ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, मयुरेश डंके, स्तंभलेखक » इस महफ़िल में किस्मत आज़मा कर देखी है मैनें

इस महफ़िल में किस्मत आज़मा कर देखी है मैनें

॥ मानसरंग : मयुरेश डंके |

Musicalsign

Musicalsign

मला यातच करिअर करायचंय असं स्वत:शीच म्हणणं आणि आपलं म्हणणं इतरांना पटवून देणं यांत फार फरक असतो. तिथं आपल्याच इच्छाशक्तीचा प्रश्‍न असतो. आपला जोर कमी पडला की आटोपलाच डाव ! त्यातही ते क्षेत्र जगावेगळं असेल आणि आडवळणाचं असेल तर खेळ आणखी कठीण होतो. ‘अख्खं घरदार एका टोकाला आणि आपण एकटेच एका टोकाला’ अशी अवस्था होते. अशा प्रसंगात आपला निर्धार टिकला तर ठीक, पण हजारातल्या एखाद्याचंच ते वज्रबळ असतं, बाकीचे नऊशे नव्याण्णव जण ढेपाळतातच..
घरच्यांचा होकार मिळाला नाही तर आपल्या शिक्षणाचा खर्च कोण करणार? हा प्रश्‍न असतोच. आपल्या निश्‍चयाच्या नाड्यांची रसद घरच्यांनी तोडली तर पुढचं सगळं कसं होणार? या मुद्द्यापाशीच सगळं खोळंबतं. अशावेळी दोनच पर्याय असतात. एक म्हणजे घरच्यांना तुमचं म्हणणं नीट पटवून द्या, दुसरा पर्याय म्हणजे स्वत:वरच विश्‍वास ठेवा आणि स्वत:च्या ध्येयाच्या दिशेनं चालायला सुरूवात करा.. कशाचीही पर्वा न करता.. सर्वसाधारणपणे हे प्रश्‍न दहावी-बारावीच्या दरम्यान घरांमध्ये उभे राहतात. पण या मुलाच्या घरी मात्र हा प्रश्‍न उभा राहिला, तेव्हा त्याचं वय होतं अवघं नऊ वर्षं…!
आपल्याला आपल्या आयुष्यात नक्की काय करायचंय याची जाणीव काहींना खूप उशीरा होते तर अनेकांना ती जन्मभर होत नाही. मी कोण आहे, माझं ध्येय काय, त्यासाठीचा मार्ग कोणता, माझी ओळख काय असावी, या प्रश्‍नांची उत्तरं माणसं शोधण्याचा प्रयत्न करायला लागतात त्याला मॅस्लो नावाच्या अभ्यासकानं ‘आत्मवास्तविकीकरण’ असं म्हटलं आहे. पण वयाच्या नवव्या वर्षीच एखाद्याला त्याच्या जीवितध्येयाची जाणीव व्हावी, ही खरोखरच असामान्य गोष्ट म्हणावी लागेल.
हा मुलगा मूळचा लखनऊचा. घरची परिस्थिती सामान्य मध्यमवर्गीय. सरळ साधी नोकरदार माणसं असलेलं कुटुंब. दिवसभर नोकरी करावी, दर महिन्याला पगार घरी आणावा आणि त्या कमाईवर कुटुंब चालवावं हा शिरस्ता. मुलानं मोठं व्हावं असं कोणत्या आईवडीलांना वाटत नाही? पण सुखाचा जीव जोखमीत टाकायचा हेही पटत नसतं. महत्वाकांक्षा असणार्‍या मध्यमवर्गीय मुलांची आजही पंचाईत होते त्याचं कारण हेच असतं. ‘घी देखा लेकिन बडगा नहीं देखा’ अशी एक म्हण आहे. कदाचित या मुलाला त्याचे वडील हेच कानीकपाळी ओरडून सांगत असावेत. पण पोरगं काही ऐकायला तयार नव्हतं. त्याचं मन फक्त एकाच गोष्टीत गुंतलं होतं, ती गोष्ट होती ‘संगीत..!’
संगीत शिकण्यालाच घरच्यांचा ठाम विरोध. गाणं-बजावणं वगैरे घरी पटायचंच नाही. पण तरीही यानं गाणं शिकायला सुरूवात केली. घरात रोज उठतां-बसता वादाचा विषय एकच – या पोराचं संगीत ! वडील आणि मुलगा दोघेही कणभरही मागं फिरायला तयार नाहीत.वडीलांनी निर्वाणीची भूमिका घेतली, तुला घर किंवा संगीत यापैकी एकाच गोष्टीची निवड करावी लागेल. पण तरीही यानं गाणं शिकणं सुरूच ठेवलं. वडीलांच्या अपरोक्ष लपून-छपून संगीतशिक्षण सुरू राहिलं, ते आजीच्या प्रेमामुळं..
ह्या मुलाला अगदी लहानपणीपासूनच संगीताचं इतकं वेड होतं की,तो रोज संगीतवाद्यांच्या दुकानासमोर जाऊन तिथली वाद्यं पाहत उभा राहायचा. बरेच दिवस हा प्रकार सुरू होता. ती गोष्ट दुकानमालकाच्या लक्षात आली. रोज सकाळी दुकान उघडल्यावर सगळ्या वाद्यांची काळजीपूर्वक साफसफाई करशील का? असं मालकानं विचारताक्षणीच ह्या पोरानं होकार दिला. जी वाद्यं दुरूनच पाहावी लागत होती, त्यांना आता स्वच्छतेच्या निमित्तानं हात लावता येऊ लागला. एके दिवशी सकाळी दुकान उघडणार्‍या नोकरानं त्याला विचारलं, ‘तू साफसफाई करेपर्यंत मी जरा चहा घेऊन येतो.चालेल का?’ तेवढी संधी साधून ह्यानं एक एक वाद्य साफ करता करता वाजवायला सुरूवात केली. रोज नोकर चहा प्यायला जाई आणि हा मुलगा रोज एक नवं वाद्य वाजवून पाही. हे प्रकरण बरेच दिवस चाललं. एके दिवशी हार्मोनिअम वाजवत असताना दुकानमालक अचानकच नेहमीपेक्षा लवकर आले. आपलं बिंग फुटलं ह्या विचारानं हा मुलगा गर्भगळीत झाला. मालकांनी सुरूवातीला दरडावणीच्या सुरात विचारपूस करून सगळा प्रकार ऐकून घेतला आणि ह्याच्या जिद्दीवर खूष होऊन ती हार्मोनिअम त्याला भेट म्हणून दिली !!!
मॅट्रिक पास झाल्यावर एका ग्रुपसोबत काही संगीताचे कार्यक्रमांचे दौरे ह्यानं केले. पण दुर्दैवानं तो ग्रुपच फुटला. पण मग लखनऊला परत येण्याऐवजी ह्यानं रस्ता धरला तो मुंबईचा..! वयाच्या १६ व्या वर्षी हा मुलगा एकटाच मुंबईत आला. कुणाची ओळख ना पाळख. मुंबईत आलेल्या आश्रितांची हक्काची राहायची जागा म्हणजे फूटपाथ. दादरच्या ब्रॉडवे सिनेमासमोरच्या फूटपाथवरच हा मुलगा राहू लागला..! रोज ब्रॉडवे सिनेमाकडे पाहताना त्याला असं वाटायचं की कधीतरी आपल्या संगीताचा सिनेमा इथं लागेल..
या मुलानं फूटपाथवर राहणं स्वीकारलं, पण संगीत सोडलं नाही. सुरूवातीला हार्मोनिअम वादक म्हणून लहान-सहान कामं मिळवण्यातच काही वर्षं गेली. पाच वर्षं नशिबानं फार परीक्षा घेतली आणि वयाच्या एकविसाव्या वर्षीच संगीतकार म्हणून पहिला सिनेमा मिळाला.
१९४४ साली ह्याला एक मोठं काम मिळालं. काम इतकं उत्कृष्ट झालं की पुढची शंभर वर्षं लोक ती गाणी विसरू शकणार नाहीत. सिनेमा संगीतप्रधान होता, १२ गाणी होती. १७३ मिनिटांच्या सिनेमात ५० मिनिटांची तर गाणीच होती. पण एकामागून एक इतकी विघ्नं येत राहिली की सिनेमा रखडत गेला आणि प्रदर्शित व्हायलाच सोळा वर्षं लागली. १९६० साली प्रसिद्ध झालेल्या या सिनेमानं १६ कोटी रूपयांचा व्यवसाय केला, ज्यात संगीताचा वाटा सिंहाचा होता !
पण त्याआधीच १९५२ साली प्रसिद्ध झालेल्या एका सिनेमानं या तरूणाचं भाग्य उजळलं. उत्कृष्ट संगीतकाराचं फिल्मफेअर वॉर्ड मिळालं. गाणी तर अशी बहारदार झाली की आजही त्यांची जादू ओसरलेली नाही. रसिकांनी सिनेमा अक्षरश: डोक्यावर घेतला. ब्रॉडवे सिनेमातच या चित्रपटाचा प्रीमिअर शो झाला. सिनेमा पाहून बाहेर पडताना समोरचा फूटपाथ पाहून ह्या संगीतकाराच्या अश्रूंचा बांध फुटला आणि तोंडून उद्गार बाहेर पडले, समोरच्या फूटपाथपासून ते या फूटपाथपर्यंतचं अंतर पार करायला सतरा वर्षं लागली !
तो सिनेमा होता ‘बैजू बावरा’ आणि हा तरूण संगीतकार म्हणजे ‘नौशाद…!’
१९६० साली तो बहुप्रतिक्षित चित्रपट अखेर पडद्यावर आला.. मुघ़ल ऐ आज़म…! या चित्रपटानं नौशादना अफाट लोकप्रियता मिळवून दिली. भारतीय चित्रपटसृष्टीतील अत्यंत यशस्वी चित्रपटांमध्ये या चित्रपटाचं नाव आहे. एकूण ६४ वर्षांच्या कारकीर्दीत नौशाद साहेबांनी केवळ ६७ चित्रपट संगीतबद्ध केले. सुरैय्या, उमादेवी उर्फ टुणटुण अशा नवोदितांना संधी दिली ती नौशादसाहेबांनीच..! साऊंड मिक्सिंग चा प्रयोग हिंदी चित्रपटसृष्टीत करणारे नौशादसाहेब पहिलेच संगीतकार..!
खरोखर फूटपाथवर राहून करिअरची सुरूवात केलेल्या या संगीतकाराला दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मभूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, लता मंगेशकर सन्मान असे प्रतिष्ठेचे सन्मान मिळाले. ‘मदर इंडिया’ हा त्यांनीच संगीतबद्ध केलेला चित्रपट ऑस्कर करिता स्पर्धेत होता. इतरांच्या तुलनेत नौशाद साहेबांनी खूप कमी चित्रपट संगीतबद्ध केले परंतु त्यांच्या बहुतांश चित्रपटांनी सिल्व्हर ज्युबिली, गोल्डन ज्युबिली, डायमंड ज्युबिली साजरी केली.
‘कष्टांना, परिश्रमांना पर्याय नाही’ असं तोंडी म्हणणारे खूप असतात, पण प्रत्यक्षात जगणारे फार थोडे. कारण, कष्टांची परिभाषा व्यक्तीपरत्वे बदलते. एखाद्याला पॉश कारमधून सकाळी साडेसात वाजता कॉलेजला जाणं सुद्धा फार कष्टदायक वाटतं आणि दुसरा एखादा दहा-वीस किलोमीटर सायकल ताणत किंवा तंगडतोड करत त्याच लेक्चरला वेळेपूर्वी पोचतो तेही हसतमुखानं ! यांतच काय ते समजून घेण्यासारखं आहे. ‘आपण दिवसभर राबतो हे आपल्या नशिबाचे भोग आहेत’ अशी विचारसरणी असलेल्यांचा उत्कर्ष कसा होणार? आपल्याच ध्येयासाठी आपणच कष्ट करण्यात कसली आली आहे लाज अन् कमीपणा?
पाण्यामध्ये पडलास ना?
पाणी कसेही ते असो-
आता टळेना पोहणे;
त्याला तयारी पाहिजे
असं विंदा करंदीकरांनी म्हटलंय ते काही खोटं नाही. ‘बोलाचीच कढी अन् बोलाचाच भात’ असणार्‍यांना करिअरच्या गप्पा खूप मारता येतील, पण ‘नौशाद’ होता येणार नाही. ज्या क्षणाला आपण आपलं ध्येय ओळखून त्याच्याशीच पूर्ण प्रामाणिकपणा राखून वाटचाल करायला लागू, त्याक्षणी आपला यशाचा प्रवास सुरू होईल..!
नौशादसाहेबांनी तेच तर केलं ना…!
मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

Posted by : | on : 13 Jan 2019
Filed under : आसमंत, पुरवणी, मयुरेश डंके, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, मयुरेश डंके, स्तंभलेखक (161 of 1287 articles)

Brain Barrier
विज्ञान : ओंकार काळे | मेंदूला होणारे आजार अनेक वेळा व्यक्तीला दर्जेदार आयुष्य घालवण्यास अपात्र ठरवतात, कारण मेंदूवरच शरीराची हालचाल, ...

×