ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » आसमंत, डॉ.परीक्षित स. शेवडे, पुरवणी, स्तंभलेखक » काँग्रेसी अभिव्यक्तिस्वातंत्र्य!

काँग्रेसी अभिव्यक्तिस्वातंत्र्य!

॥ टेहळणी : डॉ.परीक्षित स. शेवडे |

Sanjaya Baru Book The Accidental Prime Minister

Sanjaya Baru Book The Accidental Prime Minister

पत्रकार संजय बारू लिखित ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या पुस्तकावर आधारित त्याच नावाचा सिनेमा याच महिन्यात प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधान म्हणून दहा वर्षांच्या कारकीर्दीवर आधारित या चित्रपटाने काँग्रेसच्या माजी अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी आणि विद्यमान अध्यक्ष राहुल गांधी यांची प्रतिमा मलिन होईल, असा कांगावा करत चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी केली आहे. नव्यानेच सरकार स्थापन केलेल्या मध्यप्रदेशात तर हा चित्रपट लावल्यास चित्रपटगृहाचे होणारे नुकसान ही मालकांची जबाबदारी असेल, अशी अरेरावीची भाषादेखील काँग्रेस कार्यकर्ते-नेते वापरत आहेत. एरव्ही अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा ठेका घेतलेल्या या पक्षाकडून अशी भाषा केली जात असल्याने, त्यांची दांभिकता पुरेपूर उघड होत असली, तरी या दांभिकतेचा इतिहास तसा जुनाच आहे.
भाजपा वा शिवसेनेसारख्या पक्षांवर, ते सेन्सॉरशिप लादतात, असा आरोप कायम करत आलेल्या काँग्रेसचा अभिव्यक्तिस्वातंत्र्याबाबतचा इतिहास काय सांगतो पाहू या-
‘चाहूंगा मैं तुझे सांझ सवेरे…’, ‘जब दिल ही टूट गया… हम जी के क्या करेंगे…’ अशी प्रसिद्ध गीते लिहिणारे गीतकार मजरूह सुल्तानपुरी यांनी एक रचना केली होती-
‘मन में ज़हर डॉलर के बसा के, फिरती है भारत की अहिंसा।
खादी की केंचुल को पहनकर, ये केंचुल लहराने न पाए।
ये भी है हिटलर का चेला, मार लो साथी जाने न पाए।
कॉमनवेल्थ का दास है नेहरू, मार लो साथी जाने न पाए।’
ही रचना ऐकताच अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे तथाकथित पुरस्कर्ते असलेल्या तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या तळपायाची आग मस्तकात पोहोचली आणि सुल्तानपुरी यांच्यावर राजद्रोहाचा आरोप करत त्यांना पुढील दीड वर्ष तुरुंगात डांबून ठेवण्यात आले! नेहरूंच्याच कारकीर्दीत किती कलाकृतींवर बंदी घातली गेली याचीही झलक पाहू या-
मार्क रोबसन लिखित ‘नाईन अवर्स टू रामाया पुस्तकात गांधींच्या हत्येवेळी सुरक्षेत झालेला ढिसाळपणा वर्णन करण्यात आल्याने या पुस्तकावर बंदी घातली गेली. नोबल विजेते बर्टनार्ड रसल यांच्या ‘अन्आर्म्ड व्हिक्टरी’ या पुस्तकावरही नेहरूंनी बंदी आणली होती. मृणाल सेन यांच्या ‘नील अक्षर नीचे’ या चित्रपटावर नेहरूंनी बंदी घातली होती. ‘भूल न जाना’ नामक १९६२ च्या युद्धाच्या पार्श्‍वभूमीवरील चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती. नेहरूंनी परदेशातून सौंदर्यप्रसाधने आयात करण्यावर बंदी घातली होती. त्या सुमारास जे. आर. डी. टाटा यांच्यासह चर्चा होऊन पुढे लॅक्मे नामक सौंदर्यप्रसाधनांचा ब्रांड उदयाला आला. आजच्या घडीला मात्र हा ब्रांड युनिलिव्हरच्या मालकीचा आहे. ऑल इंडिया रेडिओवर हार्मोनियम वाजवण्यास ब्रिटिशांनी घातलेली बंदी काँग्रेसने पुढेही सुरूच ठेवली. खुद्द नेहरूंनीच एका भाषणात ही बंदी योग्य असल्याचे ठणकावून सांगितले होते. स्वतः नेहरूंना हार्मोनियम आवडत नसे! याशिवाय हार्ट ऑफ इंडिया (अलेक्झांडर कॅम्पबेल), गांधींच्या लैंगिक निवडीबाबत उल्लेख असलेले द लोटस अ‍ॅण्ड द रोबोट, आयेशा (कर्ट फिश्‍लर), चंद्रमोहिनी, द डार्क अर्ज (रोबर्ट टेलर), व्हॉट रिलीजन हॅज डन फॉर मॅनकाइंड, नेपाल (टोनी हजेन), रामा रिटोल्ड अशा कित्येक पुस्तकांवर नेहरू पंतप्रधान असताना बंदी घातली गेली.
तारा सिन्हा यांनी संपादित केलेल्या ‘राजेंद्र बाबू : पत्रों के आईने में’ नामक पुस्तकात तर अनेक धक्कादायक खुलासे आपल्यासमोर येतात. स्व. राजेंद्रप्रसादजी हे राष्ट्रपती होऊ नयेत, अशी इच्छा असल्याने नेहरू हे पत्रात वल्लभभाई पटेलांचे नाव घेऊन बिनदिक्कत खोटे लिहितात आणि हे खोटे समोर आल्यावर त्यावर सारवासारव करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात! सोमनाथाच्या जीर्णोद्धारास राजेंद्रबाबूंनी उपस्थित राहू नये, असेही पत्र नेहरूंनी पाठवले होते. या पत्रास राजेंद्रप्रसादांनी स्वच्छ नकार कळवला आणि ते राष्ट्रपती या नात्याने सोहळ्यास उपस्थित राहिले. इतके खटके उडाल्यामुळेच कदाचित; राजेंद्रबाबूंच्या अंत्ययात्रेस तत्कालीन राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांनी उपस्थित राहू नये, असे त्यांना पत्राद्वारे कळवत असतानाच नेहरू स्वतःदेखील त्या प्रसंगी अनुपस्थित राहिले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अंत्ययात्रेच्या वेळेसही नेहरूंनी हाच कोतेपणा दाखवला होता. ही सारी पत्रे वाचण्यास उपलब्ध आहेत. २१ नोव्हेंबर १९६२ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात काँग्रेस असा उल्लेख करते की, पंतप्रधानांच्या धोरणांवर टीका करणे हा देशद्रोह आहे! नेहरूंचे स्वीय सचिव राहिलेले एम. ओ. मॅक मथाई आपल्या ‘रीमेनीसन्स ऑफ नेहरू एज’ या पुस्तकात नमूद करतात की, इंदिरा गांधींना महागड्या साड्या भेट मिळाल्याची बातमी छापल्याने नेहरूंनी टाईम्स ऑफ इंडिया विकत घेणे बंद केले आणि त्यांनी या वृत्ताबाबत माफी मागावी, अशी तंबीही दिली.
‘जनतेचा कसाई : मोरारजी देसाई’ हा अग्रलेख लिहिल्याबद्दल आचार्य अत्रे यांना काँग्रेस शासनाकडून तुरुंगात डांबण्यात आले होते. त्या काळी ते चक्क तुरुंगातून लिखाण करीत असत. मोरारजी देसाई यांनी अभिनेते दिलीप कुमार यांच्या ‘जुगनू’ नामक चित्रपटावर बंदी आणली होती. पुढे आणिबाणीच्या काळात तर अभिव्यक्तिस्वातंत्र्याची दिवसागणिक हत्या कशाप्रकारे होत होती, हा इतिहास तरी तुलनेत ताजा आहे. मात्र, या बंदीच्या इतिहासाची गंगोत्री साक्षात स्वतंत्र भारताच्या पहिल्या पंतप्रधानांपासून सुरू होते, हे बर्‍याच जणांना माहिती नसते. एरव्ही अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावे गळा काढणारी काँग्रेस आजही नेहरूंच्याच पावलांवर पाऊल ठेवून चालत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ हे पुस्तक २०१४ साली प्रकाशित झाले, तेव्हाही त्यावर काँग्रेसकडून बंदीची मागणी झाली होती, त्यात त्यांना यश आले नाही. आता सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र मिळाल्यावरही काँग्रेस ही सेन्सॉरशिप लादू पाहत आहे. त्यातही फारसे यश मिळणार नाही, हे लक्षात येत असतानाच अचानक यूट्युबवरून चित्रपटाचे ट्रेलर हटवले गेल्याची बातमी आली. हा निव्वळ योगायोग असावा का? सोशल मीडियाच्या आजच्या युगात कोणतेच सोंग फार काळ टिकणे शक्य नाही. अशा दडपशाहीला एकेक जणाचा प्रतिकारदेखील पुरेसा ठरत असतो. अभिव्यक्तिस्वातंत्र्याची पायमल्ली करत ज्या मजरूह सुल्तानपुरींना काँग्रेसने तुरुंगात डांबले होते त्यांच्याच शब्दांत- ‘‘मै अकेला ही चला था जानिबे मंजिल, मगर लोग पास आते गये और कारवाँ बनता गया…’’

Posted by : | on : 13 Jan 2019
Filed under : आसमंत, डॉ.परीक्षित स. शेवडे, पुरवणी, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, डॉ.परीक्षित स. शेवडे, पुरवणी, स्तंभलेखक (9 of 1137 articles)

Yogi Arvind
प्रासंगिक : प्रा. प्र.श्री. डोरले | ‘गीतेतील ज्ञानी म्हणजे नि:संग, निष्क्रिय मानव नव्हे. जीवनाच्या सर्व घडामोडीत सर्वव्यापी परमेश्‍वराचे अस्तित्व आणि ...

×