ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, भाऊ तोरसेकर, स्तंभलेखक » उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर |

ही जागरुकता राहुलना कळत नसेल तर त्यांच्या कारकिर्दीत काँग्रेसची नौका उथळ पाण्यात बुडण्याला पर्याय नाही. त्याच डगमगणार्‍या नौकेत राज बब्बर, अय्यर वा सिद्धू यासारखे प्रवासी भरलेले असले आणि ते थयथया नाचत असतील, तर अधिक लौकर डुंबणे हेच काँग्रेस नौकेचे भविष्य असायला पर्याय नाही. उपरोक्त काव्यपंक्तीमध्ये जो आशय शायराला कथन करायचा आहे, त्याचे इतके समर्पक उदाहरण दुसरे कुठले असू शकत नाही. काँग्रेसची नौका बुडते आहे, जिथे त्या पक्षाचा पाया ठिसूळ नव्हता. म्हणून हा शतायुषी पक्ष अचानक का बुडतोय, त्याचे कोडे भल्या भल्या अभ्यासक विश्‍लेषकांनाही उलगडत नाही. कदाचित त्यांना शायरी कळत नसावी. आपल्या मराठी भाषेत उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणतात, तशीच काँग्रेसची नौका आता अधिक हेलकावे खाते आहे.

Pakistan Politics Diplomacy

Pakistan Politics Diplomacy

हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहां दम था,
मेरी किश्ती थी डूबी वहां जहां पानी कम था।
कुठल्याशा शायरची ही कविता आहे. अनेकदा हिंदी चर्चांमध्ये तिचा उल्लेख येतो. पण अशा काव्यपंक्ती अनेकदा आशयघन वाटल्या तरी नेमक्या जुळणार्‍या असतात असे नाही. तो बहुधा कल्पनविलास असतो. म्हणूनच जेव्हा कुठल्याही काव्यपंक्ती नेमक्या तंतोतंत एखाद्या प्रसंगाशी जुळ्तात, तेव्हा थक्क होण्याची वेळ आपल्यावर येत असते. आपल्याला तो महान कवि वास्तवाचे भान असलेला वाटू लागतो. कालपरवा कर्तारपुर या पाकिस्तानातील गावच्या गुरूद्वाराला जाणारा भारताचा मार्ग पाकिस्तानने खुला करण्याचा प्रसंग होता, तेव्हा तिथे गेलेल्या नवज्योत सिद्धू यांचे वागणे व बोलणे यांनी या काव्यपंक्तीची यथार्थता पटवून दिली. नवज्योत सिद्धू हे शीखधर्मिय आहेत आणि त्या धर्माच्या कुठल्याही श्रद्धास्थानाला भेट देण्याचा त्यांचा अधिकार कोणी नाकारू शकत नाही. त्याच्याआड त्यांचे मंत्रीपद वा राजकारणाचे निर्बंधही येऊ शकत नाहीत. पण कुठेही गेल्यावर आपण काही व्यक्तीगत करीत आहोत व बोलत आहोत, अशा पळवाटा अधिकार पदस्थ व्यक्तीला काढता येत नाहीत, सिद्धू हे कोणी सामान्य भारतीय नागरिक नाहीत, तर पंजाब या भारतातील एका महत्वाच्या राज्याचे मंत्री आहेत. सहाजिकच ते जगात कुठेही गेले तरी तिथे कसे वागतात, काय बोलतात आणि कोणाला भेटतात, याचे राजकीय अर्थ काढले जाणे स्वाभाविक आहे. त्यामुळेच मंत्री झाल्यापासूनचे सिद्धू यांचे वागणे त्यांच्या पदाला व अधिकाराला शोभणारे आहे किंवा नाही, यावर चर्चा होणारच. अशी चर्चा होते, तेव्हा तिचे बरेवाईट परीणाम त्यांच्या राजकीय पक्षाला भोगावे लागणारच. सध्या सिद्धूंचे वागणे बोलणे बघितले, तर ते आधीच बुडीत असलेल्या काँग्रेस पक्षाला पुरती जलसमाधी देण्याच्या कामात गर्क झाल्यासारखे वाटतात. म्हणून अशा काव्यपंक्ती नेमक्या जुळलेल्या वाटतात. तो कवी म्हणतो, आमची नौका अशा जागी बुडाली जिथे पाणी कमी होते.
कुठलीही नौका ही तोल गेल्याने बुडते. पण बुडण्यासाठी निदान खोल भरपूर पाणी तरी असायला हवे. सहाजिकच नौका खोल पाण्यातून जात असताना सांभाळून प्रवास होत असतो. तोल खुप संभाळला जातो. धोका टाळण्यासाठी शक्यतो उथळ पाण्यातूनच नौकेचा प्रवास होत असतो. जिथे नाव उलटली तरी प्रवाश्यांना सहजगत्या वाचवता येईल, असा त्यामागचा हेतू असतो. पण डोके फिरलेला माणूस कमी पाण्यातही नौका बुडवून प्रवाश्यांना मरणाच्या दारात लोटून नेऊ शकतो. हा त्या काव्यपंक्तीचा आशय आहे. आपल्याला कोणी शत्रूने वा परक्याने लुटलेले नाही. परक्यांमध्ये तितकी कुवत कुठे होती? आपल्यांनीच आपला विनाश घडवून आणला असे सांगताना कवी म्हणतो, आमची नौकाही अशा जागी बुडाली, की जिथे पाणी कमी होते. याचा एकूण अर्थ असा, की अशक्य असलेला कपाळमोक्ष ओढवून आणणे होय. सध्या नवज्योत सिद्धू काँग्रेस पक्षासाठी नेमके तेच काम करीत आहेत आणि त्यांना मंत्रीमंडळात सामावून घेणारे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना त्याची पुर्ण जाणिव आहे. म्हणूनच सिद्धू यांच्या उपदव्यापावर भाजपाने वा अन्य विरोधकांनी हल्ला करण्यापुर्वीच मुख्यमंत्र्यांनी सिद्धूविषयी जाहीर नाराजी व्यक्त केलेली आहे. कारण पाकिस्तानात जाऊन या मंत्र्याने भारत सरकारच्या अधिकृत धोरणाला छेद देणारी वक्तव्ये केलेली आहेत. पाकिस्तानला भारताच्या विरोधात वापरता येतील अशा शब्दांची बरसात केली आहे. ह्यासाठी कायद्याच्या कक्षेत फार काही करणे शक्य नसले, तरी जनमानसात आपल्या पक्षाची प्रतिमा मलीन होते, याचे भान मुख्यमंत्र्यांना आहे. म्हणूनच अशा वागण्याला आपला पाठींबा नाही, याची ग्वाही त्यांनी तात्काळ देऊन टाकलेली आहे. मात्र तितकी सुबुद्धी अजून काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना झालेली नाही. अन्यथा कुठल्याही शहाण्या पक्षाध्यक्षाने एव्हाना सिद्धू यांना पक्षातून व मंत्रीपदावरून हाकलण्याची कारवाई केली असती.
भारत पाक यांच्यात साधे क्रिकेट खेळले जाऊ नये, इतक्या या देशाविषयी भारतीयांच्या भावना तीव्र आहेत. अशा वेळी सिद्धू वा अन्य काँग्रेस नेत्यांकडून व्यक्त केले जाणारे शेजारप्रेम धक्कादायक आहे. कारण अशा प्रत्येक वक्तव्य आणि भूमिकेतून काँग्रेस जनमानसातून उतरत चालली आहे. तीन वर्षापुर्वी काँग्रेसनेने मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तानात जाऊन भारतीय पंतप्रधानांना हटवण्यासाठी त्या देशाच्या राजकीय नेत्यांची मदत मागितली होती. दोन देशातील संबंध सुधारायचे असतील तर आधी मोदींना हटवण्यासाठी पाकिस्तानने काँग्रेसला मदत करावी, असे विधान अय्यर यांनी केलेले होते. आता भारतात लोकशाही पद्धतीने निवडणूकीतून सत्तेवर आलेल्या पंतप्रधान वा पक्षाला हटवण्यासाठी पाकिस्तान कोणती मदत करू शकतो? त्याचेही स्पष्टीकरण अय्यर यांनी द्यायला हवे होते आणि नसेल तर पक्षाने तरी त्यांच्याकडे त्यासाठी खुलासा मागायला हवा होता. पण त्यांना कोणी रोखले नाही, की जाब विचारला नाही. त्यामुळे अय्यर इतके सोकावले, की काश्मिरातील फुटीरवादी नेत्यांशी त्यांनी चुंबाचुंबी चालवली आणि त्यातून काँग्रेसविषयी जनमानसात असलेल्या शंका अधिकच वाढत गेल्या. त्याची किंमत अनेक विधानसभांच्या निवडणूकीत काँग्रेसला मोजावी लागलेली आहे. बुद्धीमंत वा उच्चभ्रू वर्गामध्ये काय तात्विक चर्चा होते, त्याला सामान्य माणसाच्या लेखी काडीमात्र किंमत नसते. भारताचे सैनिक व नागरिक पाकिस्तानी घातपात व जिहादमध्ये मारले जातात. इतके सामान्य लोकांना ठाऊक असते आणि पर्यायाने म्हणून तो देश आपला शत्रू असल्याची दृढ भावना भारतीयांच्या मनात खोलवर रुजलेली आहे. म्हणून तर पाकिस्तानचा कुठल्याही क्षेत्रात अवमान झाला वा फटका बसला तर भारतात आनंदोत्सव साजरा केला जातो. गरीबही पदरमोड करून फटाक्यांची आतषबाजी करतात. त्यांच्या मनात अय्यर काय शंका निर्माण करीत असतात?
अय्यर वा सिद्धू यांच्या राजकीय मताला वा मिमांसेला मतदानाच्या जगात किंमत नसते. तत्वांनी नव्हेतर सामान्य माणूस परिणामांनी प्रभावित होत असतो. पाक सेनेच्या घातपाती हल्ल्यात वा जिहादी कारवायांमध्ये आजवर हजारो भारतीय जवान व नागरिक बळी पडलेले आहेत. त्या प्रत्येक बळी वा जखमीच्या आप्तस्वकीयांत पाकविषयी कमालीचा राग भरलेला आहे. त्यांच्या वाट्याला आलेल्या वेदना यातना अय्यर वा सिद्धू यांच्या मनाला शिवलेल्या नाहीत, की अंगाला झोंबलेल्या नाहीत. त्यांच्या लेखी मरणारे आकडे असतात, बाकी तात्विक वा अभ्यास हे सत्य असते. म्हणूनच असे लोक दोन देशातील मैत्रीसंबंध असल्या गमजा करतात. त्याचे अर्थ सामान्य लोकांना कळले नाहीत, मग त्यांना सिद्धू वा अय्यर पाकिस्तानवादी वाटले तर नवल नाही. मग असे लोक समोर येऊन काँग्रेसला वा सिद्धूला जाब विचारणार नाहीत. पण मतदानाची वेळ येते, तेव्हा ते आपले ‘मतप्रदर्शन’ करीत असतात. त्याचाच फटका काँग्रेसला लोकसभेतील मोठ्या पराभवानंतर सतत बसलेला आहे. लागोपाठ करीत अनेक राज्यातून काँग्रेसने म्हणूनच सत्ता गमावलेली आहे. ती सत्ता भाजपाने हिसकावून घेतली हे सोपे उत्तर झाले. प्रत्यक्षात काँग्रेसने आपल्याच नाकर्त्या दिवाळखोर नेत्यांच्या अशा बोलघेवडेपणातून सत्ता गमावलेली आहे, जनमानसात आपली प्रतिमा डागाळून घेतलेली आहे. सिद्धू पाकिस्तानात जाऊन तिथल्या सेनाप्रमुखांची गळाभेट करतात. त्याच सेनाप्रमुखाच्या इशार्यावर पठाणकोट वा उरी येथील भारतीय लष्करी तळावर घातपाती हल्ले झालेले आहेत. अशा भेटी भारतीय जनमानसाच्या दुखण्यावर जखमांवर मीठ चोळण्याचे काम करतात. त्याचे भान असल्यामुळेच मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी सिद्धूला तिकडे जाण्यापासून परावृत्त केलेले होते आणि तरीही तिथे गेल्यावर केलेल्या वर्तनाविषयी नापसंती व्यक्त केलेली आहे. कारण याची किंमत मतातून मोजावी लागते हे त्यांनाच कळते.
मागल्या साडेचार वर्षात राहुल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने एकमागून एक राज्ये गमावली असताना, एकमेव राज्यात काँग्रेसने पुन्हा यश मिळवले, त्याचे नाव पंजाब आहे. तेही अमरिंदर सिंग यांच्यासारखा नेता समोर होता, म्हणून पंजाब मिळाला आहे. किंबहूना नाव घेण्यासारखे तेच एकमेव राज्य आता काँग्रेसपाशी उरलेले आहे. सिद्धूच्या असल्या उचापतींनी पुढल्या काळात तिथलाही मतदार बिथरला तर सत्ता जाऊ शकते. हे त्यासाठी मेहनत घेणार्‍या अमरिंदरना कळते. म्हणून दोन्ही प्रसंगी सिद्धूच्या पाकिस्तान जाण्याला त्यांनी आक्षेप घेतला व कृतीविषयी नाराजीही व्यक्त केली. पुर्ण अधिकार हाती असता तर एव्हाना त्यांनी सिद्धूला मंत्रीमंडळातून नारळ दिला असता. पण पक्षश्रेष्ठी म्हणजे राहुल गांधींचा लाडका असलेल्या सिद्धूला हात लावणे मुख्यमंत्र्याला शक्य नाही. एकतर राहुलनी एकहाती प्रचार करून उत्तरप्रदेश गमावला, तेव्हा राहुल प्रचाराला नसताना अमरिंदर यांनी एकट्याने किल्ला लढवून हे राज्य मिळवले आहे. पण तेही राहुलना शिल्लक ठेवायची इच्छा दिसत नाही. अन्यथा त्यांनी मागल्या खेपेसच सिद्धूचे कान उपटले असते. पण ते झाले नाही आणि आता तर खलिस्तानी फरारी अतिरेक्याच्या सोबत फोटो घेऊन सिद्धू यांनी काँग्रेसच्या नावाला कलंकच लावला आहे. की अमरिंदर सिंग यांना शह देण्यासाठीच राहुलनी सिद्धू नावाच्या उचापतखोराला पोसले आहे? काँग्रेसच्या र्‍हासाचे हेच खरे कारण आहे. श्रेष्ठी म्हणून दिल्लीत बसलेल्यांना राज्यातले स्वयंभू नेते नको असतात आणि कोणी असतील, तर त्यांना हैराण करण्यासाठी अशी बांडगुळे आणून माथी मारली जातात. जे समर्थ नेत्याला खच्ची करीत रहातील आणि मग तोही नेता संपला की पक्षाला राज्यात नवी उभारीही येऊ शकत नाही. सोनिया व राहुलच्या कारकिर्दीचा बारकाईने अभ्यास केला तर एक एक करून प्रादेशिक काँग्रेस नेत्यांना खच्ची केलेले दिसेल. पर्यायाने काँग्रेस उथळ पाण्यात बुडवलेली दिसेल.
मागल्या वर्षी ऐन गुजरात विधानसभा मतदानाच्या काळात अशीच मुक्ताफळे मणिशंकर अय्यरनी उधळली होती आणि मोदींना नीच आदमी म्हटलेले होते. तेव्हा त्यांना थेट पक्षातून निलंबित करण्याची वेळ राहुल गांधींवर आलेली होती. अर्थात तोपर्यंत खुप उशिर होऊन गेला होता. व्हायचे ते नुकसान होऊन गेलेले होते. मात्र त्यानंतर अय्यर यांनी आपल्या तोंडाला आवर घातला आहे. पण त्यांना जे मोकाट रान मिळाले त्यातून अनेक लहानमोठे दिवाळखोर नेते काँग्रेस पक्षात सोकावलेले आहेत. ते कमी होते म्हणून की काय सिद्धू नावाचा नवा कॉमेडीयन राहुल गांधींनी पक्षात आणला आहे. कुठले तरी चुरचुरीत शेरशायरी वा चटपटीत किस्से वचने सांगण्याने सिद्धू विनोदाचे बादशहा झालेले आहेत. पण राजकारण हा नर्म विनोदाचा आखाडा असला तरी पोरकटपणाला तिथे स्थान नसते. एखादा शब्दही फार मोठे नुकसान करून जात असतो. पाकिस्तानात जाऊन तिथल्या लष्करशहाशी गळाभेट आणि आता खलीस्तानी अतिरेकी चावलासोबत प्रसिद्ध झालेला फोटो, काँग्रेसला पुढे दिर्घकाळ राजकारणातली डोकेदुखी होऊन बसणार आहे. कदाचित लोकसभा निवडणूका रंगात येईपर्यंत सिद्धू आणखी अनेक धमाल प्रकरणे रंगवून मोकळे होतील आणि मगच राहुल त्यांना पक्षातून व मंत्रीमंडळातून बाजुला काढण्याचा निर्णय घेतील. पण तोपर्यंत किती वेळ झालेला असेल? अशा रितीने पक्षाचे होणारे नुकसान भाजपाचा लाभ नक्कीच असेल. पण त्यासाठी कष्ट मात्र सिद्धू व राहुल यांनी घेतलेले असतील. देशाचे सोडून द्या, आपल्याच पक्षाला आपल्याच सवंगडी व सहकार्‍यांपासून धोका असल्याचे राहुलना कळत नसेल, तर या शतायुषी पक्षाचे भवितव्य काय असेल? कारण त्यांला कोणी पराभूत करण्याची गरज उरलेली नाही. खुद्द राहुल व त्यांनीच निवडलेले असले नमूने, काँग्रेसला नामशेष करायला पुरेसे आहेत. मोदींनी त्यासाठी मेहनत घेण्याची अजिबात गरज उरलेली नाही.
या निमीत्ताने सिद्धू यांचा एक किस्सा इथे सांगणे भाग आहे. पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरण्यापुर्वी नरेंद्र मोदींनी गुजरात विधानसभा तिसर्‍यांदा निर्विवाद जिंकलेली होती. ती लढवताना त्यांना गुजरातमध्ये त्यांचे गुरू केशूभाई पटेल यांनी वेगळा पक्ष स्थापन करून आव्हान दिलेले होते. केशूभाई आपल्या भाषणात व प्रचारात मोदींच्या विरोधात जबरदस्त घणाघाती टीका करीत होते. मात्र भाजपाच्या प्रचारात कोणीही केशूभाईंच्या विरोधात अवाक्षर बोलायचे नाही, असा दंडक मोदींनी घातला होता. तेव्हा दिल्लीतून स्टार प्रचारक म्हणून सिद्धू यांना पाठवण्यात आलेले होते आणि एका सभेत चटपटीत बोलण्याच्या नादात सिद्धू यांनी केशूभाईंवर हल्ला चढवला. त्यांना गद्दार अशा शेलक्या शब्दांनी हिणवले. मोदींना त्याचा सुगावा लागताच त्यांनी सिद्धू यांच्या पुढल्या सर्व प्रचारसभा रद्द केल्या आणि त्यांना माघारी दिल्लीत पाठवून दिले. कारण केशूभाई कितीही विरोधक असले तरी गुजरातचे वडीलधारे नेतृत्व होते आणि त्यांच्याविषयीचे अपशब्द चार मते मिळवून देण्यापेक्षा चारशे मते कमी करतील, हे मोदी जाणून होते. ही जागरुकता राहुलना कळत नसेल तर त्यांच्या कारकिर्दीत काँग्रेसची नौका उथळ पाण्यात बुडण्याला पर्याय नाही. त्याच डगमगणार्‍या नौकेत राज बब्बर, अय्यर वा सिद्धू यासारखे प्रवासी भरलेले असले आणि ते थयथया नाचत असतील, तर अधिक लौकर डुंबणे हेच काँग्रेस नौकेचे भविष्य असायला पर्याय नाही. उपरोक्त काव्यपंक्तीमध्ये जो आशय शायराला कथन करायचा आहे, त्याचे इतके समर्पक उदाहरण दुसरे कुठले असू शकत नाही. काँग्रेसला काँग्रेसवालेच बुडवायला निघालेले आहेत, इतर कोणामध्ये तितका दम वा कुवत नक्कीच नव्हती. काँग्रेसची नौका तिथे बुडते आहे, जिथे त्या पक्षाचा पाया इतका ठिसूळ नव्हता. म्हणून हा इतका शतायुषी पक्ष अचानक का बुडतोय, त्याचे कोडे भल्या भल्या अभ्यासक विश्‍लेषकांनाही उलगडत नाही. कदाचित त्यांना शायरी कळत नसावी. आपल्या मराठी भाषेत उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणतात, तशीच काँग्रेसची नौका आता अधिक हेलकावे खाते आहे. •••

Posted by : | on : 9 Dec 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, भाऊ तोरसेकर, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, भाऊ तोरसेकर, स्तंभलेखक (344 of 1372 articles)

Mp Chattisgarh Rajasthan Mizoram Election
सारांश : ल.त्र्यं. जोशी | लढाईची ही झाली एक आघाडी. ती जिंकून काम भागत नाही. तिचा लाभ घेणारी बुथपातळीपर्यंत सक्रिय ...

×