ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी » कुंभाचा पौराणिक इतिहास

कुंभाचा पौराणिक इतिहास

॥ विशेष : प्रा. भालचंद्र माधव हरदास |

लाखो-करोडो हिंदू भाविक, नागा साधू, संन्यासी आणि साधू-संत कुंभमहापर्वात स्नान करण्यासाठी का येतात? खरंतर कुंभपर्व पृथ्वीवरील सर्वात मोठे धार्मिक आयोजन आहे. हा असा एक सामाजिक उत्सव आहे ज्याचे कितीही वर्णन केले, तरी जोपर्यंत आपण ‘याचि देही याचि डोळा’ त्यात प्रत्यक्ष सहभागी होत नाही तोपर्यंत कुंभातील हर्षोल्हास, तपोनिष्ठ ऋषी-मुनी आणि तेथील पवित्र वातावरण याचा केवळ अंदाज बांधू शकतो. असे म्हणतात की, कलियुगात कुंभमेळ्यात जाऊन पवित्र जलात स्नान केल्याने मोक्षदायिनी अलकनंदा मुमुक्षु साधकांवर प्रसन्न होते.

Kumbh 01

Kumbh 01

दर बारा वर्षांनी हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक येथेच महाकुंभ का आयोजित केला जातो?
लाखो-करोडो हिंदू भाविक, नागा साधू, संन्यासी आणि साधू-संत कुंभमहापर्वात स्नान करण्यासाठी का येतात? खरंतर कुंभपर्व पृथ्वीवरील सर्वात मोठे धार्मिक आयोजन आहे. हा असा एक सामाजिक उत्सव आहे ज्याचे कितीही वर्णन केले, तरी जोपर्यंत आपण ‘याचि देही याचि डोळा’ त्यात प्रत्यक्ष सहभागी होत नाही तोपर्यंत कुंभातील हर्षोल्हास, तपोनिष्ठ ऋषी-मुनी आणि तेथील पवित्र वातावरण याचा केवळ अंदाज बांधू शकतो. असे म्हणतात की, कलियुगात कुंभमेळ्यात जाऊन पवित्र जलात स्नान केल्याने मोक्षदायिनी अलकनंदा मुमुक्षु साधकांवर प्रसन्न होते. महाकुंभ आयोजनाचा संबंध पुराणातील समुद्रमंथनासोबत आहे. कथेनुसार महर्षी दुर्वास यांच्या शापाने जेव्हा इंद्र आणि देवता शक्तिहीन झाले, तेव्हा दानवांनी देवतांवर आक्रमण करून त्यांना पराजित केले. या घटनेनंतर समस्त देवता भगवान विष्णूजवळ पोहोचले. सगळा वृत्तान्त कथन केल्यानंतर श्रीहरी विष्णूने देव आणि दैत्य यांना मिळून क्षीरसागराचे मंथन करून त्यातून अमृत काढण्याचा सल्ला दिला. श्रीहरी विष्णूंच्या या कथनानंतर देव-दानव संधी झाली आणि समुद्रमंथन करण्याबाबत योजना आखली गेली. समुद्रमंथनातून अमृतकुंभ निघल्यावर देवांचा इशारा मिळताच इंद्रपुत्र जयंत अमृतकलश घेऊन आकाशातून उडू लागला. या अचानक घडलेल्या घडामोडीनंतर दैत्यगुरू शुक्राचार्य यांच्या आदेशानुसार दानवांनी अमृतकुंभ प्राप्त करण्यासाठी जयंताचा पाठलाग केला. सतत पाठलाग आणि अमृत प्राप्त करण्याची लालसा, यामुळे वाटेतच दानवांनी जयंताला पकडले आणि अमृतकुंभावर अधिकार प्राप्त करण्यासाठी देव आणि दानव यांच्यात बारा दिवस भयंकर युद्ध झाले. कथेनुसार या युद्धात पृथ्वीवरील चार क्षेत्रात अमृतकुंभातून अमृतबिंदू पडले होते. ज्यातील पहिला बिंदू प्रयागराज, दुसरा शिवनगरी हरिद्वार, तिसरा उज्जैन आणि चौथा अमृतकण नाशिक येथे पडला. याच पौराणिक कारणाने कुंभमेळ्याचे आयोजन या चार पवित्र क्षेत्रात केले जाते. देवतांचे बारा दिवस म्हणजे मनुष्याचे बारा वर्षं असतात. म्हणूनच कुंभदेखील बारा होतात. यातील चार कुंभ पृथ्वीवर आणि आठ कुंभ देवलोकात होतात, अशी मान्यता आहे.
कुंभ आयोजनाची ज्योतिषीय गणना
धार्मिक आणि पौराणिक मान्यतेनुसार कुंभमेळ्याची आयोजन तिथी खगोलीय ग्रहस्थितीनुसार ठरते. ज्यात सूर्य आणि बृहस्पती यांचे योगदान असते. सूर्यदेव आणि देवगुरू बृहस्पती हे एका राशीतून दुसर्‍या राशीत जेव्हा प्रवेश करतात तेव्हा कुंभमेळ्याचे स्थान आणि तिथी यांची निवड केली जाते. यानुसार जेव्हा सूर्य मेष राशी आणि बृहस्पती कुंभ राशीत असतो तेव्हा कुंभमेळा हरिद्वार येथे साजरा करतात. ज्या वर्षी बृहस्पती वृषभ राशीत प्रवेश करतो आणि सूर्य मकर राशीत राहतो तेव्हा हा महोत्सव प्रयागराज क्षेत्रात आयोजित करण्यात येतो. बृहस्पती आणि सूर्य यांचा सिंह राशीत प्रवेश होतो तेव्हा महाकुंभ मेळा महाराष्ट्रातील नाशिक येथे साजरा केला जातो. यासोबतच बृहस्पती, सूर्य आणि चंद्र हे तीनही कर्क राशीत प्रवेश करीत असल्यास आणि तेव्हा अमावास्या असल्यास तेव्हाही कुंभ नाशिक येथेच होतो. बृहस्पती सिंह राशीत आणि सूर्य मेष राशीत प्रवेश करीत असल्यास उज्जैन येथे कुंभ आयोजन होते. सूर्य सिंह राशीत प्रवेश करीत असल्यास मध्यप्रदेशातील उज्जैन क्षेत्रात कुंभ होतो आणि सिंहस्थ या नावाने ओळखला जातो. पौराणिक कथेनुसार अमृतकलशातील अमृताचे चार बिंदू पृथ्वीवर जिथेे पडले त्या ठिकाणी अमृतबिंदूला नदीचे रूप प्राप्त झाले. या चार पवित्र नद्या म्हणजे हरिद्वारमधील पुण्यसलीला गंगा, नाशिकमधील गोदावरी, प्रयागराजमधील संगमतीर्थ म्हणजेच गंगा-यमुना व सरस्वती आणि उज्जैन येथे क्षिप्रा नदी. गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी आणि क्षिप्रा या नद्यांमधे कुंभपर्वकाळात स्नान करणार्‍या सर्वांचे कष्ट आणि दुःख दूर होऊन जीवन मंगलमय होते, अशी श्रद्धा आहे.
पुराणातील दाखले
स्कंद पुराणातील उल्लेखानुसार, भारतातील समस्त पवित्र नद्या उत्तरेकडून दक्षिणेकडे प्रवाहित होतात, मात्र क्षिप्रा नदी उत्तरगामी आहे. कूर्म पुराणानुसार कुंभस्नान केल्याने समस्त पापांचा विनाश होतो, मनोवांछित फल प्राप्त होते आणि मनुष्याला देवलोक प्राप्त होतो. भविष्य पुराणानुसार कुंभस्नानाने स्वस्वरूप पुण्य आणि मोक्षप्राप्ती होते. कुंभ, महाकुंभ, अर्धकुंभ आणि सिंहस्थ कुंभ या पर्वकाळात पवित नद्यांमधील जल औषधिकृत व अमृतमय होते, अशी मान्यता आहे. यामुळेच अंतरात्म्याच्या शुद्धीकरिता पवित्र स्नान करण्यासाठी देशविदेशातून लाखो भाविक येतात. आध्यात्मिक दृष्टीने कुंभपर्वकाळातील ग्रहस्थिती एकाग्रता आणि ध्यानसाधनेसाठी सर्वोत्तम असते. आसेतू हिमाचल वसलेल्या भारतातील समस्त जनतेच्या रोमारोमांत धर्मरूपी प्राणाचा अनाहत नाद कायम असतो. भारताचा मूलाधार वेदजनित धर्म आहे. समस्त राग, लोभ, अहंकार, मोह, मद, मत्सर, विद्वेष, आपसातील मतभेद यांना विसरून एका पुण्यक्षेत्रात एक लक्ष्य एक उद्देश्य आणि एक ध्येय घेऊन सामील होणारे भाविक, हीच भारताची अंतर्निहित प्राणशक्ती आहे. अनादिकाळापासून आपल्याला असे दिसते की, कुंभक्षेत्रातील हे एकत्रीकरण कोणत्याही दिग्विजयी राजाची राजधानी नाही, कोणतीही वाणिज्य-ऐश्‍वर्यशाली नगरी नाही. तर हे स्थान पवित्र तीर्थक्षेत्रसमूह- गया, काशी, पुरी, प्रयागराज, कुरुक्षेत्र, नैमिषारण्य, अयोध्या, वृंदावन, मथुरा, द्वारका, हरिद्वार, नाशिक, उज्जैन हेच राहिले आहे. कुंभाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कुंभाचे वेळापत्रक कोणत्याही सामाजिक किंवा राजकीय कारणांनी ठरत नाही. कुंभाचा उद्देशदेखील समस्यांची मीमांसापूर्ती नाही. एक उदात्त संकल्प आणि व्यापक दृष्टिकोन असलेल्या कुंभाचे ध्येय व्यष्टी आणि समष्टी जीवनाला उच्चादर्शी परमवैभवी सिंहासनावर सुप्रतिष्ठित करणे आहे. धर्मधारणेच्या अमृतसंजीवनीचे शिंपण करून समाज आणि राष्ट्रीय जीवनातील प्रत्येक स्तराला देव-देश-धर्म या त्रिवेणीने संचारित करून शाश्‍वत विश्‍वकल्याण साधणे, हेच तर भारताचे ईश्‍वरप्रदत्त कर्तव्य आहे.
प्रयागराज कुंभ २०१९
प्रयागराजमध्ये कुंभ होणार, ही वार्ता कानी पडताच गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या संगमाचे विहंगम दृश्य मनःपटलावर विराजमान होते.
वृश्‍चिक राशि स्थिते जीवे, मकरे च चंद्र-भास्करौ।
अमावास्या तदा योग कुम्भी, अर्धकुम्भवाख्या तीर्थनायके॥
प्रयागराज येथील कुंभमेळा अन्य तीन कुंभापासून बराच वेगळा आहे. दीर्घकालिक कल्पवास म्हणजेच व्रतानुष्ठान करून संगमस्थळी किंवा कुंभस्थळीच निवास करणे, ही परंपरा केवळ प्रयाग कुंभातच आहे. अनेक शास्त्रकारांनी प्रयागराज येथील त्रिवेणी संगमाला पृथ्वीचे केंद्र मानले आहे. सृष्टीच्या सृजनासाठी भगवान ब्रह्मदेवाने प्रयाग येथेच यज्ञ केल्याची मान्यता आहे. तसेच प्रयागराज क्षेत्राला तीर्थराज संबोधन आहे. म्हणूनच प्रयागराज येथे केलेले धार्मिक अनुष्ठान आणि साधना यांचे फळ इतर स्थानापेक्षा अधिक असते.
मत्स्य पुराणात महर्षी मार्कंडेय ऋषी धर्मराज युधिष्ठिराला प्रयागराज क्षेत्राची महती सांगताना म्हणतात की, हे स्थान समस्त देवी-देवतांनी संरक्षित केले आहे. येथे एक महिना प्रवास, कल्पवास, अखंड ब्रह्मचर्य धारण करून केलेले तपसाधन हे मोक्षदायी आहे. प्रयाग संगमी स्नान करणार्‍या साधकांच्या दहा पिढ्यांची जन्ममरणाच्या फेर्‍यातून मुक्ती होते. प्रयागराज कुंभ म्हणजे संगम क्षेत्रातील हजारो हेक्टर भूमीवर सतत ५० दिवस चालणारा जगातील सर्वात मोठा उत्सव असून यावेळी जगातील ४ ते ५ देशांची लोकसंख्या (सुमारे २ ते ३ कोटी ) प्रयागराजमध्ये निवासी असते. सनातन काळापासून भारतीय लोकांच्या मनामनांत, रक्तातील कणाकणांत आणि जीवनातील प्रत्येक क्षणाक्षणांत वसलेली अगाध श्रद्धा, हेच अमृत आहे. प्रयागकुंभ सृष्टीमधील समस्त ज्ञात-अज्ञात संस्कृतीचा विराट संगम आहे. आध्यात्मिक चेतना, मानवतेचा प्रवाह, ऋषी आणि कृषी संस्कृतीचा अनोखा मिलाफ आणि जीवनाची गतिशीलता म्हणजे प्रयागकुंभ होय. प्रकृती आणि मानवी जीवनाचे संयोजन, अखंड ऊर्जेचा स्रोेत आणि मर्त्य मानवासाठी आत्मप्रकाशाचा पथ म्हणजे प्रयागराज होय.
विश्‍वकल्याण अक्षयवट आणि भारताचे परमलक्ष्य
दररोज भारतातील हजारो नर-नारी, आबालवृद्ध हे तीर्थदर्शन, साधुदर्शन, पुण्यार्जन आणि धर्मलाभ यासाठी पवित्र कर्म करतात. संसारिक हानी, आत्मीय स्वजनांचा विरोध तसेच आपत्ती आणि आर्तनाद यांची सर्वथा उपेक्षा करून अत्यंत व्याकुलभावाने भारतीय समाज तीर्थयात्रा करतो. भारतीय लोक धर्मासाठी सर्वस्व अर्पण करू शकतात आणि करतातदेखील. धर्मासाठी घर, संसार, आत्मीय स्वजन, सुख, उपभोग, साधन आदी आकर्षणाचा त्याग आणि आसक्तीची उपेक्षा करणार्‍या भारतीय समाजाची मूळ प्रकृती त्यागाची आहे. भारताचा मूलमंत्र त्याग आहे. भारतवासी या त्याग मंत्राला जाणतात, मानतात आणि विश्‍वासाने त्याचे पालन करतात. आपापले सामाजिक आणि व्यक्तिगत जीवनातील आचारनुष्ठान करतानादेखील त्यांच्या ठायी एकच भाव असतो तो म्हणजे
त्यागेकैनेके अमृत्वमानशु:
एकमात्र त्यागानेच अमृत्वप्राप्ती होते, याच त्यागभावनेचा अनुभव घेण्याचे उपादान म्हणजे कुंभपर्व होय. संपूर्ण विश्‍वातील मानवजातीच्या शाश्‍वत कल्याणासाठी आणि भारतीय संस्कृतीच्या ‘वसुधैव कुटुंबकम्’ या विश्‍वव्यापी धारणेला पुष्ट आणि संवर्धित करण्यासाठी प्रयागराज कुंभ समरसता, सर्वव्यापकता आणि सर्वसमावेशकता हा त्रिवेणी संदेश घेऊन येत आहे. प्रयागराज येथील अक्षयवट ज्ञान, वैराग्य आणि विश्‍वबंधुतेचा संदेश देत अनादिकाळापासून उभा आहे. भारतीय संस्कृतीच्या विश्‍वव्यापक विराटरूपाचे दर्शन घेण्यासाठी चला तर मग प्रयागराजला…!

Posted by : | on : 6 Jan 2019
Filed under : आसमंत, पुरवणी.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी (119 of 885 articles)

Modi Vs Rahul Sonia
संवाद : सोमनाथ देशमाने | गांधीहत्येनंतर काँग्रेसने हजारो ब्राह्मणांच्या घरादारांची राखरांगोळी केली, तरीही हिंदू काँग्रेसलाच चिकटलेले! इंदिराहत्येनंतर काँग्रेसने हजारो शिखांची ...

×