांना आता फार काही विकत घ्यायचे नाही, अशी युरोपीय देशांसारखी परिस्थिती काही प्रमाणात आपल्या देशातही झालीच आहे.
भारतीयांची क्रयशक्ती वाढावी, यासाठी संघटीत रोजगार वाढावा लागेल. शरीरकष्टाची कामे करणार्‍याला चांगले मोल मिळेल आणि शेतीच्या उत्पादनातून चांगला पैसा मिळावा, अशी व्यवस्था निर्माण करावी लागेल. अशी व्यवस्था ही कामे संघटीत क्षेत्रात येवूनच निर्माण होऊ शकते. आपल्या देशात संघटीत क्षेत्रात रोजगारनिर्मिती झाली पाहिजे, ही त्यासाठी! आज संघटीत क्षेत्रात असणार्‍यांची संख्या कशीबशी सुमारे तीन कोटींच्या घरांत असेल. ती वाढायची असेल तर आपल्या प्रचंड लोकसंख्येचा बोनस घेणे. याचा अर्थ सेवाक्षेत्राचा विकास घडवून आणणे आणि अर्थक्रांतीच्या प्रस्तावानुसार कामाचे तास कमी करून आठऐवजी सहा तासांच्या दोन शिफ्टमध्ये देश चालविणे. सध्या काय होते आहे पहा- काम करणार्‍यांना पुरेसा मोबदला मिळत नसल्याने त्याची क्रयशक्ती वाढत नाही आणि ज्याचे उत्पन्न जास्त आहे, त्याला ते खर्च करण्यासाठी वेळ नाही. त्यामुळे एकीकडे सेवा क्षेत्राचा विस्तार होतो आहे तर दुसरीकडे यांत्रिकीकरणामुळे सर्वच उत्पादने वाढली आहेत. पण त्यांना मागणी नाही. गरजा आहेत, पण त्या पूर्ण करण्याची क्रयशक्ती नाही, यात भारत अडकला आहे. शिवाय सरकारी कार्यालये, पोलिस, न्यायालये, बँका आणि अशा कितीतरी सेवा एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पुरत नाहीत. विशिष्ट वेळेत शहरांत वाहणारे माणसांचे लोंढे, त्यामुळे अपुर्‍या पडणार्‍या सार्वजनिक सेवासुविधा, प्रत्येक सेवेसाठी लावाव्या लागणार्‍या रांगा, प्रचंड खर्च करून वापराविना पडून राहणार्‍या मोठ्या इमारती, सर्वांना सारख्याच सुट्या दिल्या जात असल्याने हॉटेलांसारख्या सेवांवर येणारा ताण असे जे अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत, ते प्रश्‍न सहा तासांच्या दोन शिफ्टमुळे सुटतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे क्रयशक्ती असलेला वर्ग किमान दुप्पट होईल आणि भारताची अर्थव्यवस्था वेगाने धावू लागेल.
तात्पर्य, आपले आणि जपानसारख्या किंवा पाश्‍चिमात्य देशांचे प्रश्‍न वेगळे आहेत. पण आपण त्यांचे अनुकरण करून नवी संकटे ओढवून घेत आहोत. आपले प्रश्‍न आपल्याच पद्धतीने सोडविण्याचा विचार आता केला पाहिजे. तसा तो केला की आठ ऐवजी सहा तासांच्या दोन शिफ्टमध्ये देश चालविण्याच्या अर्थक्रांतीच्या प्रस्तावाचे महत्त्व कळण्यास वेळ लागत नाही.

Posted by : | on : 13 Jan 2019
Filed under : आसमंत, पुरवणी, यमाजी मालकर, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, यमाजी मालकर, स्तंभलेखक (177 of 1299 articles)

Indian Army1
राष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन | या पुढे येणार्‍या प्रत्येक सरकारी अधिकारी आणि कर्मचार्‍याला सैन्यात ५ वर्षे अनिवार्यपणे काम करावे ...

×