ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, सोमनाथ देशमाने, स्तंभलेखक » काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने |

राहुल भोवती संशयाचे धुके गडद होत जाणारच, जागृत झालेला हिंदू समाज त्याची चिरफाड करणारच! हिंदुंना मूर्ख बनविणे आता पूर्वीइतके सोपे राहिलेले नाही! माता रोमन कॅथॉलिक ख्रिश्‍चन असताना, पिता ब्राह्मणच काय हिंदुही नसताना पुत्र जानवेधारी ब्राह्मण कसा असू शकतो? एकच पर्याय शिल्लक उरतो, राहुल गांधींनी हिंदू धर्म स्वीकारला असेल तर! कदाचित लवकरच तीही घोषणा केली जाईल! पण भारतीय मतदार गोत्र बघून पात्र निवडत नाहीत, तर पात्राची खोली बघून सत्पात्री दान करतात! त्यामुळे नरेंद्र मोदी यांचा पराभव होईल आणि राहुल गांधी पंतप्रधान होतील, असे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील प्रादेशिक सुभेदारांच्या विरोधाभासी महागठबंधनला वाटत असेल, तर अपेक्षाभंगाशिवाय त्यांच्या पदरी काहीही पडणार नाही.

Rahul Gandhi 1

Rahul Gandhi 1

मी जसा आहे, तसा नाही आणि जसा नाही, तसा आहे हे सांगण्याचा जो आटापिटा राहुल गांधी करीत आहेत, ती नेहरु काँग्रेसची वंशपरंपरा आहे. काँग्रेसकडून राहुल गांधी हे जानवेधारी, दत्तात्रय गोत्री शिवभक्त ब्राह्मण असल्याचा जोरदार प्रचार सुरु आहे! परंतु राहुल गांधी हे रोमन कॅथॉलिक ख्रिश्‍चन असल्याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. आपले नाव राऊल विंची असल्याचे राहुल गांधी यांनीच आपल्या काही वैयक्तिक दस्तऐवजांमध्ये नमूद केलेले आहे. त्यांच्या इंग्लंडमधील एमफिल प्रमाणपत्रावर हे नाव आहे! धर्म कॅथॉलिक असल्याची नोंद आहे. ते प्रमाणपत्र खोटे आहे म्हणावे, तर मग राहुल गांधींची एमफिल पदवीही खोटी ठरते! धरलं तर चावते, सोडलं तर पळते! २००४ च्या निवडणूक शपथपत्रात या प्रमाणपत्राचा उल्लेख आहे. इंग्लंडमधील कंपनीच्या डायरेक्टरपदासाठी दिलेल्या माहितीत तो राऊल विंची ब्रिटिश नागरिक असल्याचा उल्लेख केलेला आहे. नंतर खाडाखोडीत भारतीय लिहिले आहे. ती कंपनी २००९ मध्ये बंद केली गेली. १९९४ साली राहुल गांधी यांनी बर्कलेज बँकेत राऊल विंची या नावाने खाते उघडले होते. हे खाते डिसेंबर २०१४ मध्ये म्हणजे संपुआ सरकार गेल्यानंतर बंद केले गेले. यांचं नाव संशयास्पद, धर्म संशयास्पद, नागरिकत्व संशयास्पद! आता म्हणत आहेत मी, राहुल गांधी, जानवेधारी ब्राह्मण आहे!
डॉ. सुब्रमण्यम स्वामी पुढे म्हणतात, राहुल गांधी जन्मजात ख्रिश्‍चन आहेत, सोनिया गांधी यांच्या १० जनपथ या सरकारी निवासस्थानी रोमन कॅथॉलिक चर्च आहे! या आरोपांचा आजतागायत इन्कार केला गेला नाही!
नेहरु-गांधी घराण्याविषयी असलेल्या प्रचलित माहितीपेक्षा कुणी भारतीय वेगळं काही सांगू लागला तर इतर भारतीय त्यावर पटकन विश्‍वास ठेवत नाहीत, किंबहुना त्याचा इन्कारच करतात. हे नेहरु-गांधी परिवारावरील भारतीयांच्या आंधळ्या श्रध्देपोटी होत असावे, कदाचित!
आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या न्युयॉर्क टाइम्स वर्तमानपत्राचा भारताविषयी, त्यातही हिंदुंविषयी असलेला आकस वेळोवेळी उफाळून येत असतो. हे वर्तमानपत्र हिंदुंची बाजू घेण्यासाठी काही खोटंनाटं छापेल याची तर मुळीच शक्यता नाही. न्युयॉर्क टाइम्स म्हणते, राहुल गांधी हे रोमन कॅथॉलिक ख्रिश्‍चन आहेत. सोनिया गांधी, प्रियांका गांधी याही कॅथॉलिक ख्रिश्‍चन आहेत. न्युयॉर्क टाइम्समध्ये १७ फेब्रुवारी १९८८ रोजी प्रसिध्द झालेले हे वृत्त खोटे असते, तर सोनिया गांधी, त्यांची काँग्रेस पार्टी यांनी न्युयॉर्क टाइम्सला जाब विचारला असता, त्या वृत्ताचा इन्कार केला असता, कदाचित अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला असता! पण तसे काहीही घडलेले नाही. न्युयॉर्क टाइम्सचे ते वृत्त त्या वर्तमानपत्राच्या वेबसाईटवर गेली तीन दशके अबाधित आहे! आजतागायत त्याविरुध्द सोनिया परिवाराने, काँग्रेस पक्षाने कुठलीही तक्रार नोंदविलेली नाही. याचा अर्थ सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी-वाड्रा हे रोमन कॅथालिक ख्रिश्‍चन असावेत अशी शंका घ्यायला भरपूर वाव आहे आणि तो संबंधीतांनीच उपलब्ध करुन दिला आहे.
सोनिया गांधी यांना भारताचे पंतप्रधानपद का स्वीकारता आले नाही याविषयीचे खरे कारण न सांगता सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद नाकारुन फार मोठा त्याग केला असे काँग्रेसतर्फे खोटेच सांगण्यात आले! पंतप्रधानपदावर दावा ठोकण्यासाठी तरातरा राष्ट्रपती भवनात गेलेल्या सोनिया गांधी यांनी जड पावलांनी बाहेर येऊन मला पंतप्रधानपद नको असे सांगितले आणि आम्ही खुळ्या भारतीयांनी त्यावर विश्‍वास ठेवला! कितीतरी काँग्रेसी त्यावेळी धाय मोकलून रडले, आजही रडत असतात! याला भाबडेपणा म्हणावा की आत्मघातकी मूर्खपणा? मी जसा आहे, तसा नाही आणि जसा नाही, तसा आहे या काँग्रेसी बतावणीला आपण भारतीय आणखी किती दिवस फसत राहणार? नेहरु खानदानाने फसविले, आता नामधारी गांधी परिवार फसवतोय!
साधी मेथीची जुडी खरेदी करताना आपण तिची पानं, फुलं, मुळं बारकाईने तपासून बघतो, भाजी देशी, गावरान असावी असा आग्रह धरतो! मग मतदान करताना आमची ही चिकित्सक बुध्दी आम्ही काँग्रेसकडे गहाण का टाकत असतो? काँग्रेसी दलालांमार्फत आम्ही का विकले जातो? आम्हाला आमची स्वतःची, आमच्या मतांची, लोकशाहीची खरी किंमत कधी कळणार? स्वतःची मुळं मातृभूमीत घट्ट रोवून ताठ मानेने खंबीरपणे उभे राहा, तुम्हाला खरेदी करायची कुणाचीही हिंमत होणार नाही. कस्तुरीचं मोल असणारे भारतीय मतदार हिंगमिर्‍याच्या बदल्यात विकले जाणार नाहीत, त्या दिवशी भारतीय लोकशाही परिपक्व होईल आणि मतं मागायला येणारा जसा आहे तसा तुमच्यासमोर येईल, मतदारांना कुणीही फसवू शकणार नाही!
गुजरात विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान राहुल गांधी मठमंदिरांचे उंबरठे झिजवत होते, परंपरागत जाळीदार टोपीला फाटा देऊन भगवी उपरणी परिधान करत होते, माथ्यावर केसरी गंध, कुंकुमतिलक मिरवित होते! सोरटी सोमनाथाच्या मंदिरात राहुल गांधींनी गैरहिंदू भाविकांसाठी असलेल्या पुस्तिकेत आपल्या नावाची नोंद करणे अगदी स्वाभाविकच होते, पण त्या दिवसापासून राहुल गांधी हे जानवेधारी ब्राह्मण आहेत, शिवभक्त आहेत हे सिध्द करण्यासाठी काँग्रेस पक्षाची जी केविलवाणी धडपड सुरु झाली, ती आता राहुल गांधी यांच्या नसलेल्या गोत्रापर्यंत येऊन थांबली आहे. रंगेहात चोरी पकडली गेल्यानंतरही कुणी एवढी सारवासारव करीत नाही! सोनिया गांधी, राहुल गांधी हे कॅथॉलिक ख्रिश्‍चन आहेत म्हणून त्यांना कुणी नाकारलेले नसताना, तसा कुणी आक्षेप घेतलेला नसताना काँग्रेस पक्षाचा हा सारा आटापिटा कशासाठी सुरु आहे? काँग्रेसला राहुल गांधी हे जानवेधारी, दत्तात्रय गोत्री ब्राह्मण असल्याचा शोध आताच कसा काय लागला? यापूर्वी काँग्रेसने राहुल गांधी यांचा धर्म, जात, गोत्र याविषयी जाहीर वाच्यता कधीही केलेली नाही. राहुल गांधी यांनी विधीवत हिंदू धर्म स्वीकारला असेल, तर समस्त हिंदू समाज त्यांचे स्वागतच करील, पण त्याविषयी कधी कुठे वाचण्यात, ऐकण्यात आलेले नाही. मौंजीबंधनात गोत्र विचारुनच यज्ञोपवित संस्कार केले जातात, गायत्री दीक्षा दिली जाते, पण राहुल गांधींनी आधी जानवे दाखविले आणि आता कितीतरी दिवसांनी गोत्र सांगत आहेत! आमच्याकडचे ब्रह्नवृंद म्हणाले, दत्तात्रय गोत्र अस्तित्वातच नाही! खरं खोटं राहुल गांधीच सांगू शकतील! कारण राहुल गांधी ब्राह्मण आहेत आणि काँग्रेसच्या डीएनएतही ब्राह्मण आहे, असं काँग्रेस प्रवक्ते सुरजेवाला सांगत असतात. गांधी वधानंतर महाराष्ट्रात काँग्रेसवाल्यांनी हजारो ब्राह्मणांच्या घरांची राखरांगोळी केली, तेव्हा काँग्रेसचा डीएनए ब्राह्मण नव्हता का? स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अक्षम्य हेळसांड काँग्रेसच्या कुठल्या डीएनएत बसते?
राहुल गांधी यांचे पितृकूल आजोबा फिरोज जहांगीर घंडी(ॠहरपवू) हे जसे होते तसे राजकारणात समोर आले आणि भारतीयांनीही त्यांना स्वीकारले! इंदिरा फिरोज घंडी यांनाही तसेच स्वीकारले असते, पण नेहरु खानदानाच्या हिंदुंवरील परंपरागत अविश्‍वासातून त्या केवळ इंदिरा गांधी झाल्या! मी शिक्षणाने युरोपियन आहे, संस्कृतीने मुगल आहे आणि अपघाताने, केवळ अपघाताने हिंदू आहे, असं जवाहरलाल नेहरु म्हणायचे! त्या अपघातापूर्वी ते किंवा त्यांचे पूर्वज कोण होते हे मात्र त्यांनी कधी सांगितले नाही आणि सर्वसमावेशक हिंदुंनीही त्यांना तसे कधी विचारले नाही. आज अचानक जवाहरलाल नेहरुंचा पणतू, राजीव फिरोज घंडी यांचा पुत्र राहुल गांधी हे जानवेधारी दत्तात्रय गोत्री शिवभक्त ब्राह्मण असल्याचे ओरडून सांगितले जात असल्यामुळे राहुल भोवती संशयाचे धुके गडद होत जाणारच, जागृत झालेला हिंदू समाज त्याची चिरफाड करणारच! हिंदुंना मूर्ख बनविणे आता पूर्वीइतके सोपे राहिलेले नाही! माता रोमन कॅथॉलिक ख्रिश्‍चन असताना, पिता ब्राह्मणच काय हिंदुही नसताना पुत्र जानवेधारी ब्राह्मण कसा असू शकतो? एकच पर्याय शिल्लक उरतो, राहुल गांधींनी हिंदू धर्म स्वीकारला असेल तर! कदाचित लवकरच तीही घोषणा केली जाईल! पण भारतीय मतदार गोत्र बघून पात्र निवडत नाहीत, तर पात्राची खोली बघून सत्पात्री दान करतात! त्यामुळे नरेंद्र मोदी यांचा पराभव होईल आणि राहुल गांधी पंतप्रधान होतील, असे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील प्रादेशिक सुभेदारांच्या विरोधाभासी महागठबंधनला वाटत असेल, तर अपेक्षाभंगाशिवाय त्यांच्या पदरी काहीही पडणार नाही. परस्परविरोधी आचार विचार आणि स्वार्थ असलेले विरोधक केवळ मोदीविरोध, मोदी नकोच या मुद्यांवर एकत्र येत आहेत. त्यांच्या एकत्र येण्याला कुठलाही नैतिक अधिकार नाही, आर्थिक, सामरिक धोरणांमध्ये एकवाक्यता नाही! जम्मु-काश्मिरमध्ये सरकार स्थापन्यासाठी महबुबांची पीडीपी, अब्दुल्लांची एनसी हे काँग्रेसबोबत पुढे सरसावले होते, तद्वतच सर्व मोदीविरोधक काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारतील, असे काँग्रेसला वाटत असावे! मोदीविरोधकांसमोरही दुसरा कुठला पर्याय नाही. तुझे माझे जमेना आणि तुझ्या वाचुन करमेना! २०१९ चा महासंग्राम मोदी आणि राहुल यांच्यातच होणार आहे.
काँग्रेसप्रणित महागठबंधनातले प्रमुख घटक पक्ष आहेत शरद पवारांची एनसीपी, लालुपुत्रांची आरजेडी, करुणानिधीपुत्र स्टॅलिनची डीएमके, चंद्राबाबुंची टीडीपी, देवेगौडांची जेडीएस, केजरीवालांची आआपा वगैरे. मायावतींची बीएसपी, मुलायमपुत्र अखिलेशची एसपी, ममता दीदींची टीएमसी, उध्दव ठाकरेंची शिवसेना वगैरे अन्य काही क्षेत्रीय दल महागठबंधनात सामील होतील असं काँग्रेसला वाटते, कारण या सार्या पक्षांना या ना त्या कारणाने मोदी सरकार पुन्हा नको आहे. यातल्या बहुतेक सर्व पक्षांचा ब्राह्मणद्वेष हाच आधार आहे. मायावतींच्या बीएसपीचा नारा होता तिलक, तराजू और तलवार, इन को मारो जुते चार! त्या मायावती तिलकधारी, जनेऊधारी ब्राह्मण राहुल गांधी यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देणार! का? तर मोदी नकोत! तमिळनाडूतील द्रविडी पक्षांचे राजकारण ब्राह्मणेतर पायावरच आधारलेले आहे. लालु प्रसादांच्या आरजेडीचेही तेच सूत्र आहे, ब्राह्मणद्वेष! मनुवादी हा यांचा परवलीचा शब्द आहे सेक्युलर राजकारण करताना ब्राह्मणांबद्दल वापरण्यासाठी! महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार पेशवाई अवतरली म्हणून व्यंग करत असतात. ज्यांना ब्राह्मण मुख्यमंत्री सहन होत नाही ते जानवेधारी ब्राह्मण असल्याचे सांगणार्‍या राहुल गांधी यांना पंतप्रधान करायला निघाले आहेत. काँग्रेसने जो ब्राह्मणजप चालवला आहे तो पाच टक्के ब्राह्मणांच्या मतांसाठी नक्कीच नाही, कारण याला काँग्रेसच्या सहकारी पक्षांनी, परंपरागत मतपेढ्यांनी, ब्राह्मणेतर काँग्रेस सहानुभूतीदारांनी कुठेही हरकत घेतलेली नाही! हा कुठल्यातरी षडयंत्राचा भाग असावा, ज्याचा यथावकाश सुगावा लागेलच!
काँग्रेसमुक्त भारतचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोडला आणि त्याचे श्रेय मोदींना मिळू नये म्हणून संकल्पपूर्तीसाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी जीवाचे रान करत आहेत! वर्षअखेरपर्यंत पंजाब आणि कर्नाटकही काँग्रेसच्या हातून निसटलेले असेल! काँग्रेसमुक्त भारत संकल्पनेत गांधी-नेहरु घराणेमुक्त काँग्रेस हा अर्थ अभिप्रेत होता, परंतु तसे होताना दिसत नाही, कारण ताठ कण्याचा काँग्रेसी ना काँग्रेसमध्ये आहे, ना काँग्रेसबाहेर! मोदी नकोत म्हणून बुजूर्ग शरद पवार साहेबच नवख्या खुशालचेंडू राहुल गांधींना पंतप्रधान करायला धडपडत असतील, तर इतर काँग्रेसींची काय बिशाद!
स्वातंत्र्य दृष्टीपथात येत असताना सरदार वल्लभभाई पटेलादी बावनकशी भारतीय विचारधारा असलेली मंडळी भारतीय भावविश्‍वाला अनुकूल, हिंदुभावविश्‍वावर आधारित स्वातंत्र्योत्तर राष्ट्रजीवन कसे असावे यावर विचारमंथन व्हावे असा आग्रह करत होती. दुसरीकडे शिक्षणाने युरोपियन, संस्काराने मुगल आणि अपघाताने हिंदू असलेल्या जवाहरलाल नेहरु प्रणित गट स्वातंत्र्योत्तर भारत युरोपीय राष्ट्रांसारखा, हिंदू परंपरांपासून मुक्त, भौतिकवादी राष्ट्रजीवनावर आधारित असावा अशा मानसिकतेचा होता. वामपंथी विचारधारेचा पगडा असलेला नेहरु गट प्रभावी असल्यामुळे यावर स्वातंत्र्यानंतर विचार करु म्हणून तो विषय बाजूला टाकण्यात आला आणि स्वातंत्र्यानंतर नेहरुंचा एकछत्री अंमल सुरु झाल्यानंतर हिंदुभावविश्‍व अडगळीत फेकले गेले. भौतिक सोयीसुविधांच्या, शारिरीक सुखाच्या पलिकडेही आयुष्य असते हे नेहरुंनी विचारातच घेतले नाही. स्वतंत्र भारताच्या राज्यकारभाराचा श्रीगणेशा पहिल्या सूर्यकिरणांच्या पवित्र साक्षीने करता आला असता, पण जवाहरलाल नेहरुंनी शपथ घेतली काळोख्या रात्री बाराच्या ठोक्याला! सूर्योपासक सनातन भारतीय परंपरेवर पहिला पाश्‍चात्य आघात! नेहरुंनी हिंदुंचे सारे भावविश्‍वच उध्वस्थ करुन टाकले. सरदार वल्लभभाई पटेल पंतप्रधान झाले असते, तर एवढे आक्रित घडले नसते!
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्वप्नातला एकजिनसी, समृध्द भारत घडविण्यासाठी अहोरात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत आणि मोदीविरोधक त्यांना हटवून नेहरु-गांधी घराण्याची मनसबदारी मिळविण्यासाठी उतावीळ झाले आहेत. आधी मोदींना हटवू, पुढचे पुढे बघू! तीच खानदानी नेहरु सरंजामशाही मानसिकता!
दहा दिशांना वीस तोंडं असलेल्या महागठबंधनला बहुमत मिळाले तर पहिली मारामारी होईल पंतप्रधानपदासाठी! शरद पवार, मायावती, ममतादीदी, चंद्राबाबु नायडु, मुलायमसिंग यादव यांचं संख्याबळ ते किती असणार? मावळत्या लोकसभेत मायावतींचा एकही खासदार नाही आणि मुलायमसिंग यांचे पाच खासदार त्यांच्याच कुटुंबातले आहेत! तरीही उपरोक्त प्रत्येक नेत्याला पंतप्रधान व्हावयाचे आहे! महागठबंधनात सर्वाधिक खासदार काँग्रेसचे असतील. साहजिकच राहुल गांधींना पंतप्रधानपद मिळावे म्हणून मॅडम सोनिया गांधी इरेला पेटतील. तुफान हाणामारी होऊनही राहुल गांधींच्या नावावर एकमत नाही झाले, तर अरविंद केजरीवाल पंतप्रधान होतील आणि काँग्रेस नेहमीप्रमाणे बाहेरुन पाठिंबा देईल! चर्च, चीन आणि पाकिस्तान यांना सर्वाधिक आनंद होईल! बांग्लादेशी, रोहिंग्या घुसखोर भारतात स्थीरस्थावर होतील, त्यांची नवीन आवक वाढेल! मिशनरी, जिहादी, वामपंथी यांना मोकळे रान मिळेल आणि राहुल गांधी ख्रिसमस साजरा करायला आजोळी निघून जातील. महागठबंधनला बहुमत देणार्‍या भारतीय मतदारांची मात्र चुग गयी चिडीयाँ खेत, अब क्या पछताना रे, अशी अवस्था होईल! शुभम् भवतु!!

Posted by : | on : 9 Dec 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, सोमनाथ देशमाने, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, सोमनाथ देशमाने, स्तंभलेखक (343 of 1372 articles)

Pakistan Politics Diplomacy
जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता राहुलना कळत नसेल तर त्यांच्या कारकिर्दीत काँग्रेसची नौका उथळ पाण्यात बुडण्याला पर्याय ...

×