ads
ads
मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

पंतप्रधान मोदींचा उमेदवारी अर्ज उद्या

पंतप्रधान मोदींचा उमेदवारी अर्ज उद्या

•वाराणसीत जय्यत तयारी सुरू •आज रोड शोद्वारे करणार शक्तिप्रदर्शन,…

तीन टप्प्यात गडकरींच्या देशभरात ५० प्रचारसभा

तीन टप्प्यात गडकरींच्या देशभरात ५० प्रचारसभा

•२७ सभांनी राज्यातही कमळजागर, नागपूर, २४ एप्रिल – भारतीय…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी » ऐसीतैसी होतेय्, पण कुणाची…?

ऐसीतैसी होतेय्, पण कुणाची…?

॥ विशेष : डॉ.रा.ह. तुपकरी |

स्वातंत्र्य मिळण्याकरिता अशा सर्वांचे एकमत होते, पण स्वातंत्र्य कुणाचे, कुणापासून व कशासाठी, यावर मतैक्य नव्हते. हे मुळातून समजणे आवश्यक आहे. त्यामुळे यावर स्वातंत्र्यानंतर विचार करू म्हणून तो विषय तेव्हा बाजूला करण्यात आला. स्वातंत्र्योत्तर मतांच्या राजकारणात अल्पसंख्य मतांकरिता अल्पसंख्यकांचे कल्याण, या आवरणाखाली मग त्यातील सनातन्यांना हाताशी धरून राजकारण सुरू झाले. यातून सर्व सामाजिक प्रश्‍न अधिक जटिल झालेत. स्वातंत्र्योत्तर घटनासमितीने तर योग्य घटना तयार केली. त्यात भारतीय इतिहासाचे प्रतिबिंब दिसावे, यास्तव त्यातील लिखित शब्दांबरोबर अनेक चित्र जोडण्यात आले. ती चित्रे केवळ कला म्हणून समाविष्ट करण्यात आली नव्हती, तर त्याद्वारे येथील परंपरागत प्रगती व विकसित जीवनमूल्ये दिग्दर्शित करण्याचा तो एक प्रयत्न होता.

Nehru, Patel, Prasad, And Munshi

Nehru, Patel, Prasad, And Munshi

मागच्या काही दिवसांतील दोन प्रमुख घटनांनी मला पुरेसे अंतर्मुख केले. त्या दोन घटना म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाचे शबरीमलै व दिवाळीत फटाके फोडण्यासंबंधीचे निवाडे! त्याची अंमलबजावणी कुणालाच करता आली नाही. सरकारी शक्ती त्यापुढे तोकडी पडली. सरकारचा दरारा कमी करणे तसे निषेधार्हच.
वरील दोन्ही प्रश्‍न हे हिंदूंच्या भावविश्‍वाशी संबंधित आहेत. त्या भावभावना त्या निवाड्यांनी अकारणच दुखावल्या गेल्या. पण असे का घडले? याचा विचार होणे आवश्यक आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या वक्तव्याप्रमाणे तर, हिंदूंच्या भावभावनांचा आदर करून न्यायनिवाडा व्हायला हवा. मुळात या समस्यांचे मूळ कुठे आहे, ते कसे कसे विकसित झाले, हे समजणे आवश्यक आहे. याचे मूळ, ज्या दिशेने स्वातंत्र्य आंदोलन चालले व स्वातंत्र्योत्तर विकासाची जी दिशा घेतली गेली त्यात आहे.
काँग्रेसमध्ये अनेक गट जरी होते, तरी त्यात मुख्यत: दोन गट होते. पटेल, राजेंद्रप्रसाद, संपूर्णानंद, टंडन, मुन्शी इ.च्या मताप्रमाणे, येथे स्वातंत्र्योत्तर हिंदुभावविश्‍वावर आधारित राष्ट्रजीवन उभे करण्याच्या मताचे ते होते; तर दुसरा मुख्यत: वामपंथी गट, येथे युरोपीय राष्ट्रांसारखे परंपरांपासून मुक्त असे राष्ट्रजीवन उभे करण्याच्या मानसिकतेचा होता, ज्याचे नेतृत्व नेहरू करीत होते. त्यामुळेच पटेलांनी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला, ज्यात राष्ट्रपती झालेल्या राजेंद्रप्रसादांनी लिंगाची प्राणप्रतिष्ठा केली, ज्याचे पौरोहित्य तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींनी केले. पण हेच अयोध्या, मथुरा व वाराणसीला नेहरूंमुळे शक्य झाले नाही. हे हिंदुत्ववादी नेते फार लवकर काळाआड गेले व मग नेहरूंचा एकछत्री अंमल सुरू झाला. त्यात, सत्ता मिळवणे व त्याद्वारे प्रगती, हा विषय केंद्रस्थानी आला.
स्वातंत्र्य मिळण्याकरिता अशा सर्वांचे एकमत होते, पण स्वातंत्र्य कुणाचे, कुणापासून व कशासाठी, यावर मतैक्य नव्हते. हे मुळातून समजणे आवश्यक आहे. त्यामुळे यावर स्वातंत्र्यानंतर विचार करू म्हणून तो विषय तेव्हा बाजूला करण्यात आला. स्वातंत्र्योत्तर मतांच्या राजकारणात अल्पसंख्य मतांकरिता अल्पसंख्यकांचे कल्याण, या आवरणाखाली मग त्यातील सनातन्यांना हाताशी धरून राजकारण सुरू झाले. यातून सर्व सामाजिक प्रश्‍न अधिक जटिल झालेत. स्वातंत्र्योत्तर घटनासमितीने तर योग्य घटना तयार केली. त्यात भारतीय इतिहासाचे प्रतिबिंब दिसावे, यास्तव त्यातील लिखित शब्दांबरोबर अनेक चित्र जोडण्यात आले. ती चित्रे केवळ कला म्हणून समाविष्ट करण्यात आली नव्हती, तर त्याद्वारे येथील परंपरागत प्रगती व विकसित जीवनमूल्ये दिग्दर्शित करण्याचा तो एक प्रयत्न होता.
पण, पटेलांच्या मृत्यूनंतर जेव्हा सर्व सत्ता नेहरूंपाशी एकत्रित झाली, त्यातून घटनेद्वारा दिग्दर्शित दिशेला पार बदलविण्यात आले. सरकारवर वामपंथी विचारांचा पगडा होणे सुरू झाले. नेहरू स्वत: युरोपीय वामपंथीच होते. त्यातच खर्‍या वामपंथीयांनी नेहरूंभोवती विभिन्न रूपात गराडा घातला. त्यातूनच अल्पसंख्यकांचा अनुनय सुरू झाला. मग मुस्लिम कल्याण व त्यातील सनातन्यांचे कल्याण, यातील सीमारेषा अधिकाधिक धूसर होत गेल्या. यामुळेच एका बाजूला वामपंथी व दुसर्‍या बाजूला हिंदू मूल्यव्यवस्था व ते भावविश्‍व मानणारे, असे दोन स्पष्ट गट राजकीय पटलावर तयार झालेत.
वामपंथीयांद्वारे भारत आता एका नवीन रूपात राष्ट्र म्हणून उभे होत आहे, यावर आग्रह व प्रचार सुरू झाला. त्यातून परंपरागत हिंदू भावविश्‍व पूर्णत: नाकारण्यात आले. भारत मग युरोपीय राष्ट्राप्रमाणे एक नेशन- स्टेट झाले. त्याचा आधार फक्त संविधान आहे, असा प्रचार सुरू झाला. नेशन- स्टेट म्हणजे नेशन (सामाजिक भावविश्‍व) कमी व स्टेट (सरकारी शक्ती) जास्त, असा प्रचार-प्रसार होत गेला. त्यातून येथील हिंदू भावविश्‍वाला पूर्णत: नाकारणे सुरू झाले. पण, मनुष्यांचे वैयक्तिक तसेच समाजाचे जीवन हे भावविश्‍वविरहित असूच शकत नाही. म्हणून मग संविधानच हे नवीन भावविश्‍व आहे, असा प्रचार सुरू झाला. त्याची पुढची आवृत्ती म्हणजे संविधानच आपले राष्ट्रीयत्त्व आहे, ही मांडणी सुरू झाली. ज्यांना फक्त सत्ता हवी होती, समाज सुधारणा वगैरे ज्यांच्या मानसिकतेत नव्हती अशांनी हीच तळी उचलली. त्यातूनच मग रामजन्मभूमीला विरोध, हिंदू म्हणून सर्व गोष्टीला विरोध, पण त्याचबरोबर जातीयतेचे राजकारण, हा स्वभाव बनला.
संविधान हे समाजाचे भावविश्‍व कसे असू शकते, असल्या प्रश्‍नांची प्रसारमाध्यमांत टर उडविण्यात येऊ लागली. खरेतर संविधान म्हणजे सरकार व जनता यामधील एक करार मात्र आहे. ते भावविश्‍वाचे निदर्शक कसे? त्यात सरकार व जनता या दोघांनी आपापल्या सीमेत राहून शांतता व अनुशासित समाजनिर्माणाला साहाय्यभूत होणे, हीच अपेक्षा आहे. त्यात झालेल्या वादाचे निवाडे न्यायालयाने करावे, ही अपेक्षा आहे. याचाच अर्थ, यातून असलेले भावविश्‍व सुदृढ करावे, हीच अपेक्षा होती व आहे. त्यामुळे संविधान हे आपले भावविश्‍व असा कोणताच सूर त्यातून निघत नाही, पण प्रचार मात्र तसा सुरू आहे.
पर्यायाने मग येथील परंपरागत भावविश्‍व संपविणे, हा मार्ग प्रशस्त होऊ लागला. शबरीमलै किंवा फटाक्यांवर गंडांतर यातूनच आले. खरेतर हिंदूंच्या असलेल्या भावविश्‍वाला दिशा देणे, हे शिक्षणाद्वारेच होऊ शकते. त्याऐवजी न्यायनिवाड्याने जबरदस्ती सुरू झाली. सर्वकाही सरकारने करावे, या विकसित केलेल्या पाश्‍चात्त्यप्रणीत मानसिकतेचे हे दिग्दर्शनमात्र आहे. व्यक्तिगत स्तरावरील कायद्याच्या निवाड्याविरुद्ध जाता येत नाही म्हणून तो व्यक्तीला मान्य करण्यावाचून गत्यंतर नसते. पण, सामाजिक स्तरावरील भावविश्‍वाच्या क्षेत्रात, गर्दीद्वारे (जी सहज जमते) त्या निर्णयाला झिडकारता येते. म्हणून वरील दोन्ही उदाहरणांत सरकारी यंत्रणेला त्या निर्णयांची अंमलबजावणी मुळीच करता आली नाही. त्या निवाड्यांची ऐसीतैसी झाली. फार पूर्वी कब्रस्तानासंबंधीचा असाच एक निर्णय होऊन त्याची अंमलबजावणी आजपर्यंत करता आली नाही.
सरकारने जर अशा समस्यांचे निराकरण अन्य मार्गांनी करण्याचा प्रयत्न केला असता, तर त्यात यशही आले असते. पण, भावविश्‍वाबद्दलची जाण ज्यांना आहे तेच हे करू शकतात. वामपंथी त्यांच्या पोथीनिष्ठ व्यवहारामुळे हे होऊ देत नाही. मग सर्वच पक्षांची गोची होते. रामजन्मभूमी विवादातही हीच अडचण आहे. म्हणूनच त्यावर भावनिक उद्रेक होणे अपरिहार्य आहे.
या सर्व प्रकारामुळे मग पंतप्रधान मोदी म्हणतात की, स्वातंत्र्योत्तर ज्यांनी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला ते पटेल जर पंतप्रधान झाले असते, तर या देशाचे चित्र फार निराळे व भारतीय भावविश्‍वाला अनुकूल असेच उभे झाले असते. मग त्यात शबरीमलै, फटाके फोडणे एवढेच नाही, तर अयोध्या, मथुरा व काशीचा प्रश्‍नही सहज सुटला असता. एवढेच नाही, तर भारतीय भावविश्‍वाला छेद देणारे काश्मीरसारखे अलगाववादी प्रश्‍न सहज सुटले असते. तसेच एकजन, एक संस्कृतीला विरोध करणार्‍यांचेही मतपरिवर्तन अवश्य झाले असते. हे सर्व आता फार कठीण होऊन बसले आहे. यातील सर्व पक्ष आता फक्त एकदुसर्‍याची निंदानालस्तीच करताना दिसतात. प्रश्‍न सोडविण्याची कुणाचीच इच्छा दिसत नाही. त्यामुळे ऐसीतैसी तर होतेच, पण कुणाची होऊ घातली आहे, हे ज्याचे त्याने ठरवावे…

Posted by : | on : 2 Dec 2018
Filed under : आसमंत, पुरवणी.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी (235 of 926 articles)

Techonology
अभिप्राय : डॉ.वाय.मोहितकुमार राव | विज्ञानाचे शिक्षण तसे सोपे नाही. सगळ्यांनाच त्यात रुची असत नाही. पण, प्रत्येकाला त्यात रुची वाटावी ...

×