ads
ads
सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

•पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पांढरकवड्यात पाकला इशारा •कोलामी, बंजारा,…

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

नवी दिल्ली, १६ फेब्रुवारी – पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती…

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

•अमेरिकेच्या एनएसएचा अजित डोवाल यांना फोन, नवी दिल्ली/वॉशिंग्टन, १६…

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

•अमेरिकेतील ७० खासदारांची भूमिका, वॉशिंग्टन, १६ फेब्रुवारी – पुलवामातील…

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

•पाकिस्तानने व्यक्त केली वचनबद्धता •कुलभूषण जाधव प्रकरण, लाहोर, १६…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:27
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, स्तंभलेखक, हितेश शंकर » काँग्रेसकाळातील हाशिमपुरा नरसंहार…

काँग्रेसकाळातील हाशिमपुरा नरसंहार…

॥ रोखठोक : हितेश शंकर |

Meerut Hashimpura Roits

Meerut Hashimpura Roits

मीरतच्या हाशिमपुरा कांडात २ मे १९८७ ला झालेल्या नरसंहारात दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. दिल्ली उच्च न्यायालयाने या सर्वांना हत्या, अपहरण, पुरावे नष्ट करणे इत्यादी आरोपांत दोषी मानत ही शिक्षा सुनावली आणि तीसहजारी न्यायालयाचा निर्णय बदलविला. खरेतर, दिल्लीच्या तीसहजारी न्यायालयाने २०१५ साली सर्व १९ आरोपींना निर्दोष मुक्त केले होते. त्यातील तीन मरण पावले आहेत. हाशिमपुरात निर्दोष मुसलमान लोकांना लक्ष्य करण्याच्या विरोधात आघाडी उघडण्यात डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांची प्रमुख भूमिका राहिली आहे. परंतु, सेक्युलर मीडिया याविषयी काही बोलायला तयार नाही. हां, गुजरात दंगलीवर मात्र पाणी पिऊन-पिऊन, पंतप्रधान मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना टोचण्यात मात्र ते चुकत नाहीत. हाशिमपुरा दंग्यात पी. चिदम्बरम् यांच्या भूमिकेविरुद्ध सुब्रमण्यम स्वामी यांनी याचिकाही दाखल केली होती.
घटना फेब्रुवारी १९८६ ची आहे. दिल्ली आणि उत्तरप्रदेश, दोन्ही ठिकाणी (केंद्रात राजीव गांधी आणि राज्यात वीर बहादुरसिंह यांच्या नेतृत्वात) काँग्रेसचे सरकार होते. फैजाबाद न्यायालयाने श्रीराम जन्मभूमीवर घटनाबाह्य पद्धतीने लावलेले कुलूप काढण्याचा आदेश दिला. या निर्णयाविरुद्ध पश्‍चिम उत्तरप्रदेशात मुसलमान रस्त्यावर उतरले. विशेषत: मीरतमध्ये अनेक हत्या झाल्यात. अनेक दुकाने पेटविण्यात आली. हाशिमपुरा, शाहपीर गेट, गोलाकुआँ, इम्लियानसह अनेक मुस्लिम वस्त्यांमध्ये लष्कराच्या शोधमोहिमेत प्रचंड प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि स्फोटके सापडलीत. हजारो लोकांना अटक करून तुरुंगात पाठविण्यात आले. या काळातच, २२ मे १९८७ च्या रात्री हाशिमपुरा कांड झाले. या घटनेत ४० मुसलमानांना ठार करण्यात आले. पीएसीने (उत्तरप्रदेशचे सशस्त्र पोलिस दल) मुसलमानांना गोळा केले आणि गंगा कालव्यावर नेऊन ठार केले, असा आरोप होता.
या घटनेत तथ्य किती आणि ऐकीव माहिती किती, हे आता चर्चेच्या पलीकडे आहे. दंगल, दंगलखोर आणि आरोपी यांच्या भूमिकेची सर्व प्रकारे तपासणी केल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने १९८७ मध्ये मीरतच्या हाशिमपुरा येथे झालेल्या कथित नरसंहाराच्या १६ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
देशात खोटे आणि वैमनस्य पसरविण्याचा एक सेक्युलर कारखाना आहे. या कारखान्यात ‘वातावरण तयार करणारे मुद्दे’ तयार केले जातात. जिला निवडणुकीत मताधिकार आहे ती प्रत्येक व्यक्ती, या सेक्युलर कंपनीचे लक्ष्यित ग्राहक (टार्गेट ऑडियन्स) आहेत. या कारखान्यात, भागधारकांच्या सोयीचा विचार करूनच मुद्यांचे उत्पादन होते आणि ते प्रचारित केले जातात.
मुद्दा मानवीय असलाच पाहिजे असे नाही. कसोटी न्यायपूर्ण असलीच पाहिजे गरजेचे नाही. हां, भागधारकांना मात्र हमखास लाभ मिळाला पाहिजे, ही एकमेव आणि सर्वांत आवश्यक बाब आहे.
दाखविण्यापुरता हल्ला ठीकठाक असावा; परंतु इतकाही नको की, प्रकरणच अंगलट यावे! हाशिमपुरा प्रकरणात सेक्युलर कंपनीचे हेच धोरण होते. हाशिमपुरा निश्‍चितच मुद्दा आहे. यात तर मरणारेदेखील मुसलमान होते; परंतु हा मुद्दा या खास कारखान्याचे उत्पादन नाही. कारण त्या वेळी केंद्रात आणि राज्यात, दोन्ही ठिकाणी काँग्रेसची सत्ता होती. त्यामुळे कुणीही मेले असले, तरी हा मुद्दा होऊच शकत नाही. भलेही हा मुद्दा नसला, तरी त्यात मुसलमान सामील असल्यामुळे, तो केवळ दिखाऊ छाती पिटण्यापुरताच मर्यादित आहे. या मुद्याला खूप प्रचारितही केले जाणार नाही. २००२ सालच्या गुजरात दंगलीप्रमाणे नेता आणि राजकीय पक्षांच्या मानसिकतेवर ज्याप्रमाणे प्रश्‍न लावण्यात आले होते, तसे १९८७ च्या मीरत कांडावर कुणी प्रश्‍न विचारणार नाही. म्हणजे, काँग्रेसच्या दृष्टीने मुसलमानांचे रक्त केवळ, राजकीय स्वार्थाचे नारे लिहिण्याची शाई आहे की काय? तेव्हाचे सरकार आणि आताचा न्यायालयाचा निर्णय, यांची प्रामाणिक तुलना करणारी, काँग्रेस हायकमांडची कुठली प्रतिक्रिया आली का?
असो. आज या निर्णयामुळे मीरत-मलियाना-हाशिमपुरा येथील पीडितांच्या जखमांवर काही मलम तर लागला आहे! परंतु, काँग्रेसच्या सत्ताकाळात ज्या वेदना मुसलमानांनी सहन केल्यात, त्याचे काय? या वेदनांवर १९८८ साली, इंडिया टुडे नियतकालिकेसाठी पंकज पचौरी यांनी वार्तापत्र लिहिले होते. हे पंकज पचौरी म्हणजे डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांचे माध्यम सल्लागार होते.
आपल्या या वार्तापत्राच्या प्रारंभी पचौरी लिहितात- ‘धर्माच्या नावावर सुरू झालेल्या दंगलीनंतर शासन व प्रशासनाच्या नावावर नरसंहार झाला.’ हाशिमपुरा दंगलीच्या एक वर्षानंतर, मे १८८८ मध्ये मलियानाच्या ७२ वर्षीय नफीस बेगमने पचौरींना सांगितले, ‘‘पंतप्रधान आले आणि निघून गेले, परंतु काहीही झाले नाही.’’ हाशिमपुराच्या मोहम्मद उमर यांची वेदनाही त्यांनी मांडली. उमर यांनी सांगितल्यानुसार, या दंगलीच्या काळात पीएसीने त्यांची मुले व दोन नातू यांना अटक केली होती. अटक झाल्यानंतर पाच दिवसांनी एक नातू त्याच्या वडिलांचे प्रेत घेऊन आजोबांकडे पोचला; परंतु दुसरा नातू एक वर्ष झाले तरी बेपत्ताच आहे. मीरत-मलियाना-हाशिमपुराच्या परिस्थितीवर सतत बातम्या देणारा मीडिया, काँग्रेसच्या सत्ताकाळात झालेल्या या दंगलीवर काय विचार करतो, हे उघड करणे आवश्यक आहे. कथित सेक्युलर आणि मुख्य धारेतील मीडिया, काँग्रेसच्या काळात झालेल्या दंगलींवर प्रश्‍न उपस्थित करून तिला आरोपीच्या पिंजर्‍यात उभी करत नसेल, तर ही मीडियाला जागे होण्याची वेळ आहे. मीडियाने काँग्रेसऐवजी स्वत:च्या विश्‍वासार्हतेची काळजी करायला हवी. कारण, कलंकितांना वाचविता-वाचविता, मीडियावर कमी कलंक लागले नाहीत!
लक्षात ठेवा, या जिवंत लोकशाहीने भ्रष्ट राजकारणाला किनार्‍यावर फेकून दिले आहे. सोशल मीडियाच्या या सक्रिय काळात, जर सत्यदेखील मुख्य धारेतील मीडियाच्या तोंडून निघत नसेल, तर लोक त्या मीडियालाच आपल्या मनातून काढून टाकतील, याची खात्री बाळगा.

Posted by : | on : 18 Nov 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, स्तंभलेखक, हितेश शंकर.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, स्तंभलेखक, हितेश शंकर (249 of 1220 articles)

Faizabad Ayodhya
टेहळणी : डॉ.परीक्षित स. शेवडे | २०१७ मध्ये उत्तरप्रदेशात सत्तेत आलेल्या योगी आदित्यनाथ यांनी, मुगलसरायचे नामकरण दीनदयालनगर असे केले. या ...

×