ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, यमाजी मालकर, स्तंभलेखक » कागदी नोटांचे महत्त्व ज्यांनी (न) जाणले!

कागदी नोटांचे महत्त्व ज्यांनी (न) जाणले!

॥ अर्थपूर्ण : यमाजी मालकर |

Currency1 500rs New Note Bundle

Currency1 500rs New Note Bundle

आपल्या देशातील नागरिकांच्या वृत्तीवर बोलायला आपल्यापैकी अनेकांना खूप आवडते. त्यातील बहुतेकांना आपण सोडून बाकी नागरिक कसे प्रामाणिक नाहीत, ते कसे काम करत नाहीत, ते कसे आळशी आहेत आणि आपण एवढ्या कष्टाने मिळविलेले यश कसे अद्वितीय आहे, असे त्यांना सिद्ध करायचे असते. ते हे विसरतात की त्यांना देशातील त्या त्या वेळच्या परिस्थितीने साथ दिली आहे.
त्यांच्या कष्टाचा वाटा असतोच, पण तेच कष्ट त्यांच्यासोबत इतरांनीही केलेले असतातच. पण परिस्थिती त्यांना एकतर साथ देत नाही किंवा एवढ्या गर्दीत पुढे जाण्याच्या स्पर्धेत काही जणच पुढे जाऊ शकतात. भांडवलाचा वाटा या प्रवासात तेवढाच महत्त्वाचा असतो, ते सर्वांना मिळत नाही, हाही तेवढाच महत्त्वाचा पैलू आहे. पण आपणच कसे वेगळे आहोत, हे सिद्ध करताना देशाच्या गंभीर प्रश्‍नांची उत्तरे भारतीयांच्या वृत्तीतच शोधण्याचा धोका त्यातून वाढतो. भारतीय समाजाच्या दारिद्र्याचे उत्तर असेच वृत्तीत शोधले जात असल्याने त्याविषयी समाजात आजस्पष्टता येताना दिसत नाही.
या दारिद्र्याचे चित्रण किती चांगले केले जाऊ शकते, यासाठी परवा झळकलेल्या नाळ सिनेमापासून अनेक सिनेमे, नाटके, कथा, कादंबर्‍या आपल्याला उपलब्ध आहेत. खरोखरच खेड्यापाड्यात अशी परिस्थिती आहे का, खरोखरच प्रवासासाठी इतकी यातायात करावी लागते का, जातीयवादाचे भूत अशा स्वरुपात जिवंत आहे का, असे शहरी श्रीमंत नागरिकाला अशा कलाकृती पाहून, वाचून वाटते. स्वातंत्र्याच्या सात दशकानंतर आपल्या देशात अशी स्थिती आहे, याची जाणीव होण्यासाठी खरे म्हणजे आजूबाजूला डोळे उघडे ठेवून पाहिले तरी पुरेसे आहे. पण त्याचे गांभीर्य अशा काही कलाकृतीमधून जास्त लक्षात येते, ही वस्तुस्थिती आहे. पण या कलाकृती दारिद्र्याचे नुसतेच चित्रण करतात आणि एखाद्या सूडकथेची फोडणी देऊन तो विषय तेथेच सोडून देतात. त्यात अंतिमत: मनोरंजन असते, त्यामुळे त्याची चर्चाही खूप होते. पण मूळ मुद्दा तसाच राहतो, जो जागचा हलत नाही. तो मुद्दा म्हणजे ही स्थिती काय केले तर बदलेल? तो बदल नेमका काय आहे, याविषयी मात्र पुरेशी चर्चा क्वचितच होते.
जे गरीब आहेत, त्यांच्याकडे काय नाही आणि जे श्रीमंत आहेत, त्यांच्याकडे काय आहे, याचे अगदी सरळसाधे उत्तर आहे, ते म्हणजे पैसा. कोण काय करतो, यापेक्षा कोण किती पैसा कमावतो, या निकषाला सर्वोच्च महत्त्व आले आहे. त्यामुळेच नाती तयार करणारा विवाह असो की समाजातील प्रतिष्ठा असो, ती या ना त्या मार्गाने पैसा आणि संपत्तीला जोडली जाते आहे. खरे म्हणजे ज्याच्याकडे शहाणपण आहे, त्याला समाजात प्रतिष्ठा मिळायला हवी, पण तसे होतेच असे नाही. याचे कारण जगापाठोपाठ भारतीय समाजाचेही आता पैशीकरण झाले आहे. धनधान्य, जमीन, झाडे, गुरेढोरे, पाणी हीच जेव्हा संपत्ती होती, तेव्हा असे पैशीकरण झालेले नव्हते.
वस्तूंचीच देवघेव होत असल्याने (बार्टर) त्यात रियल व्हॅल्यूच्या बदल्यात रियल व्हॅल्यू मिळत असे. पण १८६० नंतर शेतसारा रुपयात घेतला जाऊ लागला आणि पैशीकरणाची सुरुवात झाली. आता या बदलालाही सुमारे पावणे दोनशे वर्षे झाली. अंतिमत: कागदी नोटांचे महत्व वाढत जाणार आहे, हे ज्यांनी ओळखले, त्यांनी आपल्या जीवन जगण्याचे मार्गच बदलून घेतले. ज्यातून थेट पैसे मिळतात, ते आता केले पाहिजे, हे त्यांना कळले होते. त्यामुळेच उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी हा सुविचार आता पूर्ण उलटा झाला आहे. मुद्दा असा आहे की, हे केवळ भारतात झाले आहे की जगातही हा बदल असाच झाला आहे? या प्रश्‍नाचे उत्तर आहे, ज्या विकसित जगाकडे आज आपण आशाळभूतपणे पाहतो, त्या जगात हा बदल आधी झाला आणि ब्रिटिशांच्या राजवटीमुळे तो बदल वेगाने भारतात आला. शेतीप्रधान देश असूनही आपला देश हा बदल रोखू शकलेला नाही. त्यामुळे सारे काही असूनही केवळ कागदी डॉलर नाही, म्हणून आपल्याला १९९१ ला जागतिकीकरण स्वीकारावे लागले. खरे म्हणजे आपल्यावर ते लादले गेले. थेट संपत्तीची निर्मिती करणार्‍या एवढ्या मोठ्या देशात जगाला सहजपणे प्रवेश मिळाला. केवळ आकडेमोड करून पैसे कमावले जाऊ लागले. हे येथे जे इंग्रजांनी १५० वर्षांपूर्वी केले होते, त्यालाच जागतिकीकरणाने आणखी गती दिली.
जागतिकीकरणानंतरच्या २६ वर्षांत आणि पर्यायाने नव्या शतकात भारतातील असंघटीत वर्ग या नव्या बदलात भरडून निघाला आणि त्या वर्गातून संघटीत वर्गात आलेल्या कोट्यवधी भारतीयांनी एका वेगळ्या अर्थाने जागतिक नागरिकत्व स्वीकारून टाकले. त्यांनी पैशीकरण १०० टक्के मान्य केले. त्यांनी भांडवली बाजाराची व्यवस्था स्वीकारली. देशाच्या तिजोरीत रुपये असण्याला जेवढे महत्व आहे तेवढेच महत्त्व डॉलर असण्याला आहे, हे त्याने समजून घेतले. त्या डॉलरशिवाय कोट्यवधीनी खपत असलेल्या गाड्या चालविण्यासाठी लागणारे इंधन, आपण प्रेमात असलेले सोने आणि ज्या तंत्रज्ञानावर जग स्वार होते आहे, ते तंत्रज्ञानही भारत आयात करू शकणार नाही, हे अशा भारतीयांच्या लक्षात येऊ लागले. विकसित जगाच्या संपत्तीचे वाटेकरी व्हायचे असेल तर देश सोडावा लागेल आणि बाहेर जाऊन डॉलर कमवावे लागतील, हे त्यांनी केवळ स्वीकारलेच नाही तर जगात सर्वाधिक रिमिटन्स आणणारा समूह म्हणून तो पुढे आला.अर्थव्यवस्था संघटीत व्हावी आणि तिचे शुद्धीकरण व्हावे, यासाठीची जगातील सर्वात मोठी नोटबंदीही त्याने पचविली.
संपत्तीच्या वितरणासाठी करपद्धतीतील बदल जगाने अपरिहार्य मानले आहेत, त्यात तो आज जीएसटीपर्यंत पोचला आहे. क्रयशक्तीच नाही म्हणून जगाने दीर्घकाळ दुर्लक्ष केलेल्या या देशात, या सगळ्या बदलांमुळे आताव्यवसाय करण्यासाठी स्पर्धा लागली आहे. निकष कोणताही घ्या, विकास दरवाढीचा घ्या, हवाई वाहतुकीचा घ्या, मेट्रोच्या उभारणीचा घ्या, रस्तेबांधणीचा घ्या, सौर ऊर्जेचा घ्या किंवा अगदी पुतळ्याच्या उंचीचा घ्या, भारतीय समूह आज दमदार वाटचाल करतो आहे. मध्यंतरी इंधनाची दरवाढ आणि रुपयाच्या घसरणीमुळे भांडवली बाजाराचीही पिछेहाट होऊ लागली होती. पण १३५ कोटी ग्राहक, काम करणारे किमान ४५ कोटी नागरिक आणि सर्वात तरुण असलेल्या या देशात आता अशी पिछेहाट तात्कालिक असणार आहे, हे नक्की. या पीछेहाटीची चिंता जणू जगालाही असावी.
नाहीतर इंधनदरवाढीचा फटका बसत असताना इराणकडून तेल घेण्याची भारताला अमेरिकेकडून सूट का मिळावी? तेल उत्पादन वाढीबाबत रशिया, अमेरिका आणि सौदी अरेबियात एकमत का व्हावे? पैसा गुंतविण्याची संधी शोधत जपानच्या सॉफ्ट बँकेने भारतात शोध का घ्यावा? विकासदरात पुढील दोन वर्षे तरी भारतच चीनसह सर्व जगाच्या पुढे असेल, असे अंदाज आर्थिक संस्थानी जाहीर का करावेत?
एवढे सर्व चांगले चालले असताना आम्ही अडले कोठे आहोत? अडण्याची दोन कारणे आहेत. पहिले, भारतीय नागरिकांच्या वृत्तीबदलात उत्तरे शोधणे आणि दुसरे जगाच्या कागदी नोटा तर स्वीकारल्या, पण त्याचे तत्व न स्वीकारण्याची घोडचूक.त्याला चलनाचे तत्व म्हणतात. चलन हे विनिमयाचे माध्यम आहे. ती वस्तू नाही. चलन नेहेमी चालतच राहिले पाहिजे. हाच मुद्दा वेगळ्या पद्धतीने मांडायचा तर जो खेळ आपण खेळतो, तो खेळण्याचे नियम तो खेळ खेळणार्‍या सर्व खेळाडूंना सारखेच लागू असतात. जगाने पैशीकरणाचा खेळ मांडला आहे तर त्याचेही तसेच नियम आहेत. तो खेळला पाहिजे, याला आता पर्याय राहिलेला नाही. बँकिंग करणे, डिजिटल व्यवहार करणे, गुंतवणुकीचे नवे मार्ग स्वीकारणे,
पतसंवर्धन करून देशातील सर्वांची क्रयशक्ती वाढविणे आणि आजच्या जगाची निर्मिती ज्या भांडवलावर अवलंबून आहे, ते भांडवल विकसित जगात आहे, तसे स्वस्त करणे, असे काही या खेळाचे नियम आहेत. जे हे नियम पाळतात, ते पैसे कमवतात, असे दिसते आहे. ज्यांनी हे नियमच समजून घेतले नाही, त्यांना किमान त्याची जाणीव करून देण्याची गरज आहे.
या महाकाय देशासमोरील आव्हाने फार मोठी आहेत आणि त्यांचा मुकाबला जगाने लादलेल्या अर्थव्यवस्थेच्या मैदानावर नियमांनी खेळ करूनच केला जाऊ शकतो. त्यामुळे त्या मैदानावर जेवढे जास्त भारतीय त्याचा स्वीकार करून उतरतील तेवढा देश मजबूत होण्यास मदत होईल. अर्थात, त्यासाठी भारतीय नागरिकांच्या वृत्तीतच बदल झाला पाहिजे, अशा दुराग्रहाने पेटलेल्या यशस्वी नागरिकांनाही शांत करावे लागेल! •••

Posted by : | on : 9 Dec 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, यमाजी मालकर, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, यमाजी मालकर, स्तंभलेखक (351 of 1372 articles)

Tiger Pti
टेहळणी : डॉ.परीक्षित स. शेवडे | स्थानिकांना असलेली भीती वा त्यांचे झालेले नुकसान याबाबत पूर्ण सहानुभूती राखत वाघिणीला पकडून अन्यत्र ...

×