ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, मयुरेश डंके, स्तंभलेखक » आवडती-नावडतीची गोष्ट !

आवडती-नावडतीची गोष्ट !

॥ मानसरंग : मयुरेश डंके |

आपलं दुर्दैव हेच आहे की, एका बाजूला आपण शैक्षणिकदृष्ट्‌या अत्यंत सक्षम असाही तरूण निर्माण करू शकत नाही आहोत आणि दुसर्‍या बाजूला भावनिकदृष्ट्‌या अत्यंत संतुलित, परिपक्व, विवेकी असाही तरूण निर्माण करू शकत नाही आहोत. दोन्ही पातळ्यांवर आपल्याला सपशेल अपयशच आलं आहे. समाजाची भूमिका बदलणं ही फार मोठी आणि सावकाश घडणारी प्रक्रिया आहे. जितक्या लवकर ती सुरू करू तितक्या लवकर आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू. नाहीतर पुढची पिढी आपल्याला विचारणारच आहे की, नावडत्या राणीशी राजानं लग्नच का केलं?

What's The Real Reason You Hate

What’s The Real Reason You Hate

अगदी लहानपणापासून आपल्याला अनेक छोट्या छोट्या काल्पनिक गोष्टी सांगितल्या जातात. त्यातल्या बहुतांश गोष्टींची एक टिपिकल सुरूवात म्हणजे, एक असतो राजा. त्याला दोन राण्या असतात, एक आवडती अन् दुसरी नावडती… गोष्ट इथूनच सुरू होते आणि आपण ती विश्वासानं ऐकतोदेखील. त्या मूलभूत गोष्टीविषयी अगदी लहान वयातच प्रश्न पडला असं माझ्या आयुष्यात तरी घडलं नाही.
अशीच एक गोष्ट मी माझ्या भाचीला सांगत होतो. गोष्ट सांगून पूर्ण झाली अन् ती सात वर्षांची चिमुरडी मला म्हणाली, पण जर ती राजकन्या आवडत नव्हती तर राजानं त्या नावडत्या मुलीशी लग्नच का केलं?
पोरीनं एकाच प्रश्नात माझी विकेट काढली. मी आपला तिला समजावून सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होतो. ‘अगं, त्या काळी असं नव्हतं. तेव्हा राजाची अनेक लग्नं व्हायची. कदाचित एखाद्या राणीची एखादी गोष्ट त्याला आवडत नसेल, म्हणूनच ती नावडती असेल.’ मी वेळ मारून नेऊ म्हणून उत्तर दिलं. पण पुढचा प्रश्न आलाच. ‘एखादीच गोष्ट आवडत नसेल तर माणूस काय लगेच नावडता होतो का?’ आता यावर काय बोलणार? माझी बोलतीच बंद होण्याच्या मार्गावर..
ती पुढे म्हणाली, ‘मी रोज अभ्यास करत नसेन आणि आईला ते आवडत नसेल तर मग मी तिची नावडती मुलगी होईन का?’ तिचे हे तीन साधे, भाबडे प्रश्न मला निरूत्तर करून गेले.
आताची पिढी हुशारच आहे, स्मार्टच आहे वगैरे भाग सोडून द्यावा आणि खरोखरच तिनं विचारलेल्या प्रश्नाकडं आपण जरासं डोळसपणानं पहावं. जे सात वर्षांच्या मुलीला समजू शकतं ते आपल्याला समजू नये?
लग्नापूर्वी मी निदान वर्षभरतरी ह्याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये रहायला हवं होतं. हे इतकं वाया गेलेलं प्रकरण आहे, हे तेव्हाच कळलं असतं तर लग्नच नसतं केलं. एक मुलगी मला तिच्या नवर्‍याविषयी नेहमी असं सांगते. नवरा वाया गेलेलं प्रकरण आहे म्हणजे काय? तर तो रस्त्यावरच्या गाड्यावरच्या भाजलेल्या भुईमूगाच्या शेंगा घरात आणून खातो, लहान बाळासारखा अगदी मऊ वरणभात चमचा न वापरता हातानं खातो (वरणभात हातानं खाणारी माणसं वाया गेलेली असतात? या न्यायाने मी तर पार ओवाळूनच टाकलेला माणूस आहे.) स्वदेशी वस्तू वापरतो, काहीही आणायचं झालं तर कापडी पिशवी हातात घेऊन जातो (कापडी पिशवी हातात घेऊन जाणं किती लो प्रोफाईल वाटतं..) कुठंही जाताना शक्यतो चालत किंवा बसने फिरतो (इतका कसला कंजूषपणा?) कॅबच्या पैशांचाही हिशोब ठेवतो, टेबलावर सुटे पैसेसुद्धा मोजून ठेवतो, कुणाकडूनही कसलं गिफ्टच घेत नाही आणि मुख्य म्हणजे कधीही रजा काढत नाही. म्हणून तो म्हणजे ‘एक वाया गेलेलं प्रकरण’ आहे तिच्यालेखी!
पंधरा-वीस मुलं बघून, त्यांना नाकारून झाल्यावर ह्याच्याशी लग्न केलं. तेव्हा घरच्यांनी हिची पसंती पन्नासदा विचारून खुंटा बळकट केला होता. पण आता मात्र तिला त्याचं वागणंच आवडत नाहीय. मुलगी रोज गुगलवरून, यूट्यूबवरून घटस्फोटाविषयीची माहिती काढायला लागली, घरात त्याविषयीची पुस्तकं आली. पण घरच्यांना याची तिळमात्र कल्पना नव्हती. हे सगळं समजल्यावर त्यांना मोठा धक्का बसला. काही महिन्यांपूर्वीच अतिशय आवडलेला माणूस अचानकच अतिशय नावडता का व्हावा? आपल्याच माणसाच्या काही गोष्टी आपल्यालाच तितक्याशा पटत नसतीलही, पण म्हणून ती व्यक्तीच नाकारावी का? हे प्रश्न अनुत्तरितच राहतात.
पूर्वी तर मुलामुलींना लग्नापूर्वी एकमेकांशी बोलण्याचीही संधी मिळायची मारामार होती. कित्येकदा आपला नवरा किंवा आपली बायको नेमकी दिसते तरी कशी? हे सुद्धा नीट पाहण्याची संधी मिळत नसे. आता भेटणं होतं, बोलणं होतं, एकत्र फिरणं होतं, एसएमएस-फेसबुकवर चॅटिंग होतं, लग्नापूर्वी एकमेकांना वेळ देऊन समजून घेता यावं अशी सामाजिक परिस्थिती आता आहे. पण मग तरीही लग्नानंतर मला ह्याच्याविषयी / हिच्याविषयी हे माहितीच नव्हतं अशी अवस्था का व्हावी? लग्नानंतर एकमेकांविषयीचे धक्के का बसतात? माझ्या माहितीतली एक मुलगी तर तिचं लग्न ठरल्यापासून रोज तीन-चार तास तरी फोनवरच असायची. भेटी-गाठी, गिफ्ट्स, लॉन्ग ड्राईव्ह्ज वगैरे सगळं सुरू होतं. लाखभर रूपये खर्च करून प्री-वेडींग शूट झालं. फेसबुक, इन्स्टाग्राम वरून एकमेकांसोबतचे फोटो जगभर जाहीर करून झाले. लग्नानंतर तीन महिन्यांच्या आत मुलगी माहेरी परत ! लग्न ठरल्यापासून एकमेकांबरोबर सहा महिने फिरले आणि लग्नानंतर तीन महिनेसुद्धा एकमेकांसोबत राहता आलं नाही?
अनेक तरूण-तरूणी लिव्ह इन रिलेशनशिप चा पर्याय का स्वीकारतायत? त्यांना नातं का नको आहे? वैवाहिक नात्यात असतानाही त्यांना अन्य व्यक्तीशी तितक्याच जवळचं नातं जोडावंसं का वाटतं? मला आमच्या वैवाहिक नात्यातून कसलंही सुख-समाधान मिळत नाहीय असं ही जोडपी म्हणतात, तेव्हा सुखासमाधानाच्या त्यांच्या नेमक्या अपेक्षा तरी काय असतात?
पुन:पुन्हा गणित मांडून हजारदा सोडवून पाहिलं तरी उत्तर का चुकतंय? पुष्कळ प्रकरणांमध्ये असाच अनुभव येतो की, खरं गणित ‘२ + २ = ?’ असं असतं, पण दोघांनाही त्या गणिताचं उत्तर मात्र ‘५’ हवं असतं. आपल्या गणिताचं उत्तर ‘४’ आलंय आणि तेच बरोबर आहे, हे त्यांना का पटत नाही?
आपण आपल्या मुलामुलींना औपचारिक शिक्षण पुष्कळ देतो. पण स्वत:ला नेमकं काय हवंय आणि आपण इतरांना कसं ओळखावं, कसं जाणून घ्यावं अशा गोष्टींचं शिक्षण देतो का? शाळांचा सगळा भर अभ्यासक्रमावर, परीक्षांवर आणि निकालावर. माणूस घडवणं महत्त्वाचं की मार्कलिस्ट घडवणं महत्त्वाचं याचं वास्तविक उत्तर पालकांनीच दिलं पाहिजे आणि ते तात्विक उत्तर नको.
औपचारिकदृष्ट्‌या निरक्षर माणसांचे संसार होतात आणि सुशिक्षितांचे मात्र टिकत नाहीत, याला काय म्हणावं? ‘आता लग्न करायचंय’ अशा वयात आलेल्या मुला-मुलींना मी भेटतो,बोलतो. तेव्हा लक्षात येतं की शंभरातल्या किमान ७५ जणांच्या त्यांच्या जोडीदारांविषयीच्या एकतर अपेक्षाच ठरलेल्या नाहीत आणि त्यांच्या ठरल्यात त्या अवास्तव !
अपेक्षांच्या रकान्यात समंजस,मनमिळावू वगैरे शब्द लिहीताना आपल्यात हे गुण आहेत का, याचा विचार मुलांनी करायला हवा. आणि पाच आकडी पगार, स्वत:चं घर, सेटल असावा वगैरे लिहिताना मुलींनीही वास्तव विचार करायला हवा. लग्नापूर्वी आपण केवळ सुसंगत गोष्टीच पाहतो आणि विसंगतींकडे मात्र ‘त्यात काय एवढं?’ असं म्हणून दुर्लक्ष करतो. पण लग्नानंतर त्याच गोष्टी नेमक्या खुपायला लागतात आणि मग आपले सूर जुळत नाहीयत असं लक्षात येतं.
‘आता ह्याच्या / हिच्या लग्नाचं बघायला हवं’ असा विचार मुलांमुलींच्या बाबतीत पालक कधी करतात? वयाची पंचविशी आलीय, शिक्षण पूर्ण झालंय, नोकरी लागली आहे, आता लग्न करायला हरकत नाही, असं पालकांना वाटतं. पण लग्न जुळवताना ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात,त्या गोष्टी लग्न टिकवण्याकरिता मात्र पुरेशा नसतात, असं दिसतं. आणि नाती कमकुवत होतात, ती तिथंच. भावनिकदृष्ट्‌या नाती जपण्याची क्षमता उत्तम तयार झाली आहे, आता लग्नाचं बघायला हरकत नाही, असा विचार किती जण करतात? वैवाहिक समस्या निर्माण होणं आणि दिवसेंदिवस त्या कमी न होता उलट वाढतच जाणं, याचं कारण हेच तर नसेल?
‘माझ्या नवर्‍यानं त्याच्या आईवडीलांशी फार बोलता कामा नये आणि त्यांना दरमहा पैसे पाठवलेले मला चालणार नाही’ असं म्हणून एक मुलगी नवर्‍याला सोडून माहेरी येऊन राहिली आहे. आता एक वर्ष होत आलं पण नवर्‍याशी साधं बोलायलासुद्धा ती तयार नाही. तिच्या आईवडीलांचं मत काय, तर ‘मुलानं तरी स्वत:च्या आईवडीलांचं इतकं करण्याचं कारणच काय?’ यांच्या स्वत:च्या मुलाच्या बाबतीत मात्र गेली सहा वर्षं ते मुली पाहतायत, पण अजून लग्न जुळत नाहीय. कारण एकच… मुलानं मुलगी पसंत करायची नाही, ती आईवडीलांनी आधी पसंत करायची. आता त्यांना एकही मुलगी सून म्हणून पसंत पडेना अन् याचं लग्न काही केल्या जमेना !
आमचं जमत नाहीय असा प्रश्न घेऊन आलेल्या बहुतांश मुलांमुलींचा एक मोठा प्रश्न असतो, तो म्हणजे ‘जुळवून कोण घेणार?’ कारण तडजोड करणं म्हणजे शरण जाणं, पराभव पत्करणं, स्वत:ची किंमत कमी करून घेणं असे अर्थ यांनी लावलेले असतात. त्यामुळे, तडजोड करणं हे नाकर्तेपणाचं, स्वाभिमान गमावल्याचं लक्षण आहे, ती आयुष्यातली हार आहे, असंच यांनी पक्कं मानलेलं असतं.
‘मला मोकळा भात लागतो आणि याला मऊ भात लागतो. आमचं जमेल असं वाटत नाही.’ हा तक्रारीचा मुद्दा असू शकतो का? हे प्रकरण घटस्फोटापर्यंत आलं आहे. दोघेही उच्चशिक्षित, गलेलठ्ठ पगार. पण दोघांनाही उत्तरापर्यंत पोचताच येत नाहीय. घरात पाच-सहा कुकर आहेत, मायक्रोवेव्ह आहे, झालंच तर पाच बर्नर्सची शेगडीसुद्धा आहे. पण आपण वाद न घालता, सरळ दोन वेगळे कुकर लावावेत आणि वाद संपवून टाकावा, हे उच्चशिक्षित स्त्रीला समजू नये, हे मन आणि बुद्धी दोन्हीलाही पटत नाही. अशानं प्रश्न चिघळेल नाही तर काय होईल?
पूर्वीइतकी बंधनं आता राहिली नाहीत, लग्नाचे निर्णय पूर्वीसारखे लादले जाण्याचं प्रमाणही कमी झालं आहे, शिक्षण पूर्ण करून मग लग्न करावं हा विचारही समाजात रूजला आहे. पण मग तरीही विसंवाद वाढलेत, तडजोडीची किंवा सांभाळून घेण्याची भावना क्षीण झाली आहे, आत्ता पेरलं की आत्ताच उगवलं पाहिजे असा हट्ट वाढतो आहे, आपल्या इच्छेविरूद्ध काहीच खपवून घेण्यास कुणीच तयार नाही.. हे प्रश्न का निर्माण होत आहेत?
अगदी लहानपणापासूनच आपण आपल्या मुलामुलींना काय शिकवायला हवं, हे आताच्या तरूण पिढीकडे पाहून शिकायला हवं. त्यांना स्वत:लाच ओळखायला शिकवायला हवं, जगाकडे सहृदयतेनं पहायला शिकवायला हवं, पैशापेक्षा माणूस मोठा नसतो हे शिकवायला हवं. आपलं दुर्दैव हेच आहे की, एका बाजूला आपण शैक्षणिकदृष्ट्‌या अत्यंत सक्षम असाही तरूण निर्माण करू शकत नाही आहोत आणि दुसर्‍या बाजूला भावनिकदृष्ट्‌या अत्यंत संतुलित, परिपक्व, विवेकी असाही तरूण निर्माण करू शकत नाही आहोत. दोन्ही पातळ्यांवर आपल्याला सपशेल अपयशच आलं आहे. समाजाची भूमिका बदलणं ही फार मोठी आणि सावकाश घडणारी प्रक्रिया आहे. जितक्या लवकर ती सुरू करू तितक्या लवकर आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू. नाहीतर पुढची पिढी आपल्याला विचारणारच आहे की, नावडत्या राणीशी राजानं लग्नच का केलं?
आणि ह्या प्रश्नाचं योग्य आणि खरं उत्तर आजही आपल्याकडं नाही…!
विवाहपूर्व समुपदेशनाची गरज आहे ती यासाठीच !!!
– मानसतज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे

Posted by : | on : 25 Nov 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, मयुरेश डंके, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, मयुरेश डंके, स्तंभलेखक (384 of 1372 articles)

Pu La Deshpande1
विशेष : ज्योती ठाकूर | भाईकाका असे हसरे होते म्हणूनच आजची पिढीही त्यांना जाणून घेऊ इच्छिते. त्यांच्या साहित्याचा आनंद घेऊ ...

×